Bluepad | Bluepad
Bluepad
कोणत्याही कुटुंबाला परफेक्ट राहण्याची अजिबात गरज नसते, तर अपडेट राहण्याची असते.
प्रीती लांडगे.
प्रीती लांडगे.
21st Nov, 2022

Share

कुटुंबाने परफेक्ट नव्हे तर जास्त समजूतदार असण्याची गरज असते. आणि तसही को अगदी परफेक्ट असू शकत नाही. प्रत्येकात काही ना काही कमी जास्त असणारच प्रत्येकाने एकमेकांना समजून घेऊन अपडेट असावे. कुटुंबात नियम असावेत परंतु त्यासाठी कुटुंबातील सदस्यांना वेठीस धरू नये. तुमच्यासाठी नियम आहेत नियमासाठी तुम्ही नाही. आणि नवीन बदल स्वीकारता यायला हवेत कारण प्रत्येक गोष्टीसाठी तिला बघण्यासाठी एक वेगळा दृष्टिकोन हवा डोळ्यावर झापडे लावल्या सारखे वागू नये रुढी परंपराचे अवडंबर माजवू नये. आपल्या संस्काराला धरून नवीन गोष्टीचा,बदलाचा स्वीकार करुन पुढे जात राहिले पाहिजे. नवीन गोष्टी तुम्हाला आत्मसात करता आले पाहिजे. मुलांना ही समजून घ्या चार गोष्टी त्यांनी तुमच्या ऐकल्या तर दोन गोष्टी तुम्ही ही त्याच्या ऐकून घ्या. ते तुमचेच मुल आहे त्यावर तुम्हीच संस्कार केले आहेत तर त्या संस्कार आणि मुलं दोन्ही वर विश्वास ठेवा. आणि अपडेट रहाण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाला प्रत्येकाची स्पेस द्या ती ही खूप महत्त्वाचे असते. परफेक्ट असणे म्हणजे काहीजण काय करतात हे असच झाले पाहिजे यावेळी ही कामे झालीच पाहिजे असा अट्टाहास करू नका. काळानुसार, कामाच्या पध्दतीने वेळेचे स्वरूप बदलू शकते. जेवणाच्या वेळा मागेऊ होऊ शकतात तीथे समजूतीने वागा उगाच आरडाओरडा करू नका की मला प्रत्येक गोष्ट परफेक्टच हवी.
आता हे नेमके अपडेट म्हणजे तर काय बर तर समजा खूप उन्हाळा आहे. म्हणून काही कुटुंबातील व्यक्तीनी त्याचे कामाचे स्वरूप बदलले असेल की अगदी दूपारी नको जाऊया कामाला संध्याकाळी जाऊ तर आता कुटुंबात तुम्ही रोज एकत्र मिळून करत असाल तर आता कुटुंबातील काहीना जमणार नाही त्यावेळी तर तुम्ही समजून घेऊन तुमची कामे करत रहा हे ही झाले अपडेट असणे. बाहेर जे काही नवीन बदल झाले आहेत ते योग्य असती सोयीस्कर असतील तर त्याचा अवलंब करा. मुलांना एखादी गोष्ट करायची असेल जी तुमच्यासाठी नवीन आहे,परंतु ती चांगली असेल त्यातुन नवीन काही शिकायला मिळणार आसेल तर त्यांना करू द्या. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी अडून रहाणे ही वृत्ती सोडा एखाद्या वेळी तुमची मुलगी,सुन कामसाठी बाहेर जात असतील त्यांना काही कारणाने जेवण बनवने शक्य नाही तर कधी तरी तुम्ही बाहेरून मागवून जेवण करु शकता. मला घरचेच जेवण हवे असे अडून रहावू नका. कुटुंबातील कोणाला फैशन डिझाइन ची अवड असेल तर तिला ते काम करु द्या बाहेर जाऊ द्या आणखी चांगल्या गोष्टी शिकून तीला तिचा व्यवसाय करू द्या. तिचे छंद तीला जोपासू द्या. मुलांन कडून थोड्याफार प्रमाणात तंत्रज्ञान शिकून घ्या जेणेकरून मुले जरी बाहेर गेली तरी तुमचा तुम्हाला टि.व्ही,मोबाईल वापरता आला पाहिजे. त्यासाठी त्याच्यावर अवलंबून रहाण्याची गरज नाही. स्वतःला ही वेळ देणे फार गरजेचे असते तर कुटुंबातील मोठ्यांनी ही थोडे फार बाहेर फिरणे आवडीच्या गोष्टी कराव्यात आणि तसेच घरातील दुसऱ्यांना ही प्रोत्साहन द्यावे. जुन्या चालत आलेल्या रूढी परंपरा याना चिकटून रहाऊन हे असच करा म्हणून मागे लागू नका.
आणि या ही पेक्षा तुमचे विचार अपडेट करा. तुमचा दृष्टिकोन बदला प्रत्येकाला एकाच तराजूत तोलू नका तुम्ही एकवेळ अपडेट नसाल तरी चालेल परंतु विचार मात्र अपडेट नक्की ठेवा. आता मुलांच्या शाळा,कॉलेज बर्याच गोष्टी नवीन आहेत बदल्या आहेत तर आमच्या वेळी असले काही नव्हते हे अस कसे असे म्हणून त्याच्या मागे लागू नका निट विचारा आणि माहिती घ्या व मग बोला आता बरेच गोष्ट ऑनलाइन असतात तर ते त्याच्या कडून समजून घ्या आणि कधी कधी त्याचाही वापर करा. आम्ही सगळे स्वतः हाताने करायचो अगदी या गोष्टी आम्हाला परफेक्ट जमायचा असे म्हणून त्याना त्रास देऊ नका. त्यांना त्याच्या बुध्दीने विचार करून वागू द्या. तुम्ही फक्त त्याच्या मागे उभे रहा. तोही त्याचा त्याचा विचार घेऊन जन्माला आला आहे. तुम्ही तुमचे विचार त्याच्यावर लादून त्यांना हैराण करू नका. आणि सध्या काळ खूप बदलला आहे. प्रत्येक गोष्टीत भावनिक गुंता वाढवून समोरच्याला अडकून ठेवू नका. प्रक्टीकली विचार करा. वेळेनुसार परिस्थिती अनुसार काही गोष्ट बदलाव्या लागतात तर काही स्वीकारिव्या लागतात तर तसे करता यायला हवे. तुम्हाला शांत, हेलदी जीवन जगण्यासाठी परफेक्ट नाही. तर आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून मनस्थिती बदलून स्वतःला अपडेट करून जगता आले पाहिजे. आता काळानुसार प्रत्येकाला घरा बाहेर पडणे गरजेचे आहे. तर तो जाणार तर त्यांना समजून घ्या स्वतः च्या गोष्टी स्वतः करणे याची सवय लावून घ्या दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. कुटुंबाची शिस्त ही महत्त्वाची आहेच परंतु त्याबरोबर या नवीन गोष्टी ही स्वीकारने महत्त्वाचे आहे.
प्रीती लांडगे.
कोणत्याही कुटुंबाला परफेक्ट राहण्याची अजिबात गरज नसते, तर अपडेट राहण्याची असते.

169 

Share


प्रीती लांडगे.
Written by
प्रीती लांडगे.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad