Bluepad | Bluepad
Bluepad
लळां...
sudhakar manwatkar
sudhakar manwatkar
21st Nov, 2022

Share

माझ्याच जखमांनी
माझा गळा चिरला.
झाल्या अनेक जखमां
त्यांचा लळा लागला.
भरकटलो अनेकदा
मी तुला शोधताना.
हरवण्याचा मला जरा
कुठे तो लळा लागला.
शिकलो वाचायला
मी माणसांचे चेहरे.
अनेकदा चेहऱ्यावर
समोर तो फळा पाहिला.
ठेवले जपून मी तुझ्या
आठवणी जीवापाड सखें.
जिर्ण झालेल्या ह्या भिंती
आतून कुठे जरा तडा गेला.
तु लावलेल्या त्या झाडांना
मी आजही जपून आहे.
तु माळलेल्या त्या गजरांचा
आज जरी पालापाचोळा झाला.
-
सुधाकर शिवाजी मानवतकर
बुलडाणा.
7276175143

170 

Share


sudhakar manwatkar
Written by
sudhakar manwatkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad