Bluepad | Bluepad
Bluepad
यालाच प्रेम म्हणतात.....
Avanti .
Avanti .
20th Nov, 2022

Share

त्याच आणि माझं नातं
अगदी आधी सारखं झालं असं नाही
आम्ही बोलायला सुरुवात केली
रोज न चुकता कॉल करतो
चुकल्यावर आधी सारखं भांडण न करता
एक सॉरी म्हटलं जातं
आमच्या आधी सारख्याच गप्पा
हसणं
जुन्या आठवणी रमून जाणं
पण खरंच ते नातं आधी सारखं झालंय का
या गोष्टीचा प्रश्न पडतो
अपेक्षा जरी संपल्या असल्या
आणि मैत्रीची एक नवी सुरुवात जरी केली असली
तरी दोघांमधलं प्रेम संपलं की उरला या गोष्टीचा प्रश्न पडतो
आपण त्या व्यक्ती सोबत बोलत आहोत
पण खरंच आपलं त्या व्यक्तीवर प्रेम आहे म्हणून
तो व्यक्ती आपल्यावर प्रेम करतो का आत्ता पण
असे भरपूर प्रश्न मनात गोंधळ करतात
नातं संपलं तरी प्रेम उरत असे म्हणतात हे खरंच काय
की आयुष्यात
आपल्याला जोपर्यंत एखादा व्यक्ती मिळत नाही
तोपर्यंत आपण त्या व्यक्तीत गुंतून राहतो
स्वतःच्या मनाला समाधान मिळवण्यासाठी
स्वतःच्या हृदयाला सावरण्यासाठी
कोणीतरी आपल्यावर प्रेम करत होतं
या गोष्टीसाठीच आपण त्या व्यक्तीमध्ये गुंतून राहतो

189 

Share


Avanti .
Written by
Avanti .

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad