Bluepad | Bluepad
Bluepad
शिक्षणाबरोबर आर्थिक ज्ञान असायलाच हवे.
S
Somnath M Gurav
20th Nov, 2022

Share

शिक्षण हे तसे मानवी जीवन सक्षम करणारे एक अत्यंत प्रभावी माध्यम. व्यक्तीमत्व विकास व व्यक्तीमत्वाची अंतर्गत जाणीव, विचार करायला लावणारी गोष्ट माणूस शिक्षणातून शिकतो. शाळा, महाविद्यालये यातून शिक्षण घेत माणूस सुशिक्षित होतो व स्पर्धेच्या जगात नोकरीसाठी धडपडतो व काही प्रयत्नानंतर नोकरी मिळवून जीवन जगू लागतो. हे एक चालू असणारे चक्र. नोकरी व मिळणार्‍या पैशातून रोजच्या जीवनात गरजा भागवत असताना पैशाच्या उद्भवणाऱ्या अडचणी यामुळे तो त्रासून जातो कारण शिक्षणाने ज्ञान तर प्राप्त झालेले असतेच पण आर्थिक व्यवस्थापन करण्याचे ज्ञान मात्र आलेले नसते. शिक्षणामुळे माणूस विज्ञान, वाणिज्य, कला या विषयामध्ये तरबेज बनतो पण आर्थिक विषयात बनतो का ??? नाही कारण आपल्याला शाळेत शिकत असताना आर्थिक व्यवस्थापन कसे करायचे व पैशाविषयी शिकवले जात नाही आणि यामुळेच माणूस पुढील आयुष्यात आर्थिक गोष्टी मध्ये सक्षम वाटत नाही. आज शिक्षणाबरोबर आर्थिक ज्ञान देणारा एक विषय सर्व अभ्यासक्रमात अनिवार्य करणे अत्यंत गरजेचे आहे आणि यामुळेच विद्यार्थी भावी आयुष्यात पैशाचे व्यवस्थापन करून चांगले जीवन जगू शकेल. आज आपण सगळीकडे पाहतो की ज्या समस्या आहेत त्यातल्या 99% समस्या तर पैशाच्या बाबतीत असतात आणि या समस्या उद्भवण्याची कारणे म्हणजे पैशाचे व्यवस्थित नियोजन नसणे हेच असते. म्हणूनच शालेय अभ्यासक्रमात पैशाविषयी व त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी कौशल्ये विकसित करणारा विषय अभ्यासक्रमात असणे अनिवार्य असावे. यामुळे भविष्यात जीवन जगत असताना विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकेल, कारण आज डिग्री कितीही मोठी असली तरीही आर्थिक व्यवस्थापन करायचे ज्ञान नसेल तर माणूस जीवनात यशस्वी होताना दिसत नाही. यासाठीच आर्थिक व्यवस्थापनाचे ज्ञान असायलाच हवे. म्हणूनच अर्थसाक्षरता हि सुद्धा एक काळाची गरज बनलेली आहे.

175 

Share


S
Written by
Somnath M Gurav

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad