Bluepad | Bluepad
Bluepad
"माया" ला बघण्याचा थरार
शुभम पोलशेट्टीवार
शुभम पोलशेट्टीवार
20th Nov, 2022

Share

माया, सोनम, लारा हे नाव ऐकल्यावर आपल्याला प्रत्येकाला मनुष्याचे नाव असल्यासारखी भावना येईल परंतु हे नाव माणसाचे तर आहेच पण ताडोबाच्या जंगलातील वेगवेगळ्या वाघिणींचे सुद्धा नाव आहे. आज 20 नोव्हेंबर 2022 रोजी चार मित्रांसोबत केलेला ताडोबाचा प्रवास अविस्मरणीय असा होता. मी जवळपास मागील वीस वर्षापासून चंद्रपुरात वास्तव्यास आहे परंतु ताडोबाला जाण्याचा व सफारी करण्याचा कधीही योग जुळून आला नव्हता.
पुष्कळ लोक म्हणतात की ताडोबात जिप्सी ने प्रवास केल्यावरच वाघ दिसतात कॅन्टनरने नाही पण ही भावना चुकीची आहे कारण आम्ही आज स्वतः कॅन्टरने प्रवास केल्यावर आम्हाला माया या वाघिणीचे दहा मिनिटे रस्त्यावर दर्शन झाले. वाघाचे किंवा वाघिणीचे दर्शन होण्यासाठी जिप्सीची नाही तर तुमच्या सोबत चांगल्या नशिबाची जास्त आवश्यकता असते.
ती वाघीण बाजूने जात असताना जरी आपण बस मध्ये संरक्षित असलो तरीही तिची नजर आपल्यावर पडली तर आपण अक्षरशा घाबरून जातो. आज मला कळलं की जंगलाचा राजा वाघाला का म्हणतात कारण सिंह पण असू शकला असता राजा पण सिंह हा कडपात असतो तर वाघ हा एकटा असतो नेहमी. तिच्यासमोर मागे दहा ते बारा गाड्या असताना सुद्धा ती अक्षरशा राजाप्रमाणे वावरत होती त्यावरूनच जुन्या काळातील राजांची अनुभूती आली जे आपण आज दक्षिण भारतातील पिक्चरमध्ये अनुभवतो. एक हिरो असतो आणि त्याच्याभोवती दहा ते बारा गुंड असतात परंतु तू न घाबरता सगळ्यांशी लढत असतो. हिला तर लढण्याची ही आवश्यकता नाही कारण तिच्या नजरेतच तितकी दहशत आहे.
वाघाला प्रत्यक्षात बघणे म्हणजे मोठी गोष्ट नाही आहे मला माहित आहे परंतु आपण ते झूलॉजिकल पार्क मध्ये जर बघत असू तर ते वाघ स्वतःच्या नैसर्गिक स्वरूपात वावरत नसतात परंतु आपण जर त्यांना जंगलात बघितले तर ते त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात व त्यांच्या थाटात असतात. कित्येक लोक किती वेळा तरी ताडोबाला जातात वाघाला बघण्यासाठी परंतु नशिबानेच वाघ बघण्याची संधी मिळते.
मायाला बघितल्यावर कळलं की जे लोक आपल्या सत्याच्या व नियमाप्रमाणे जगतात त्यांना समाजात इतरांची भीती का बरं नाही वाटत कारण ते राजे असतात त्यांना कुणाचीच भीती नसते. तुम्ही पण नक्की जा एखाद्या नॅशनल पार्क किंवा व्याघ्र प्रकल्पाच्या भेटीसाठी.धन्यवाद!

169 

Share


शुभम पोलशेट्टीवार
Written by
शुभम पोलशेट्टीवार

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad