Bluepad | Bluepad
Bluepad
#सुहानी रात ढल चुकी🎵🎵
Swati Kumbhar
Swati Kumbhar
20th Nov, 2022

Share

#सुहानी रात ढल चुकी🎵🎵
तो फोन मधनं बाहेर न येता,
तिच्या नुसत्या हालचालीवरून,
"सगळे झोपलेत?"
ती निवांतपणं उशीला टेकत बोलली,
"होय."
हळूवारपणे हातांवर माश्चरायझर मुरवत ती सांगते,
"ए बंद कर बघू तो साऊथ मुव्ही."
फोन मधनं बाहेर येत त्यानं म्हणलं ,
"हो.. हो करतो करतो."
ती रिलॅक्स मुड मध्ये गुणगुणत असते.
"ए " तीचं लक्ष वेधून घेत त्यानं हाक मारली .
"हम्म.." डोळे बंद असतानाच ती उत्तरली
"घे ."तो ग्लास पुढं करतो.
ती हळूच हसत हाती घेते.
ती स्पाॅटीफाय ओपन करते.
तो जवळच बाजूला टेकत बोलला,
"ए नको लावूस ना गाणी या वेळेत
सगळे झोपलेत."
अन्‌ बारीक आवाजात गाणं लागलं
"सुहानी रात ढल चुकी
ना जाने तुम कब आओगे…"
ती बंद करणार ,इतक्यात तो तिला थांबवतो.
ती गालातल्या गालात हसते एक सीप घेते डोळे मिटते.
तो ही डोळे मिटुन तसाच ऐकत राहतो
प्ले लीस्ट पुढे जात राहते,
"ओ मेहबूबा ओ मेहबूबा तेरे दिल के पास ही है मेरी मंजील एक मंज़िल-ए-मक़्सूद…."
गारवा पसरलेला रात्र रंगत जाते.
सहजीवनाची काही वर्षे गेली की सगळं राग लोभा पलिकडलं नातं उरतं फक्त.
हक्का पलिकडलं मैत्री जवळचं.
© सौ.स्वाती विवेक कुंभार
बोईसर,जिल्हा पालघर.
#सुहानी रात ढल चुकी🎵🎵

188 

Share


Swati Kumbhar
Written by
Swati Kumbhar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad