Bluepad | Bluepad
Bluepad
शिक्षण हेच जीवनातील चमत्काराचे उत्तम माध्यम
गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
21st Nov, 2022

Share

शिक्षण हेच जीवनातील चमत्काराचे उत्तम माध्यम-गणेश खाडे
करमाळा (प्रतिनिधी)- यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था पुणे शाखा करमाळा व वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा सोलापूरच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा/विद्यार्थींनीचा गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम करमाळा येथे पार पडला यावेळी कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावरुन मनोगत व्यक्त करतांना श्री.गणेश खाडे यांनी म्हटले की, शिक्षण हेच जीवनातील चमत्काराचे उत्तम माध्यम आहे त्यामुळे आपलं जीवन बदलयाच असेल तर पुस्तकाच्या प्रति समर्पित झालं पाहिजे यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष गणेश भाऊ (आबा) करे पाटील, वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे राज्य शिक्षक आघाडीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब बुधवंत, वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे तरूण तडफदार अष्टपैलू जिल्हाध्यक्ष सयाजीराव राजे ओंबासे यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था पुणे शाखा करमाळा व वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा सोलापूरच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र भुषण तथा ज्यांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन अनेक देशातुन भेटीचं निमंत्रण-आमंत्रण असणारे कित्येक देशातील विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी बहुतांश देश भ्रमण केलेले महाराष्ट्र राज्याचे सुपुत्र व शिक्षण क्षेत्रातील आधुनिक भगिरथ समाजसेवक यश कल्याणी शाखा करमाळ्याचे अध्यक्ष गणेश भाऊ (आबा) करे पाटील ज्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शब्द सुद्धा आपुरे पडतील अशी यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था व वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे राज्य शिक्षक आघाडीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब बुधवंत व वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे तरूण तडफदार अष्टपैलू जिल्हाध्यक्ष सयाजीराव राजे ओंबासे यांच्या संकल्पनेतून करमाळा तालुक्यातील मागील सहा महिन्यांत विविध प्रकारच्या स्पर्धात्मक परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत उमेदवार व पालक यांचा गुणगौरव सोहळा दिनांक 19/11/2022 रोजी दुपारी एक वाजता भव्य स्वरूपात पार पडला आणि या गुण गौरव सोहळ्याला वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक गणेश खाडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते आणि आपल्या अध्यक्षीय समारोपाच्या अनुषंगाने शिक्षणाचं महत्त्व विशद करताना आपले विचार मांडले यश कल्याणी ही सामाजिक परिवर्तनाची जननी ठरले अशी अपेक्षा व्यक्त करत शिक्षणाचा आपल्या जीवनातील महत्व काय तर आपली ही रातोरात बदलायची ताकद ,झोपडीतुन महालात घेऊन जाण्याची ताकद गल्लीतुन थेट विदेशात जाण्याची क्षमता निर्माण करण्याची ताकद शिक्षणात आहे म्हणून आपलं जीवन बदलयाच असेल तर पुस्तकाच्या प्रति समर्पित झालं पाहिजे . शिक्षण ही ज्ञागगंगा आहे याचं गंगोत्रीमध्ये आपण उच्चतम प्रतिच स्नान करून आपलं आयुष्य पुणित सुरक्षित करण गरजेच आहे. यश कल्याणी या सेवाभावी संस्थेचे करमाळ्या सारख्या दुष्काळी भागातील हजारो विद्यार्थ्यांच भविष्यात घडविण्या मध्ये मोलाचं योगदान आणि हे योगदान महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा व इतर भागात सुद्धा आपला कार्य विस्तार करावा अशी अपेक्षा गणेश खाडे यांनी आदरणीय महाराष्ट्र भूषण गणेश भाऊ करे पाटील यांच्या कडे व्यक्त केली . आणि शिक्षणाचं महत्त्व आणि यश कल्याणी च योगदान तसेच आयोजक यांचे गौरव पुर्ण कार्य बद्दल गौरव करून उल्हास पुर्ण वातावरणात हा अविस्मरणीय सोहळा पार पडला .
यावेळी कार्यक्रमाला दादा बुधवंत, देवेंद्र जाधवर, सदाशिव वनवे, संजय मुंडे, कमलाकर सांगळे, किरण सानप, संदीप ढाकणे, सुदर्शन केकाण, अशोक मुंडे, रामहारी जाधवर, श्रीराम बिनवडे, चंद्रकांत जाधवर, उषा ओंबासे, वनिता बडे, सौ.उगलमुगले मॅडम, सौ.जाधवर मॅडम यांची उपस्थिती होती.
शिक्षण हेच जीवनातील चमत्काराचे उत्तम माध्यम

170 

Share


गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad