Bluepad | Bluepad
Bluepad
आयुष्य जगतांना
Ashok Suruse
Ashok Suruse
20th Nov, 2022

Share

धार पाहिजे का आधार पाहिजे
नात्यातील गोड जपायला
आयुष्यातील क्षणाना गोड बनवायला ||१||
फुल पाहिजे का गुच्छ पाहिजे
एखाद्याला शुभेच्छा दयायला
कि वेळेवर थाप पाहिजे लढ म्हणायला ||२||
मी पाहिजे का मीपणा पाहिजे
संकटा वेळी साथ दयायला
कि अहंकार सोडून सोबत चालायला ||३||
विचार पाहिजे का आचरण पाहिजे
अन्याया विरुद्ध लढायला
हीच शिकवण का छत्रपती राजाची ||४||

176 

Share


Ashok Suruse
Written by
Ashok Suruse

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad