Bluepad | Bluepad
Bluepad
अहंकार सोडा विसरा .
 Ghanshyam L Sangidwar
Ghanshyam L Sangidwar
21st Nov, 2022

Share

आपण स्वताला कितीही चांगले आहोत , आणि कितीही चांगले असलं तरी असं कधी होणार नाही की आपणा मुळे सारेच आनंदी असतील. परमेश्वराला अनंत योजना आहेत . अतिवृष्टी दुष्काळ वादळ पाऊस पुर भुकंप परंतु माणसा जवळ एकच योजना आहे ते म्हणजे केवळ कर्म . माणसाला एकच ठिकाण असं आहे की त्यात कितीही त्रृटी कमतरता असल्या तरी स्विकारले जाते असे ठिकाण म्हणजे कुटुंब परीवार . बदलत जग आहे , एकेकाळी वयोवृद्धांच सन्मान होत असे परंतु आता सन्मान त्यालाच जास्त असतो ज्याच्या जवळ आय इन्कम पैसा फुल आहे . जास्त आहे . मित्रता वाढण्या करीता दोनच अशा व्यक्तींची गरज असते .जो निष्कपट आहे आणि ज्याच्या जवळ निस्वार्थ प्रेम आहे . आपण असा प्रयत्न का करू नये . आपण काही वेगळे आहोत असं दाखविण्यापैक्षा , असं वेगळं पण का निर्माण करू नये की आनंदी राहण्याचा सल्ला देण्याऐवजी सर्वांना आनंद देता येईल आपण असं उदाहरण का बनता येऊ नये . मोठ्या वृध्द व्यक्तींचा सन्मान त्यांना साहारा देणं आधार बणनं ही आपली संस्कृती आणि संस्कार . ते आपणास ओझं नाही तर कुटुंब रक्षक सुरक्षाकवच आहेत .जे कोणतेही फी न घेता काही न मागता चांगल्या वाईट परीस्थितीत प्रसंगांना संयमाने समोर जाण्याची हिम्मत देतात .जो पर्यंत वेळ आहे तोपर्यंत त्यांचा सन्मान करणे . सांभाळणं ही आपली प्रेत्यकाची जबाबदारी आहे . संतान मुलांचे पालनपोषण हे कोणत्याही तपश्चर्या पैक्षा कमी नाही . आणि आई वडीलांची सेवा कोणत्याही पुजेपैक्षा कमी नाही . माणसाचं मन सुध्दा किती विचीत्र आणि हलकं आहे .जेव्हा आपण स्वता चुकीचे असतो त्यावेळी आपण समझोता करतो आणि दुसरा चुकतोय तेव्हा आपणास न्याय पाहिजे असतो . ज्या माणसात मी पणा मोठेपणा आणि अहंकार असतो तो केव्हाच चांगला मित्र , चांगला प्रेमी , आणि चांगला जिवन साथी होऊ शकत नाही . माणसाला जिवनात दोनच शब्द संपविण्यासाठी पुरेसे आहेत एक अहंकार आणि दुसरा गर्व घमेंड सद्यस्थितीत आजच्या आधुनिक जगात अहंकार हाच जवळपास सर्वांचा मित्र आहे . कारण कोणीही एक मिनिटाकरीता अहंकार सोडयाला तयार नाही . 🙏🙏🌹 .
अहंकार सोडा विसरा .
वेळ काळ लक्षात येत नाही . निघून जाते . दिसतं नाही.परंतु‌ बरेच काही दाखवुन जात असते . आपलेपणा प्रत्येकातच दिसुन येतो परंतु आपले कोन आहे हे वेळच दाखवीत असते कोणास त्रास देणे किंवा बदला घेण्याचा विचारात वेळ वाया घालवू नका विचार करु नये . कारण जे आपल्याला त्रास देतात ते स्वतःच आपल्या कर्माचे स्वताच वेळेनुसार प्रसंगानुसार सामना करतील . वेळेचे नियोजन जिवनातील महत्त्वपूर्ण भाग आहे .आपली दिनचर्या निश्चीत असु द्या कामे बरोबर आणि चांगलीच होतील फक्त ती वेळेनुसार योग्यप्रकारे करा . जिवनात ही नियमावली आणि सुत्रांचे पालन कर्तव्यपुर्वक करा अनुभव घेऊन पहा दिवसं कसे निघून जातील का कळणार नाही . ज्यांनी जिवन जगणे शिकले त्यांचा मृत्यू पण म्होत्सव होईल. ..... .जर जिवन अनमोल आहे तर जिवनात आनंद प्रसन्नता शांतता समाधान महत्त्वपुर्ण आहे . तरच जिवन ‌प्रसन्न असु शकते . प्रसन्नता अप्रसन्नता आपल्या कर्माचे फळ असते . संपत्ती मुळे प्रसन्नता असती तर सारेच धनवान प्रसन्न असते . म्हणुनच जिवनात प्रसन्नता हा उत्सव महोत्सव आहे . म्हणजेच प्रसन्नता हेच जिवन होय .
.

183 

Share


 Ghanshyam L Sangidwar
Written by
Ghanshyam L Sangidwar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad