Bluepad | Bluepad
Bluepad
जीवन!काय आहे?
anjali bhalshankar
anjali bhalshankar
20th Nov, 2022

Share

जीवन? काय आहे जीवन ?काळी, कुळकुळीत, ऊन्हा॓ने, भेगाळलेली,रापलेली तप्त भूमी. तहानेने व्याकुळ झालेली सुर्याची सहस्त्र दाहक कीरण झेलणारी सहनशक्तीच्या मर्यादेचं मूर्त स्वरूप म्हणजे धरती ती सहन करते,सोसत रहाते दाह! कसलीही तक्रार न करता कारण तीला ठावुक आहे आभाळाच्या अंगणात एक दिवस,अगणित नभ तयार होतील असे नभ जे लक्षाधीश थेंबानी भरलेले असतील जे थेंब सूर्याने आपल्या प्रचंड ताकदीने धरतीतुन शोशुन घेतले तिच्या कणाकणातला ओलावा लोप पावला,सौंदर्य लुप्त झाले सगळेच संपले धरती अस्ताव्यस्त भकास ! तरीही ही रापलेली माती शांत आहे संयमाने,सोसतेय ती पीडा.तिला ठाऊक आहे ,प्रखर तेजस्वी लख्ख आभाळाला ,पाण्याने भरलेले ढग व्यापनार आहेत एक ना एक दिवस, इतकेच काय, सुर्याला ही काही काळ ढग दडवून ठेवतील याची पुर्ण खात्री आहे धरतीला म्हणूनच ती शांत रहाते संयम राखते आणि तो दिवस ऊगवतो लख्ख सुर्याला काळेकुट्ट ढग घेरतात आकाशात मेघांची दाटी होऊन, नीळ पिवळ्या आभाळात काळया करड्या तांबुस रंगाची गर्दी दाटून येते एकमेकावर आपटून ढग गडगडाट करतात ज्यामधून प्रचंड शक्तीशाली विजांची निर्मिती होते काळ्या करड्या ढगांना चिरडून विजा कडकडाट करतात. जणू ते, आव्हान असते सुर्याला, सार्याच्या दाहकतेला, काही वेळातच सुरू होणार्या पावसाच्या ताडवांची वर्दीच म्हणा हवं तर! सहस्त्र प्रकाश वर्ष दुर असणार्या आसमंतात एकत्र जमा होऊन, हजारो मेघ एकाच वेळी बरसतात तो अभिषेक असतो तापलेल्या रापलेल्या धरतीवर सूर्याने केलेला अभिषेक होय!सूर्यानेच तो मवाळ होऊन विझलाय आता .त्याने आपले तेजपुंज रूप ढगांच्या आड दडवले त्याच्या केंद्र बिंदू तुन ,निर्माण होणार्या प्रकाशाच्या किरणांनी शोशलेला एकेक कण ढगांना बहाल केला ढगांनी धरतीला परत केला.पाऊस कानाकोपऱ्यात झिरपला खोलवर भुईच्या भेगाळलेल्या सर्वांगावर चौफेर वर्षाव केला पावसान रोनोमाळ, खाचखळगे, चढऊतार ,ऊजाड माळ जीर्ण खंडर, उध्वस्त ओसाड दर्या डोंगरातून, आटलेल्या कोरडेठाक नदी नाल्या तुन क्षारांनी भरलेल्या समुद्रात कोरडवाहू जमिनी, तळ दिसणाऱ्या विहीरी,जिथे तिथं बरसला पाऊस बेभान बेधुंद बेसूमार ऊधान होऊन बरसला पाऊस! जमीनीचे तडे , भेगाळलेल्या धरतीच्या जखमा चिखल पाण्याने भरू लागल्या, पाऊस बरसत रहातो काहीसा वेग मंदावून हळुवारपणे धरतीवर नाचत राहतो दिवसरात्र सरून लागतात एकसंध धरतीचे सौंदर्य अप्रतिम खुलुन येते चहुकडे एक वेगळीच चेतना निर्माण होते नव्यानं पावसाचा नादखुळा खेळ सुरू होतो क्षणात चंदेरी चाहुल दुसर्या च क्षणाला रीपरीप ,टिपटिप तुषारांची बरसात असे हे उत्सवाचे,दिवस हळुहळु सरू लागतात.आणि एक दिवस पाऊस पिऊन तृप्त झालेल्या धरतीच्या कुशीतुन नाजुकसा कोमलसा,अंकुर फुलुन येतो. होय! धरतीच्या कुशीतुन जन्म घेतलेला,हिरव्या गर्द कोवळ्या सृजनाचा,सृष्टीचा चैतन्यमयी अविष्कार आपण पहातो जीवन धन्य होतं.मन तृप्त होते. काही काळापूर्वी चे ओसाड, ऊजाड अस्वस्थ छिन्नविच्छिन्न विद्रूप जगं स्वर्गीय सौंदर्याने नटलेले असते सजिवांचे निर्माण!सृजणाचा जन्म. काहीच काळापूर्वी पृथ्वीच्या गर्भातील कनाकनांचे निर्वाण झाले होते शुष्क कोरड्या ओसाड भूमी तळपत होती. आताचे हे नवे चैतन्य,नवी पालवी ,नवा साज, नवा बहर ,नवा शृंगार, सौंदर्याचा कहर.सोहळा,नवनिर्मितीचा, नव्या जन्माचा, धरतीच्या टोकापासून आसमंताला भिडणारे हे निसर्गाचे चक्र माणसाला जगण्याची जाणिव करून देते नवनिर्माणाचे तत्व समजावते. शिवारातले हिरवे स्वप्न मनात फुलवते. दर्या, डोंगर, नद्या, पर्वत, समुद्र, झरे,नदी, नाले, ओढे, विहीरी, पानथळ आणि पानापानातून निथळणारे अमृत प्राशन करा. जमेल तसे साठवुन घ्या डोळयात मनात हदयात. हा हिरवा गच्च बहर तनामनात जपा निसर्गालाही कवेत घ्या आनंदमयी व्हा जगा !आनदी जगा!मरणाआधी जगुन घया!सृष्टीतील अनंत अगणित, असंख्य रूपे समजुन घ्या!आपण जगतोय! कालचक्राच्या गतीने आपण आपण बांधले आहोत.कालचक्र!कालचक्राची गती थोडीच थांबणार आहे,नाही ना! दिवस सरतील ऋतु आपले कार्य नेटाने सुरू ठेवेल पुन्हा पानगळ सुरू होइल...........पुन्हा जुणाच क्रम नव्याने सुरू होईल.... कालचक्रा च्या गतीवर ऋतुचक्र फिरत रहातील......जुनी पानं गळून जातील नव्या पालव्यांना जागा करून देण्यासाठी...हेच असावे जीवणं होय!असंच आहे माणसाचं जीवन ...अंजली भालशंकर पुणे पाऊस वेचताना.काव्यसंग्रह माध्यान्ह आत्मचरित्र लवकरच येत आहे मुठेच्या काठावरून..ललितलेखन.

221 

Share


anjali bhalshankar
Written by
anjali bhalshankar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad