Bluepad | Bluepad
Bluepad
राज्यात सुरू असलेला " तीन पैश्याचा तमाशा," बंद होणे,राज्याच्या हिताचे,
दीपक व्य.मोहिते
दीपक व्य.मोहिते
20th Nov, 2022

Share

सुर्यातीर,
दीपक मोहिते,
राज्यात सुरू असलेला " तीन पैश्याचा तमाशा," बंद होणे,राज्याच्या हिताचे,
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची " राष्ट्र जोडो यात्रा," सध्या फॉर्मात आहे.आज या यात्रेला ८० दिवस पूर्ण होत आहेत.गेल्या ७ नोव्हें.रोजी यात्रेचे आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आगमन झाले.या यात्रेला केरळ,
तेलंगणा व महाराष्ट्रात लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.हे चित्र काँग्रेसजनासाठी उत्साहजनक असून पक्षाला संजीवनी देणारे आहे.या यात्रेची सुरुवात केरळ राज्यातून झाली.शांततेत सुरू झालेली ही यात्रा कर्नाटक,तेलंगणा करत महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यात आली.सध्या तिचा विदर्भात दौरा सुरू आहे.येथून ती पुढे इतर राज्यात जाणार आहे.गेल्या ८० दिवसाच्या काळात राहुल गांधी यांनी लोकांशी संवाद,महागाईवर घणाघाती टीका व केंद्रसरकारला सर्व आघाडीवर आलेले अपयश,अशा तीन स्तरावर या दौऱ्यात भर दिला.त्यांचा निरागसपणा,लोकांमध्ये सहजपणे मिसळणे,लहान मुलांना उचलून घेणे,तरुणांच्या खांद्यावर हात ठेवत संवाद साधणे व ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन चालणे,अशा वागण्यामुळे गावागावातून लोक यात्रेत सामील होत गेले.मात्र,त्यांच्या या अशा वागण्यावर भाजपने चांगलेच तोंडसुख घेतले आहे व ही यात्रा म्हणजे इव्हेंटचा एक भाग असल्याची टीका त्यांनी केली.पण यात्रेला मिळणारा लोकांचा प्रतिसाद कमी न होता तो उत्तरोउत्तर वाढतच गेला.इथपर्यंत सारं काही सुरळीत चाललं होतं.यात्रा जेंव्हा आपल्या राज्यात पोहोचली व राहुल गांधी यांना अचानक उपरती झाली व त्यांनी सावरकर यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील वागण्यावर आसूड ओढण्यास सुरुवात केली आणि राज्यात गदारोळ उठला.भाजप,मनसे व हिंदुत्ववादी संघटनांनी राहुल गांधी यांना टीकेचे लक्ष्य केले.दस्तुरखुद्द सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी त्यांच्यावर चांगलेच आसूड ओढले तर एका नागरिकाने ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.वास्तविक गेले अडीच महिने यात्रा शांततेत सुरू असताना अशाप्रकारचे गालबोट लागावे,हे दुर्देवच म्हणावे लागेल.त्यामुळे यात्रेला होणाऱ्या गर्दीवर त्याचा परिणाम होईल,असे वाटले होते,पण तसे झाले नाही.मात्र या सर्व घडामोडीनंतर यात्रेच्या हेतूबद्दलही
राज्यात सुरू असलेला " तीन पैश्याचा तमाशा," बंद होणे,राज्याच्या हिताचे,
राज्यात सुरू असलेला " तीन पैश्याचा तमाशा," बंद होणे,राज्याच्या हिताचे,
राज्यात सुरू असलेला " तीन पैश्याचा तमाशा," बंद होणे,राज्याच्या हिताचे,
राज्यात सुरू असलेला " तीन पैश्याचा तमाशा," बंद होणे,राज्याच्या हिताचे,
शंका घेण्यास सुरुवात झाली.यात्रेचे राज्यात आगमन झाल्यानंतर राहुल गांधी यांना सावरकर का आठवावेत ? हा खरा प्रश्न आहे.कदाचित ही राजकीय खेळीही असू शकते.पण ही खेळी,खेळताना राहुल गांधी यांनी सारासार विचार करायला हवा होता.त्यांच्या या अशा खेळीमुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची अवस्था " इकडे आड तिकडे विहीर," अशी झाली आहे.राहुल गांधी यांच्या टीकेमुळे भाजप व हिंदू संघटना प्रचंड आक्रमक झाल्या.त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी " तेरी भी चूप,मेरी भी चूप," अशी भूमिका घेत मौन धारण करावे लागले.भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या या दुखण्यावर नेमके बोट ठेवले आहे व त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.त्यांच्यावर होणाऱ्या टीकेची धार कमी व्हावी, यासाठी त्यांचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस व आपल्यात " दरार," पडू शकतो,असे संकेत दिले आहेत,पण ती सारवासारव आहे.दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी," भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये," हे नेहमीचे पालुपद आळवायला सुरुवात केली आहे.आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची अवस्था चक्राव्युव्हात सापडलेल्या अभिमन्यूसारखी झाली आहे.अडीच वर्षांपूर्वी हिंदुत्वाशी फारकत घेत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला प्रखर विरोध असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेली संगत आज अंगलट आली आहे.सत्ता टिकली नाहीच,पण त्यांच्या मूळ भूमिका व विश्वासार्हतेलाही तडा गेला आहे.त्यातून लवकर सावरणे,फार कठीण आहे.या सर्व गदारोळात राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते कुंपणावर बसून,सुरू असलेला हा " तीन पैश्याचा तमाशा," शांतपणे बघत आहेत.एवढं सगळं रामायण घडत असताना शरद पवार,अजित पवार व सुप्रिया सुळे,हे तीन नेते तोंडाला कुलूप लावून बसले आहेत.एरवी माध्यमासमोर भरभरून बोलणाऱ्या सुप्रिया मॅडम व अजित दादा,तोंडातून चकार शब्द काढण्यास तयार नाहीत.
राहुल गांधी यांनी सावरकरना टीकेचे लक्ष्य करून " आ बैल,मुझे मार," अशी स्वतःची अवस्था करून घेतली आहे.त्यांच्या या अशा वागण्यामुळे भाजपला आयते कोलीत मिळाले.दुसरीकडे सत्तेच्या जवळ जाता यावे,यासाठी राज ठाकरे यांनी प्रखर भूमिका घेतली असून त्यांच्या पक्षाने बुलढाणा येथे राहुल गांधी यांची यात्रा अडवण्याचा प्रयत्न केला.यात्रा अडवणे,शक्य नाही,हे राज यांनाही माहीत होते,पण हिंदू मतांच्या जोगव्यासाठी त्यांनाही हे करावे लागले. आज राज्यात जे काही चालले आहे,ते बंद न झाल्यास राज्याची सर्व क्षेत्रात पीछेहाट होत राहणार.औद्योगिक अशांतता व राजकीय अस्थिरता असलेल्या राज्यात उद्योगधंदे उभारण्यास उद्योजक तयार नसतात.उद्योग उभारताना उद्योजक,दळणवळण,रस्ते,वीज,पाणी व औद्योगिक शांतता,अशा पाचसूत्री सोयी-सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत असतात.आज आपल्या राज्यात या विषयी भयावह परिस्थिती पाहायला मिळते.मोठे प्रकल्प इतर राज्यात का जाताहेत,याचा साऱ्या राजकीय पक्षांनी विचार करायला हवा.कारण ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यास केवळ राजकीय पक्षच जबाबदार आहेत.सत्तेच्या हाणामाऱ्यामध्ये हे राजकीय पक्ष तरुणांचे भविष्य पणाला लावत आहेत.कोरोना संपल्यानंतर सारं काही सुरळीत होईल,अशी भाबडी अपेक्षा बाळगणाऱ्या राज्यातील चाकरमान्यांना ज्या अपेक्षा होत्या,आजच्या घडीला त्या साऱ्या राजकीय नेत्यांनी धुळीला मिळवल्या.धर्माचे राजकारण,आज भारताच्या विकासाच्या मुळावर आले आहे.राममंदिर,
अफझलखानाची कबर,हिंदुत्व,लव्ह जिहाद,खोके,बोके,गद्दार,याशिवाय विकासाचे सारे प्रश्न आज अडगळीत पडले आहेत.राज्यकर्त्यांना लोकांच्या दैनंदिन समस्या,अडचणी व विकासाचे प्रश्न,याबाबत बिलकुल देणं-घेणं नाही.महाराष्ट्र ,आर्थिक व उद्योग क्षेत्रात पुन्हा अव्वल ठरल्याची सध्या टिमकी वाजवण्यात येत आहे,पण प्रत्यक्षात काय स्थिती आहे,हे वेदांता-फॉक्सकॉन, टाटा,बल्क ड्रग,या प्रकल्पाच्या गच्छंतीमुळे स्पष्ट झाले आहे.लाखो रोजगार मिळवून देणारे प्रकल्प इतर राज्यात का गेले ? याचा विचार राज्यकर्त्यांनी करायला हवा.असा विचार जेंव्हा ही मंडळी करायला लागतील,तेंव्हा खऱ्या अर्थाने आपले राज्य विकासाच्या वाटेवर मार्गस्थ होईल.

174 

Share


दीपक व्य.मोहिते
Written by
दीपक व्य.मोहिते

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad