Bluepad | Bluepad
Bluepad
*आत्मविश्वास*
Hitesh Thakare Patil
Hitesh Thakare Patil
20th Nov, 2022

Share

❤️❤️❤️
खूप वर्षांनी पुन्हा तो आयुष्यात डोकावला
माझ्याविना आयुष्य कसं वाटलं?
कानाशी पुटपुटला,
छानच की...... मी म्हटलं😊
संसाराच्या गाड्यात सहाजिक तुझं विस्मरण झालं
अस्तित्वावर बोट ठेवायला पुन्हा
का येणं केलं?
रोजच्या धावपळीत स्वतःलाच
विसरले होते
संघर्ष कुठंच नव्हता म्हणून हळूवार तुझे बोट सोडले होते
शाळाकॉलेजमध्ये तू सोबत होतास म्हणून
अशक्य ते शक्य झालं
मेहनतीने का असेना,यशाचं शिखर गाठता आलं
आता संसारात मुलांसाठी मन मारावं लागतं
एवढं करुनही आईला काही येत नाही असं त्यांना वाटतं
दोन पुस्तकं शिकून मुलं गर्व करूं लागतात
पहिला गुरु आई हेच नेमकं विसरतात
नव-याच्या पाठीशी बायको खंबीर उभी रहाते
पण प्रशंसा सोडून,'वेंधळीच आहेस बघ'- हेच ऐकायची सवय होते
तू होतास तेव्हां आयुष्य होतं छान
सुधारीत जगात जगताना नवरा, मुलांशिवाय हलत नाही पान
मी मात्र मागे राहिले ,स्वतःसाठीच जगायचं विसरले
मित्रा आता तरी घे हातात हात
आजन्म दे तूच आता साथ
तो म्हणाला मला मिळवण्यासाठी
कणखर व्हावं लागतं
नवा दिवस उजाडावा तर पृथ्वीलाच
सूर्याभोवती फिरावं लागतं
हसून विचारलं त्याला आहेस कोण एवढा खास?
तोही हसला...म्हणाला ओळखलं
नाहीस अजून....?
मी आहे तुझाच.....
*आत्मविश्वास*
🌹🌹🌹🌹🌹

177 

Share


Hitesh Thakare Patil
Written by
Hitesh Thakare Patil

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad