Bluepad | Bluepad
Bluepad
वासनांध - सोशल मीडिया
Swapnil Bhovad
Swapnil Bhovad
21st Nov, 2022

Share

डिजिटल विश्वात सोशल मिडिया म्हणजे दुधारी तलवार झाली आहे.
मनोरंजन , करमणूक , संपर्क साधनांच व्यासपीठ सर्वांसाठी तयार झालेलं दिसत.
पण दुसऱ्या बाजूला विचारानी बोथड असलेल्यांची सुद्धा कमी नाही.
हनीट्रॅप , नेटबँकिंग फ्रॉड , सेक्शुअली हेरासमेंट , इत्यादी प्रकार बघायला मिळत आहे.
फेसबुक , इंस्टाग्राम ,वॉट्स ऐप ,स्नॅपचॅट, टेलिग्राम इत्यादी डिजिटल प्लॅटफॉर्मवर जवळीक साधण्याचा प्रयत्न वासनांध प्रवृत्ती करत असतात.
ह्या समाजात वासनांध राक्षसांची कमी नाही. स्पर्श न करता बलात्कार करीत असतात. गरीब , साधी ,सोपी , घटस्फोटीत स्त्री , विधवा , विवाहित स्त्री त्यांना शिकार च वाटत असते.
केविलवाणी गोष्ट सांगून इमोशनल अत्याचार करून भावनीक करणं ह्यात असल्या दानवी प्रवृत्ती हातखंडा असतो.
कधी पैशासाठी , कधी वासना क्षमवासाठी खोटी आश्वासन देऊन पीडित केलं जातं. त्यांचं शोषण केलं जातं. मग मनदुषित केली जातात. त्यांचा वापर केला जातो. या सर्व बाबीत जीवाचं बर वाईट सुद्धा केलं जातं.
मुली , महिला आदी सर्वांना लोकशाहीमध्ये व्यक्तिस्वातंत्र्य आहेच. स्टेटस , रीळ , पोस्ट ,ह्याद्वारे स्वतःला प्रदर्शित करणं वाईट नाही. व्यासपीठावर मनमोकळं होणं हा अधिकार च आहे. पण आपल्या जवळलील , ओळखीतली , नात्यातील , मित्र असतील तरच बर !
अनोळख्या व्यक्तीसोबत बोलणं हे वैचारिक असावं. ज्यावेळी परिसीमा क्रॉस होते आणि विषय वासनेच्या आधारावर असेल तर ती व्यक्ती का असावी आयुष्यात .
व्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे . तो त्यांचा अधिकार सुद्धा आहे. काळजीपूर्वक राहून वावरण हे सुद्धा तेवढच महत्वाचं. हल्लीच्या काळात ज्या बातम्या पाहायला मिळतात , त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मुर्खपणा च असेल.
सेक्स मध्ये व्हेरिएशन हवं ...नवीन ,नवीन स्त्री ,अविवाहिता ,उपभोगायला मिळाव्यात ह्यासाठी अट्टहास करणारे राक्षस गोड बोलून , खोटी स्वप्न
रंगवून तुम्हाला नग्न करतील. कृपया फसु नका . योग्यजोडीदार आयुष्यात मिळतोच .
विर्यरूपी वासनांध सापांना वेळीच ठेचून काढा ... सशक्त व्हा ..समजूतदार व्हा...आयुष्य खूप सुंदर आहे.
स्वप्नाळू🔥✒️

170 

Share


Swapnil Bhovad
Written by
Swapnil Bhovad

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad