Bluepad | Bluepad
Bluepad
LOVE is LIFE❤LIFE is LOVE( part-2)
नाम नहीं बताऊंगा
नाम नहीं बताऊंगा
20th Nov, 2022

Share

मित्रांनो हा पार्ट समजण्यासाठी तुम्ही आधी पार्ट one वाचा
20 नोव्हेंबर 2022
आज 5 वाजता गेलोच वाघमारे कडे पण तो अजून आला नव्हता मग मी कॉल केला तर येत होता. पण नीट बोलला नाही तिथंच मला जरा वाईट वाटलं.
नंतर तो आला माझ्याशी फार बोलला नाही आणि डायरेक्ट कपडे धुवायला लागला. कपडे धूत धूत थोडं बोलत होता पण त्यात एक कडवट पणा जाणवत होता.
मग ते झालं कि लगेच त्याने शेंगदाणे आणले होते ते लावायला घेतले खूप वेळ ते काम चालू होतं. तेव्हाच तिथे मेंढपाळ लोक आले त्यांच्याशी सहजच गप्पा चालल्या होत्या एक मेकांबद्दल. तर त्यांनी विचारलं हा तुमचा कोण तर वाघमारे सांगितलं हा माझ्या कामातला आहे आणि तिथेच माझा सगळा मूड off झाला. माझी अपेक्षा होती कि किमान कायतरी वेगळं सांगायला पाहिजे होतं. खूप वाईट पण बोललो जाऊदे. मग ते झालं थोडंच बसलो आणि म सांगताच निघालो. तो बोललं st ने जा मी काहीच न बोलता पुढे चालत राहिलो पुन्हा त्याने आवाज मी नुसती मान डोलवली आणि पुढे चालत राहिलो.
घरी येताना मला सुचलेली दोनच वाक्य मी मनात बोलत होतो.
😳उशिरा आलेलं पीक आणि उशिरा भेटलेली माणसं आयुष्यात काहीच उपयोगाची नसतात.
😳एखाद्यासाठी चांदनासारखं झिजावं पण फक्त याची काळजी घावी कि त्याने तुम्हाला लाकूड समजू नये.
आता ठरवलं कि पैसे कमवायचे बस. पैशानं प्रेम पण विकत घेता येत.
➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️
27 नोव्हेंबर 2022,
आज आजचा दिवस खूप वाईट गेला 😭कदाचित आमच्या love journey मधला शेवटचा दिवस असावा. तर झालं असं कि आज 5 वाजता मी वाघमारे कडे गेलो होतो खरतर जायच कारण हे होतं कि संजय गांधी योजनेच त्याला सांगायचं होतं.
मी गेलो पण तो अजून आला नव्हता. मी थोडी वाट बघितली. पण आला नाही मग मी उभा राहिलो आणि त्याच्या वाटेकडे एकटक डोळे लावून बसलो. वाट पाहणं काय असतं ते मला समजलं. आणि शेवटी आला काळजात असं धस्स झालं.
पण भेट झाली आणि त्याच्या चेहऱ्यावर जी expression होती त्यातच मला समजलं कि याला मी इथे आलेलं आवडलं नाही. आणि तिथेच माझा मूड off झाला तरी मी काय बोललो नाय. मग थोडया वेळाने हॉटेल मधले त्याच्या दोघे आले त्यांना घर दाखवलं माझ्या पण ओळखीचे होते. मी सहजच एकाला बोललो कसं आहे माझं घर पण या वाक्यामुळे पुढे एवढं काय होईल याचा मला अंदाज नव्हता ते पुढे सांगतो. मग ते आल्यामुळे मला तिथे थांबावं वाटत नव्हतं. मग मी मुद्दाम फोन आल्याचं नाटक केल आणि सरळ निघून गेलो. न सांगताच. मी विचार केला कि तो फोन करेल कि कुठे गेलास पण नाय केला. मग मी म्हटलं पुन्हा येऊ कधीतरी. आणि संध्याकाळी 8 वाजता त्यांचा फोन आला रागातच होता. आधी बोलला कुठे गायब झालास मी म्हटलं काम होतं. मग म्हणाला मघाशी रामभाव ला काय बोललास माझं घर आहे म्हणून. मी हो माझंच आहे तो म्हणाला तूझ्या बापाने बांधलंय का मी म्हटलं हो माझ्या बापाने बांधलंय. मला वाटलं सहजच बोलतोय पण त्यात खूप मोठा अर्थ आणि राग दडलेला होता. म्हणला मला काय पोर बाळ नाय का मी माझ्या पोरीसाठी हे घर बांधलंय. असं नाय बोलायच मी म्हटलं त्यात काय झालं तू काय दारू पिलाय का. ते जे तो शब्द बोलला ना मी कधीच विसरणार नाय. त्याच्या बोलण्याचा अर्थ असा होता कि तू काय माझं घर घ्यायला माझ्यावर प्रेम करतोय का. मला समजलं ते. पण मी अगदी निःस्वार्थ मनानं प्रेम केलंय. पण त्याला शेवटी नाय समजलं. नंतर मला खूप खूप त्रास झाला बाहेर जाऊन मी रडलो पण. आता कशातच मन लागत नाही फक्त तेच डोक्यात. आता मी विचार करतोय कि भोर सोडायच आणि बाहेर कुठे तरी जायच खूप खूप पैसे कमवायचे आणि मगच त्याला भेटायचं. आणि मला नाय वाटत आता मी त्याला परत भेटेल. त्याचा नंबर पण डिलीट केला हिस्टरी डिलीट केली trucaller ला नाव येत आणि डिलीट होतं नाही म्हणून ती app पण डिलीट केली आता बघू काय होतंय. पण वाटलं नव्हतं या प्रवासाचा असा शेवट होईल. 😭😭😭😭😭पण कुणीतरी म्हणलंय "वो प्यार ही क्या जो दर्द ना दे '😭😭😭😭😭ok byy. I always love u dear😭😭😭😭❤

186 

Share


नाम नहीं बताऊंगा
Written by
नाम नहीं बताऊंगा

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad