Bluepad | Bluepad
Bluepad
मी अशी
Anjali Wadurkar
Anjali Wadurkar
20th Nov, 2022

Share

मी अशी निस्तब्ध का! माझ्या भावना माझे शब्द आज मला छळत आहे. स्वतःतील नकारात्मक भाव कधी डोळ्यापुढे आणले ना तर स्वतःचा तिरस्कार करायला मी मागेपुढे बघत नाही, पण दुसऱ्यांना साथ द्यायची असेल तेव्हा मात्र त्याला होकारार्थकपणे, मी चा अहंकार सोडून त्याला नेहमी प्रेरित करते. असे का? या माझ्या जीवनात मी माझी कधी झाले हा प्रश्न? पडलाय मला मी दुसऱ्यांवरती जीव ओवाळून देते का ?अजूनही मी स्वतःला ओळखून सुद्धा अनभिज्ञ असते मी जेव्हा एकटी असते तेव्हा माझ्यातला एकटं पणा माझ्यातली मी नेहमी डोळ्यातून अश्रू पडतात. माझ्या प्रत्येक काटेरी वाटेत मी एकटी चालते. मला आत्तापर्यंत कधी दुसऱ्यांकडून प्रेम मिळालंच नाही. याचा विचार मी आज केलाय. आज मला जाणीव झाली का? मी कुणासाठी एवढी धडपडते. का? मी माझं सर्वस्व दुसऱ्यावर ओवाळून टाकती आहे. मनातील भावना नाजूक असतात. त्याचा मनावर फार परिणाम होतो माझ्या मनातील प्रेम प्रत्येकांसाठी शुद्ध प्रत्येकांसाठी हवंसं समोरच्याला जाणीव आहे की नाही याचं मात्र मला भान नाही. कधीतरी आरशात बघून स्वतःला मी सुंदर म्हणणारी माझातील चांगल्या सवयी आणि वाईट सवयी याच मी नेहमी निरीक्षण करणारी आज मला प्रश्न? पडलाय का?जीवाची घालमेल करते.कोणासाठी करते. याची मला कल्पना नाही. अजून पण फार वाईट वाटतं एका गोष्टीचं मी जर दुसऱ्यावर प्रेम करत असेल ना तर चूक माझी सुद्धा नाही आणि त्याच्यावर मी प्रेम करते तो अनभिज्ञ असेल किंवा मग त्याला त्याची जाणीवही असेल. पण तरी तो दुर्लक्ष करत असेल का? काय आहे ना मतलबी आयुष्यात नाती जोडायला संबंध जोडायला काहीच वेळ लागत नाही. पण जेव्हा व्यक्ती टिकवावी लागते ना तेव्हा मात्र त्याचा परिणाम फार वेगळा असतो. डोळ्यातील अश्रू अनमोल असतात. त्या अनमोल अश्रू ची किंमत फक्त आपल्याला माहिती पण तेच अश्रू जर दुसऱ्यासाठी पडत असेल, ना तर माझ्या अश्रू ची किंमत समोरच्याला हवी पण जेव्हा अश्रू ची किंमत समोरच्याला नसेल ना, तर तो महत्त्वाचा नाही असं मी समजेल, कारण माझ्या आयुष्यात माझ्या जगण्यात मला कुठेतरी मतलबीपणा घ्यायला हवा की नको मी स्वार्थी नाही होऊ शकत ना तो गुणच नाही माझ्यात समोरचा व्यक्ती फार सरळ बोलून देतो की माझ्याकडे वेळ नाही मी बोलू शकत नाही मी कामात आहे. माझ्याकडे भरपूर वेळ असूनही जर मी त्याला म्हटलं की माझ्याकडे वेळ नाही. मी बोलू शकत नाही तेव्हा मात्र समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येईल की ही मला आता इग्नोर करतीये. ऐकाव ते नवलच करावते नवलच मी का? बरं समोरच्या व्यक्तीच ऐकत असेल जेव्हा वेळ माझी येते ना मी कोणाला काही सांगावं मी काही समोरच्याला बोलावं तर त्यावर काय उत्तर येणार याचे उत्तर मला आधीपासूनच माहिती असतं मग का? असे मी समोरच्यांना प्रश्न करते. सगळं माहिती आहे कारणही माहिती समोरचा व्यक्ती कसा आहे हे सुद्धा माहिती आहे. जेव्हा कोणी माझ्याकडून अपेक्षा ठेवत. त्या मी पूर्ण करते पण जेव्हा मी समोरच्याकडून अपेक्षा केला तर तेव्हा मला नेहमी नाही या शब्दात उत्तर मिळतं कितपत योग्य आहे असा प्रश्न मला आज पडलाय मी आत्तापर्यंत ना प्रेम, माणसं, आयुष्य ,किंमत, या विषयावरच लिहिण्यात आले पण कधी मी स्वतः विषयी लिहिलं असेल का तर नाही. पण आज मला या गोष्टीची फार जाणीव झाली आहे की कुणासाठी लिहिलं हे कुठपर्यंत योग्य आहे कारण की आपलं समोरच्यांवर प्रेम आहे आपण त्याला जपतो त्या व्यक्तीची काळजी घेतो त्या व्यक्तीच्या मनातून कधी अशी भावना निघत असेल का? हा प्रश्न कधीतरी स्वतःला विचारा मी माझ्या लेखणीतून माझं कौतुकही करेल पण आज मला सातत्याने प्रश्न पडत आहे. आज खरच मला कुठेतरी स्वतःची लाज वाटते आहे. माझ्या लेखन कौशल्यातून मी फक्त माझ्या आयुष्यात येणाऱ्या काही काळ टिकणाऱ्या व्यक्ती विषयी मी या सगळ्या गोष्टी लिहिते आहे. पण या लेखन कौशल्यत मी भावना मांडती आहे पण माझ्या लेखणीतून निघालेले प्रत्येक बोल ही त्रिकालवादी सत्य आहे. मग माझ्या भावना दीर्घकाळासाठी असूनही याची जाणीव समोरच्या व्यक्तीला कधी होणार .आज तो व्यक्ती माझ्याबरोबर आहे म्हणून मी त्या व्यक्तीविषयी लिहिती तो आयुष्यातून निघाला की माझ्या लेखणीला पूर्णविराम मिळणार तर नाहीच नाही मग निघेल ते नकारात्मक भाव का? पण कशासाठी मग जुन्या आठवणीच्या पसाराला पुन्हा नव्याने ओळख द्या, कशासाठी आज मी लिहिते आज मी बोलतेय आज मी स्वतः व्यक्त होते स्वतःशी मला कधी कधी स्वतःला असे बरेच वेगळे प्रश्न पडतात त्याचे उत्तरही मला सापडत नाही मग असं वाटतं की विचाराव बघाव कुणाला तरी याचे उत्तर समोरचा व्यक्ती लेखक असला तर नक्की तो मला समजून घेईल पण सामान्य व्यक्ती तो त्याच्या कुवतीप्रमाणे समजून घेईल. मला जर त्यांचं पटलं तर ते योग्य आणि जर नाही पटलं तर मात्र विरोध आयुष्यात ना राग येणारच प्रेम हे होणारच, आणि प्रेम असल्यावर माया ती येणारच. आज मी फक्त बोलणार आहे आणि माझ्या हातातील लेखणी आयुष्यभरासाठी जतन करणाऱ आहे आज स्वतःशी म्हणून मोकळेपणाने मी मारलेल्या गप्पा मी लिहिलेले माझे बोल माझ्या चांगल्या आणि वाईट वेळेसाठी आठवणीत राहील अशी मी निस्तब्ध.
अंजली वडुरकर

173 

Share


Anjali Wadurkar
Written by
Anjali Wadurkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad