Bluepad | Bluepad
Bluepad
कोण म्हणतं परी हवी
मयुरेश गीता नाडकर्णी
मयुरेश गीता नाडकर्णी
21st Nov, 2022

Share

कोण म्हणतं परी हवी
फक्त थोडी बरी हवी ।।
आतल्या गाठीची बिलकुल नको
मनाने नेहमी ती खरी हवी ।।१।।
कोण म्हणतं गोरीच हवी
रंग असला जरी तिचा गव्हाळ
गळ्यात सोन नसेल जरी तिच्या
असू दे एखादी छोटीशी मोत्याची माळ ।।२।।
उचभ्रू कॉलेज मध्ये का नसेना पण उत्तम असावं तीच शिक्षण
अगदीच शाकाहारी नको काधितरी करावं तीने मांसाहार भक्षण ।।३।।
नुसती गर्विष्ठ श्रीमंत नको
कष्टाची असावी तिला जाण
ब्रँडेड वस्तूंचा शौक नसावा तिला
साधी चामड्याची वापरावी तिने वहाण ।।४।।
नवरा म्हणून सर्व अपेक्षा मीच पूर्ण कराव्या असा बिलकुल नको तिचा अट्टाहास
तिने ही संसाराला समान हातभार लावून वाढवावा नात्यातला सुवास ।।५।।
हळू हळू उलगडत जावे आमच्या दोघांच्या स्वभावातले रंग
आणि एकमेकांच्या साथीने व्हावे आयुष्यभर आम्ही दंग ।।६।।
तेव्हाच म्हणतोय कोण म्हणतं परी हवी
स्वप्नात इतक्या पाहिल्या या वेळेला तरी खरी हवी ।।७।।
मंगेशसूत
२०/११/२०२२
कोण म्हणतं परी हवी

183 

Share


मयुरेश गीता नाडकर्णी
Written by
मयुरेश गीता नाडकर्णी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad