Bluepad | Bluepad
Bluepad
🙏सचिन पाटील समाजप्रिय व्यक्तिमत्व✍️
दत्तात्रय केरबा पाटील
दत्तात्रय केरबा पाटील
21st Nov, 2022

Share

सचिन मनोहर पाटील म्हणजे समाजातील आदराचे आणि सन्मानाचे स्थान असलेले एक उत्कृष्ट स्वाभिमानी व्यक्तिमत्व.त्यांचे वडील श्री.मनोहर भैरव पाटील (अण्णा) यांनी एका प्रदीर्घ काळामध्ये गावकामगार पोलिस पाटील म्हणून या पदाला योग्य न्याय मिळेल असा न्याय केला आणि आपली सेवा प्रामाणिकपणे आणि निष्पक्षपणे बजावली.आज अण्णा गावच्या महत्वाच्या असणाऱ्या तंटा मुक्ती समितीचे "तंटामुक्ती अध्यक्ष" म्हणून कार्यरत आहेत.सडेतोड उत्तर,आणि योग्य आणि सत्य असेल त्याच बाजूने उभ राहण आणि किंबहुणा कोणत्याही दबावाखाली किंवा दुजाभावाने एकतर्फे निर्णय देणं हेआजतागायात त्यांनी केलं नाही.आपल्या पदाला किंवा आपल्या प्रतिमेला कोणतही गालबोट लागणार नाही याची त्यांनी अगदी कटाक्षाने काळजी घेतली आणि घेत आहेत.✍️
साहजिकच अण्णांच्या या कठोर आणि सक्त वागणुकीचा आपोआपच सचिन यांच्यावर लहानपणापासून चागला परिणाम झाला.मी अनुभवलेले सचिन एक चांगले आणि मेहनती व्यक्ती आहेत.एकुलते एक आणि जमीन जुमला मुबलक,सर्वत्र पाण्याची चांगली सोय आणि अपेक्षेप्रमाणे श्रीमंती, समाजात मानाच स्थान,आदर इतक्या सगळ्या गोष्टी असून देखील सचिन यांचा स्वभाव मात्र या सगळ्याला अपवाद म्हणावा लागेल.साधं सरळ आणि मितभाषी व्यक्तिमत्व असलेला हा देह आजही मेहनत आणि जिद्द या बाबींशी कधीही तडजोड करत नाही.💐
सचिन यांना सगळी लोकं आदराने आणि प्रेमाने सचिनभाऊ म्हणून संबोधतात.सचिन यांनी उच्चशिक्षित असून देखील शेतात कष्ट करताना समाज आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहील किंवा मी इतका उच्च शिक्षित असल्यामुळे शेतात कस काम करू या तोकड्या आणि संकुचित विचारांना त्यांनी कधी थारा दिला नाही.अहंकाराला त्यांनी आपल्या आसपास देखील भटकू दिलं नाही.जवळ जवळ आपल्या ठाई असणारी आठ ते दहा एकर जमीन ते आपल्या उत्तम नियोजनाने आणि जमीन करणाऱ्या वातकर्यांच्या मदतीने अतिशय उत्तमरीत्या सांभाळतात.गेली दहा वर्षे मी पाहतो,म्हणजे सचिन यांनी ज्यावेळी आपल सगळं लक्ष शेतीत केंद्रित केलं त्यावेळेपासून इतरांनी आदर्श घ्यावा अशी शेती करतात.उस पिकाबरोबर ते कलिंगड,टोमॅटो,मिरची अशी माळव्याची पिकं देखील उत्कृष्ट पद्धतीने घेतात.आजच शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि पिकांच्या आणि हवामानाचा पिकांवर होणारा चांगला वाईट परिणाम या सगळ्या गोष्टींचा सचिन यांना गेल्या आठ,दहा वर्षाचा प्रात्यक्षिक अनुभव गाठीला आहे.🙏
मुळात शेतीची असणारी आवड आणि त्यामुळेच शेतीत करत असलेले नवनवीन प्रयोग यामुळे सचिन हे शेतीच्या प्रगतीत उंच उंच टप्पे पार करत आहेत.आपल्या अनुभवाचा आपल्या इतर शेतकरी बांधवांना उपयोग व्हावा म्हणून गरज पडेल तेंव्हा ते इतरांना सुद्धा मार्गदर्शन करतात.इतकेच नव्हे तर एखादी शंका असेल तर स्वतः प्लॉट वरती येवून पिकाची अवस्था बघून सल्ला मसलत करतात.एकदा पीक पाहिलं की त्वरित यावर कोणती लागलागवड करावी किंवा कोणत औषध वापरावं हे लगेच सांगतात.👍
गावात राजकीय चार स्थानिक गट आहेत.आपल्याला माहीत आहे की आजची तरुण पिढी या निरुपयोगी राजकारणात किती व्यस्त आणि सक्रिय असते. सचिन पाटील मात्र या राजकारणापासून चार हात स्वतःला दूर ठेवतात.पहीला तुम्ही स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा आर्थिक समतोल हा योग्य स्थिरस्थावर करा.प्रथम प्राधान्य त्याला द्या आणि मग फावल्या वेळेत राजकारण करा. अस ते वारंवार सांगतात.तुम्ही सर्व बाजूंनी आर्थिक सक्षम असाल तरच या सगळ्या गोष्टी केलेला उपयोग होईल.नाहीतर तुमचा या राजकारणात निव्वळ वापर होईल आणि कालांतरानं तुम्ही आयुष्यातील तुमच्या मुख्य उद्देशापासून दूर फेकला गेलाय याची खात्री पटेल पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल,अस त्यांचं ठाम मत असतं.🌹
सचिन पाटील हे सर्व सामाजिक कार्यामध्ये आणि समारंभामध्ये अगत्याने उपस्थित असतात.त्यांनी आजपर्यंत आपल सरळ,साधं आणि प्रेमळ असणारं व्यक्तिमत्व जपल आहे.🙏
आज सचिन भाऊ यांचा जन्म दीन असल्यामुळे माझ्या मनातील त्यांच्याविषयी असणाऱ्या भावना मी शब्दात व्यक्त करत आहे.
सचिन भाऊ यांना त्यांच्या जन्म दिनी मी माझ्या आणि माझ्या कुटुंबातर्फे तसेच संपूर्ण ग्रामस्थांच्यातर्फे खूप खूप शभेच्छा देतो.त्यांना उदंड आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो..........🙏✍️
धन्यवाद...🙏
लेखन : श्री. दत्तात्रय के.पाटील,गलगले.
M - 7058098139.
🙏सचिन पाटील समाजप्रिय व्यक्तिमत्व✍️

181 

Share


दत्तात्रय केरबा पाटील
Written by
दत्तात्रय केरबा पाटील

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad