Bluepad | Bluepad
Bluepad
महाराष्ट्राचं रक्त इतकं थंड कसं पडलंय?
M
Mahadev Tukaram Mali
21st Nov, 2022

Share

*महाराष्ट्राचं रक्त इतकं थंड कसं पडलंय?*
महाराष्ट्राचे राज्यपाल कोशारी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची खिल्ली उडवतात, आता तर त्यांनी कहरच केला आहे, छत्रपती शिवराय यांच्या बाबतीत त्यांनी अतिशय हीन मनोवृत्ती दाखविली आहे! याला काय म्हणावे? ज्या छत्रपती शिवराय यांच्या पराक्रमाचे पोवाडे गायले जातात त्यांची सुध्दा खिल्ली उडविली जाते हा काय प्रकार आहे?
राज्यपाल कोशारी यांचे हे वक्तव्य निषेधार्ह आहेच पण त्याहून आम्हाला राग येत नाही हे जास्त निषेधार्ह आहे! बहुजनांच्या श्रध्दास्थानांवर असे हल्ले करून त्यांची शक्ती क्षीण करण्याचा हा डाव आहे.भाजपाचे प्रवक्ते सुधांशू यांनी छत्रपती शिवराय यांच्या बाबतीत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. बहुतांश बहुजन नेते भाजपामध्ये जाऊन सत्तेची पदे भोगत आहेत,त्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा संबंध उरलेला नाही! छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आज बाजार मांडला जात आहे.ही अतिशय दुर्दैवी बाब आहे.इथं पुरोगामी की प्रतिगामी हा प्रश्न नाही तर आपण कोणत्या विचारधारेचे आहोत हा खरा प्रश्न आहे?
वीर सावरकर यांच्या बाबतीत राहुल गांधी यांनी वक्तव्य केल्यानंतर चवताळून उठणारे भाजपाचे प्रवक्ते कोणत्या बिळात दडून बसले आहेत? हा प्रश्न महाराष्ट्रातील जनता विचारत आहे.बेलगाम राज्यपालांना लगाम का घातला जात नाही?की ठरवून हे सगळं होत आहे?आज महाराष्ट्राला जाणीवपूर्वक कमकुवत केलं जात आहे! महाराष्ट्र ही संतांची आणि समाज सुधारक यांची भूमी आहे, इथल्या संतांना, समाज सुधारक यांना लक्ष्य केले जात आहे आणि ते महाराष्ट्राने हलक्यात घेतल्यामुळे छत्रपती शिवराय यांना लक्ष्य केले आहे.सहज उल्लेख केल्याप्रमाणे करायचे आणि पध्दतशीरपणे बदनामीकारक वक्तव्ये करायची ही जुनी खोड भाजपाच्या नेत्यांना जडली आहे.
विद्वत्तेचा टेंभा मिरवणार्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला डिवचण्याचे पाप करु नये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वारसांनी आता तरी गांभीर्याने विचार करावा. या बदनामीकारक वक्तव्याचा निषेध महाराष्ट्र करत आहे अशा वेळी छत्रपतींच्या गादीच्या वारसांनी याचा सक्रिय निषेध नोंदवला पाहिजे. छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजी राजे यांनी निषेध केला आहे परंतु हा निषेध पुरेसा नाही ! अशा परिस्थितीत महाराष्ट्र एकवटला पाहिजे आणि जे जे कोणी अशी बदनामी करतील त्यांना धडा शिकवला पाहिजे.अन्यथा काळ सोकावेल! महाराष्ट्राचं रक्त थंड नाही तर आमच्या अस्मितांवर हल्ला करणार्यांची अवस्था किती वाईट होते हे दाखवून दिले पाहिजे तरच हे उद्योग थांबतील!
*महादेव माळी, हिंगणगाव,ता.कवठेमहांकाळ*
मो.नं.9923624545
महाराष्ट्राचं रक्त इतकं थंड कसं पडलंय?
महाराष्ट्राचं रक्त इतकं थंड कसं पडलंय?

181 

Share


M
Written by
Mahadev Tukaram Mali

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad