Bluepad | Bluepad
Bluepad
खूप त्रास होतो जेव्हा असं नातं तुटतं, ज्यासोबत तुम्ही जगण्याची स्वप्ने पाहिलेली असतात.
प्रीती लांडगे.
प्रीती लांडगे.
20th Nov, 2022

Share

हा विषय आपले मानसशास्त्र या पेजवरून देण्यात आलेला आहे. तर त्याचा त्या दृष्टीकोनातूनच विचार केला जावा ही विनंती.
हो हे खरं आहे की खूप त्रास होतो जेव्हा असे नाते तुटतं ज्याच्या सोबत तुम्ही जगण्याची स्वप्नं पाहेलेली असतात. कारण कितीही नाही म्हटल तरी प्रत्येकाच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा प्रश्न असतो. निर्णय असतो जो आपण विचार करून घेतलेला असतो. आणि आपण खूप स्वप्ने ही रंगवलेली असतात दोघांनी परंतु अचानक यातील एक धागा निसटून जातो आणि आपल्या त्रास होतो. जो प्रत्येक गोष्टीत आपल्याला सामावून घेतो त्यांच्या चांगल्या वाईट प्रसंगात त्याने आपल्या सामावून घेतलेले असते. आपणही त्याला पूर्ण साथ देतो. प्रत्येक वेळी त्याच्या सोबत शरीराने जरी नसलो तरी मनाने, शब्दाने कायम त्याच्या जवळ असतो. खूप स्वप्ने रंगवली जातात त्याच्या कडून किंवा तीच्या कडून स्वप्ने दाखवली ही जातात जो प्रत्येक गोष्टी साठी त्याचे किंवा तिचे मत विचारात घेतो,तो आता एके दिवशी अचानक बोलेनासा होतो दूर दूर जाऊ लागतो तुम्हाला कळत नाही की हे अस का होते. त्यामुळे तुमच्या जीवाची तगमग, तडफड हा सगळा त्रास सुरू होतो. परंतु यामध्ये एक लक्षात घ्या जेव्हा तुम्ही पिठा मध्ये हात घालता तेव्हा तुमच्या हाताला पिठ लागते. परंतु नंतर हात झटकला किंवा साफ केला की ते निघून जाते. अगदी तसेच हा त्रास आपण किती करून घ्याचा किती जिव्हाळी लावून घ्याचा हे आपल्या हातात आहे तुम्ही जितका त्रास करुन घ्याल तो तेवढा जास्त तुम्हाला होणार म्हणून त्याला कमी करण्याचा स्वतःच प्रयत्न करा. आता तुम्हाला त्रास होतो आहे हे तुम्हाला जाणवते आहे कारण ते नाते जवळ नाही. परंतु त्याचवेळी हे आठवा की ते नाते जवळ असताना तुम्हाला किती आनंद झाला होता. हे आठवून आनंदी रहा. तो क्षण तर तुम्ही एन्जॉय केला आहे ना मग आता ते स्वप्न पूर्ण होणार नाही म्हणून ऐवढा त्रास करून घेऊ नका ऊलट त्यातून काही तरी शिका त्यातून जे चांगले आहे ते घ्या, हा अनुभव पाठीशी ठेवा आणि पुन्हा अशा नात्यात वेळ वाया घालवू नका ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. आणि झालाच तरी त्यातून पुढे जाण्याचा मार्ग निवडा. मुळात काय आहे ना जेव्हा आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो ते पूर्ण श्रध्देने ठेवतो. मुळात विश्वास हा डोळस नसतोच कधी जर तो डोळस असेल तर विश्वास कसला, आता तुम्ही प्रामाणिकपणे त्या नात्याला न्याय दिला वेळ दिला हाच तुमचा विश्वास. आता परिस्थिती मुळे काही कारणाने त्या व्यक्तीचे काही व्यक्तीक समस्या असतील ज्याच्या पलीकडे तो जाऊ शकला नाही किंवा त्याच्या पलीकडे जाऊन त्याने विचार केला नाही. तर यात दोघाचा ही दोष नाही. तर तुम्ही ऐवढे दुखी का होता आणि काही अपवादात्मक जाणुन बुजून त्रास दिला सुध्दा असेल परंतु तो तुम्ही करून न घेणे हेच श्रेयस असते. हे जीवनाचे रंगमंच आहे. सगळी पात्र काही काळापूर्ती (टेमप्ररी) तुमच्या जीवनात आलेली आहेत. ती कधीच कायमस्वरूपी तुमच्या सोबत रहाणार नाहीत हे लक्षात घ्या,कोणी तरी येणार कोणी तरी जाणार. हे होतच रहाणार काहीही तुम्ही धरून ठेऊ शकत नाही. अगदी तुमचा श्वास ही एक श्वास सोडल्या शिवाय दुसरा श्वास आपण घेऊ शकत नाही. तर मग हा त्रास ही स्वप्ने तरी कशी धरून ठेवणार. मान्य आहे खूप स्वप्ने बघीतली तेवढा वेळ त्या नात्यावर खर्च केला परंतु हाती काहीच लागले नाही. परंतु जेव्हा काही जाते तेव्हा दुसरे काही तरी आपल्याकडे येते हे लक्षात ठेवा. आता तुम्ही ठरवा की आयुष्य कसे जगायचे हस की रडत. ना गेलेली वेळ परत येणार ना ती व्यक्ती तरी ही तुम्ही तो त्रास मात्र करून घेत आहात का तर तुम्ही त्या नात्यासाठी बघितलेली स्वप्ने परंतु काहीच यातून निष्पन्न होणार नाही. फक्त मनस्ताप. या आठवणी येणार ते नात आठवणार ती व्यक्ती आठवणार,ती पुन्हा हवीहवीशी वाटणार हे होणार परंतु तरीही तुम्हाला स्वतःला समजावता आले पाहिजे. तुमच्या स्वभावातील "स्व"चे रक्षण करता आले पाहिजे. भलेबुरे झाले ते विसरून पुढे जाता आले पाहिजे. नंतर ती सोडून गेलेली व्यक्ती कधी समोर दिसली तर तिला हसून बोलता आले पाहिजे किंवा स्माईल देता आली पाहिजे. न चिडता न डगमगता त्याला ही कळू दे की त्याने किंवा तिने काय चूक केली आहे. तुमच्या त्रासाचे सार्थक झाले पाहिजे तो त्रास एका योग्य कामावर लावा किंवा व्यक्ती वर लावा म्हणजे नव्याने नवी खरी स्वप्ने तुम्ही रंगवू शकाल आणि ती पूर्ण करु शकाल. तयावेळी तुम्हाला जो त्रास झाला तो झाला तो उगाळत बसू नका आणि जरी तो आठवला तर त्यातून चांगले आठवा आनंदी व्हा आणि तो क्षण पुरेपुर जगा काही घटना आयुष्यात तुम्हाला खूप काही चांगले देण्यासाठी घडत असतात त्याचा त्रास नका करून घेऊ. आता तुम्ही म्हणाल तुम्हाला काय जाते बोलायला आमच आम्हाला माहीती हो खर आहे. परंतु फक्त एकच प्रश्न स्वतःला विचारा जाणारा गेला. तो मजेत आहे आणि तुम्ही आजूनही त्या डबक्यातच आहात पुढे कधी जाणार. कधी भरभरून वहाणार. जगणार त्रासाचे पण सोने करुन दाखवू ही भूमिका बजावा म्हणजे मग तो त्रास फार तुम्हाला छळणार नाही. तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. तुमचे छंद जोपासा जीवनात खूप काही करण्या सारखे आहे लक्षात ठेवा आणि जीवनाचे गाणे आनंदाने गात रहा. मस्तीत रहा कारण तुमच्याहून तुम्हाला स्वतःला उत्तम मित्र मिळणार नाही आणि तुमचे तुमच्याशी असलेले खरे नाते उलगडल्याशिवाय रहाणार नाही. तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा सर्वांना खूप आनंदी आणि टिकाऊ नाते मिळो हिच सदिच्छा.
प्रीती लांडगे.

171 

Share


प्रीती लांडगे.
Written by
प्रीती लांडगे.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad