Bluepad | Bluepad
Bluepad
निसर्ग
kanchan kathole
kanchan kathole
20th Nov, 2022

Share

सुर्याची किरणे वाटे जणु त्याची लेकरं…
त्याच लेकरांचा उजेड पडुन फुलते एक एक कोमल सुगंधी फुलांची कळी सुरेख…
खळखळणारा धबधबा वाहतो दरी-दरीतुन ओथंबणाऱ्या सागरासारखा पांढरा शुभ्र…
जोड देतो हाच धबधबा, मिळुन साथ देतो मोकळ्या आकाशासारखा निरभ्र…
धबधब्याचं पाणी मिळे सर्व पशु प्राण्यांना स्वच्छ लाभदायक…
लाभाचे मोल जमतील व पाण्याचे बोल रमतील त्याहुन जीवनदायक…
थंड पाण्याचा स्पर्श जाणवतो अंगी गार गार शहारा…
शहारांमुळे बेभान होऊन मनाला मिळतोय राम्यकदायी निवारा…
हिरवं हिरवं गवत लागे पायी, जणु शालुचं मखमली…
मन नाचे धुंद होऊनी वाऱ्याच्या झुळझुळी…
डोंगर दऱ्या खोऱ्यांमधुन आवाज गुंजतो जागोजागी…
आवाजाचा पुन्हा प्रतिसाद येई मागोमागी…
जमिनीची लाल माती असते आपल्या पायाखाली…
राबणारा शेतकरी तिचं माती मस्तकी लावुन विश्राम घेतो झाडाखाली…
वर्तुळ आहे पृथ्वी त्यात व्यापलेला आहे विशाल महासागर त्याला मिळणाऱ्या प्रबलं लाटा…
लाटांचा आस्वाद घेऊनी मनाला जाणवते ऐतिहासिक शिवरायांचा मराठा…
ह्याच मायेच्या मातीत जन्मास आलो आपण धरतीची मुलं…
अंगाई गात निवांत निजणारे धरतीची मुलं स्वप्नात पाहतात आयुष्यातलं मोठं पाऊलं…
पाऊले पुढे जाऊनी स्वप्नात तयार होतो चांदण्याचा चमचमणारा एक तारा…
ताऱ्यांचे ब्रिज उठते पुढच्या आयुष्याचा साठा सारा…
आयुष्याला वळणं देऊन फुटते अंकुर रोपासारखे…
रोपाला वाढ मिळते नवं अलंकारासारखे…
पुर्ण सृष्टीचे अलंकार सामावले या सोनेरी, रुपेरी, चंदेरी निसर्गात…
या निसर्गाला पालवी फुटूनं झाडे नांदणार आनंदात…
मोठी आहे सृष्टी, मोठा आहे सागर, मोठं आहे जग, मोठी आहे प्रेमळ माती यावर खुलते मोठे स्वप्नाचे स्वर्ग…
ह्याच भाबड्या जीवाला रुजुन तयार झाले हे चमकणारे मोठे निसर्ग… कांचन अशोकराव काठोळे

185 

Share


kanchan kathole
Written by
kanchan kathole

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad