Bluepad | Bluepad
Bluepad
"आपले कुटुंब आपली जबाबदारी "​
दुर्गादेवी सरगर
दुर्गादेवी सरगर
21st Nov, 2022

Share

"आपले कुटुंब आपली जबाबदारी "
   "आपले कुटुंब आपली जबाबदारी "​
कालच्या कार्यक्रमात आमची बऱ्याच दिवसांनी भेट झाली . आमच्या गप्पा चालू होत्या . आई बाबा कसे आहेत? असे मी तिला विचारले . ती म्हणाली ,बाबा मागच्या वर्षीच गेले . मग आई ,मी आणि बहीण असे आम्ही तिघी पुण्यातच राहतो . पण बाबा गेल्यानंतर आईला एकटीला कसे ठेवणार... तिच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे . मला तिचे बोलणे अगदी मनापासून पटले . दोघी बहिणी म्हणजे पक्क्या मैत्रिणीचं आहेत म्हणजे त्या दोघींचेही विचार फार मिळते जुळते आहेत . त्यात तिच्या आईचे पाय फॅक्चर असलेमुळे घरात आईकडे लक्ष द्यायला कोणीतरी हवे म्हणून तिची बहीण कार्यक्रमाला आली नव्हती तसेच बहिणीची तब्येत हि ठीक नव्हतीच . पण ती नक्कीच आली असती . पुढे म्हणाली ,अजून आम्ही पुण्यामध्ये भाड्याने राहतो, पण मोठ्या बहिणीच्या लग्नाआधी स्वःताच घर असाव असं प्लँनिंग आहे म्हणजे बहिणीच्या लग्नानंतर मी माझ्या आईला सांभाळेन आणि जो आमच्या सोबत राहील(घर जावई )त्याच्याशी लग्न करेन.याबद्दल मला छान वाटले पण मग सासू सासर्यांकडे कोण बघणार म्हणून मी तिला जरा वेगळ्या पद्धतीने सुचवण्याचा प्रयत्न केला, जे मी इतरांना मी असे करेन म्हणून सांगत असते .
पूर्वीपासून चालत आले आहे कि ,मुलगी सासरी गेली कि ती माहेरची पाहुनी झालेली असते . तिला तिच्या व्यापातून वेळ मिळाली कि ,माहेरी फोन करते किंवा वेळ मिळाल्यानंतर येऊन जाते . पण मी पहिल्यापासून बघत आले कि बायकांना माहेरी जायला वेळच मिळत नाही कारण त्यांचं काम ,घरातल्या जबाबदाऱ्या ,मुलांचे शिक्षण आणि सासू सासऱ्यांची काळजी तसेच काही पाहुण्यांत कार्यक्रम असला कि जायचं ! मग यातून माहेरच्या लोकांकडे कसे लक्ष देणार .... साहजिकच आहे प्रत्येक गोष्टींमध्ये बायकांनाच जबाबदार ठरले जाते आणि हे त्यांना अजिबात शिकवावं लागत नाही . कारण पूर्वीपासून जस चालत आले तसेच घडते सगळे . यात वेगळं काही केलं तर नातेवाईक काय म्हणतील हा प्रश्न आहेच कि ...म्हणून त्यांना वेगळ्या पद्धतीने विचार करायला सुचतच नाही .
मी तिला म्हणाले ,घर जावई हा पर्याय असू शकतो,पण सासू -सासरे यांच्या सोबत आपण आईला हि आपल्यासोबत ठेवण्याचा विचार नक्कीच करू शकतो म्हणजे सगळे सोबत राहतील आणि असा वेगळा वेळ द्यावा नाही लागणार ...त्यावर ती म्हणाली ,आमचे नातेवाईक चांगले नाहीत त्याचेच वाईट वाटते . अर्थात हा प्रश्न बरोबर आणि फार गंभीर आहे ,तो म्हणजे नातेवाईक काय म्हणतील ?
मला नेहमी वाटते, आपण आपल्यासाठी जो योग्य आणि चांगला पर्याय आहे तोच निवडावा. मग इथे नातेवाईक किंवा इतर लोक काय म्हणतील असा अजिबात विचार करू नये. या मताशी मी अगदी ठाम आहे, माझ्या अशा स्वभावामुळे कोणी मला बोलण्याचे धाडस करत नाही . आणि केलेच तर मला त्यांच्याच भाषेत उत्तरही अगदी चांगल्या पद्धतीने देता येते. कारण प्रत्येकाच्या प्रायोरिटी वेगळ्या असतात .
जस एक मुलगा आपल्या आई बाबाना सांभाळू शकतो तसेच मुलींनी त्यांच्या आई बाबाना सांभाळले तर बिघडले कुठे ? ज्या घरात मुलगा नसेल आणि तिच्या आई बाबांची जबाबदारी सगळ्याच दृष्ट्या तिच्यावर असेल तर तिच्या सासरी गेल्यानंतर ती तिच्या व्यापात लागली तर त्यांच्याकडे बघणार कोण ? हि एक सामाजिक समस्या आहे आणि यावर आपण नक्कीच विचार करायला हवा . इतरांना काय वाटते याचा विचार करून जगू लागलो तर आपल्याला जस जगायचं आहे तसे चांगल्या पद्धतीने जगूच शकणार नाही . बदल घडायला सुरुवात होत आहे आता शिक्षणामुळे मुला मुलींचे विचार बदलले आहेत, ते आपल्या आई बाबा आणि सासू सासऱ्यांचा नक्कीच विचार करतील असा माझा ठाम विश्वास आहे . यामध्ये तिला तिच्या घरच्यांची ,सासरच्या मंडळींची ,नातेवाईकांची आणि समाजाची साथ नक्कीच मिळेल .
आपण आपला प्रयत्न करायला चालू करूयात ... एक आनंदी कुटुंब म्हणजे आपण दोघे आणि आपली मुले नसून त्यामध्ये आई वडील आणि सासू सासऱ्यांच्या हि समावेश असावा आणि इतर नातीही आहेतच... "आपले कुटुंब आपली जबाबदारी "

247 

Share


दुर्गादेवी सरगर
Written by
दुर्गादेवी सरगर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad