Bluepad | Bluepad
Bluepad
प्रेमाचे तुकडे?
anjali bhalshankar
anjali bhalshankar
20th Nov, 2022

Share

श्रद्धा वालकर !हे नाव आता दिवंगत झाले आहे आणि पुढचे काही दिवस सागळीकडे चर्चेत रहाणार आहे.होय काहीच दिवस नंतर लोक विसरणारच आहेत, या अगोदरही असेच कित्येक मुलींचे जीव गेलेत हिलाही जीव घेतला गेला कशासाठी तर तर म्हणे,प्रेमासाठी?तिच्यावर प्रेम करणारा?तिच्यासह लीव इन मध्ये रहाणाऱ्या तीच्या मित्राने तिच्या शरीराचे पस्तीस तुकडे केले हे ऐकताना सुदधा अंगावर शहारा येइल कितीही, कठोर मनुष्य सुद्धा विचलित होईल इतके भयानक मरणं या पोरीच्या वाटयाला आले समाज माध्यमावरून ओळख झालेल्या मुलासोबत मैत्री, मग प्रेम आणि आईवडिलांच्या विरोधाला न जुमानता लिव इन रिलेशन शिप मध्ये रहाण्याचा निर्णयाने या मुलीचे आयुष्यच संपविले तेव्हा प्रश्न पडतो की,बाजारात दहा रुपयाची वस्तू घेताना सुद्धा निरखुन पारखुन घेणार्या पोरी आपला मित्र जोडीदार म्हणून निवड करताना ईतक्या गाफील का रहातात.मुळात हे खरोखरच प्रेम आहे की आकर्षण की नुसताच टाईमपास?अगदी ठरवून लग्न केलेल्या, वर्षानुवर्ष एकत्रीत पणे संसार करणार्या जोडप्याला सुद्धा आपल्या जोडीदाराला नीटस ओळखता येत नाही मग दोन चार महिन्यांच्या ओळखीत या मुली अनोळखी मुलावर ईतका विश्वास कसा काय टाकतात,की जन्म दिलेले आईबाप सुद्धा त्यापुढे परके वाटू लागतात.. ..माझ्या मते अशाप्रकारचे गुन्हेगारीला एकतर्फी नाही म्हणता येणार कारण मुलीनी कुठे ना कुठे स्पेस निर्माण केलेली असते प्रोत्साहन दिलेले असते त्याशिवाय समोरच्या व्यक्तीची हिम्मत वाढेल काय?शेवटी आपल्या कडे म्हण आहेच टाळी एक हाताने वाजत नाही अगदी किशोरवयीन वयातील नैसर्गिक ओढ, आकर्षण आपण समजु शकतो योग्य कौसेलींग व वेळोवेळी मुलांशी संवाद साधून त्यांच्यातील शारीरिक व मानसिक बदलांकडे लक्ष ठेऊन पालक योग्य मार्गदर्शन करू शकतात नाजुक वय असत अल्लड पणात चुका होऊ शकतात अशावेळेस पालकांची कसोटी लागते पंरतु ही श्रद्धा किंवा, एकूनच अशा मुली पंचविशी च्या आसपास तर वय बऱ्यापैकी परिपक्व झालेले असते आपण आपले सर्व निर्णय घेण्याचे अगदी, परिणामासहींत स्वीकारण्या इतपत आपण पौढ झालेलो असतो म्हणून काय काहीच दिवसाच्या तेही आभासी जगातल्या ओळखीच्या बेसवर आपलं आयुष्यच पणाला लावायचे का?इतके तकलादू कसे?कोणीतरी, फेकबुक ,तत्सम साइटवरून ओळख वाढवते, मग तासनतास, चाटींग ,त्या बेसवरचं कधीही समोर प्रत्यक्ष न पाहिलेल्या माणसावर चक्क प्रेम ? करायला लागतात या पोरी निर्लज्ज पणे वर्षानुवर्ष सोबत राहीलेली नाती आईवडील यांना सोडून त्या न पाहिलेल्या न भेटलेल्या माणसासाठी घर सोडतात काय तर म्हणे लिव इन रिलेशनशीप, हे कसले फयाड आहे जीव गमावायचे ?ती तर गेली कधीही परत न येण्याच्या वाटेवर श्रद्धाच्या ऊदाहरणातुन इतर मुलींनी काय धडा घ्यायचा हे सदविवेक बुद्धीने ठरवायलाच हवे.प्रेम प्रेम म्हणजे तरी काय? प्रेम!काय आहे प्रेम?
कोणत्याही प्राण्यांशी , वस्तू , सजीव , निर्जीव ,इत्यादीबद्धल मनामध्ये आपुलकी , स्नेह , जिव्हाळा, आदर , निर्माण होने आणि ती गोष्ट सहवासात , जीवनात हवीशी वाटणे म्हणजे प्रेम ,आपले दैनंदिन जीवन जगत असताना सहवासात येणाऱ्या कोणत्याही गोष्टीशी भावनिक ,मानसिक ,शारीरिक ,संबंध जोडले गेल्यामुळे निर्माण झालेला स्नेह म्हणजे प्रेम प्रेमाची वयोगटानुसार स्वरूपे: १) स्नेह - प्रेमाचा हा प्रकार आपण आपल्याहून वयाने लहान असणाऱ्या व्यक्तीसोबत ठेवतो. यात एक काळजी किंवा माया असते. भूतदया किंवा पशुपक्षांबद्दल वाटणारी आपुलकी हीसुद्धा ह्यात मोडते. २) प्रेम - हा समान वयोगटातील व्यक्तींच्या दरम्यान असणाऱ्या संबंधांना दर्शवितो - ह्याचे उपप्रकार म्हणजे पत्नीप्रेम, भागीनिप्रेम, बंधुप्रेम, मित्रप्रेम इत्यादी. ३) आदर - हा प्रेमाचा प्रकार आपल्याहून वयाने मोठ्या अथवा ज्येष्ठ व्यक्तींकरता असतो. ह्यातही संबंधित व्यक्तीची वाटणारी काळजी - विशेषतः त्यांच्या आवडी-निवडी व विचारांची ठेवतात. ही वागणूक त्यांच्या जीवनाच्या अनुभवाची आणि त्यांनी आपल्या केलेल्या संगोपनाबद्दलची एक पावती आणि क्वचित प्रसंगी त्यांना आवडणाऱ्या शिस्तबद्ध दिनचर्येची दखल असू शकते. पण हे सर्व प्रेमच! ४) ममता - हा तो प्रेमप्रकार की ज्याला अनुभवायला असे म्हणतात की देवही अवतार घेतात. स्त्रीला मातृत्व प्राप्त झाले की आपल्या बाळासाठी वाटणारे प्रेम म्हणजे ममता होय. ५) भक्ती - प्रेमाचे परमोच्च रूप की ज्याचे वर्णन केवळ अशक्य. परमेश्वर आणि साधक जेंव्हा एकरूप होतात तेंव्हा जो प्रेमप्रकार घडतो तो म्हणजे भक्ती - भक्ती म्हणजेच एकरूपता. भिन्नता म्हणजे विभक्ती- परमेश्वर आणि भक्त दोघेही एकरूप होऊन आपापले वेगळे अस्तित्व घालवून परमोच्च एकरूपता अनुभवतात त्यासच भक्ती असे संबोधन आहे. ६) एकरुपता_ प्रेम म्हणजे दोन जीव,नाते, संबंधी, एकत्र येऊन विचाराची देवाण घेवाण करतात , त्याच्या विचारातील एकता म्हणजेच प्रेम होय!आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो? आपण कधी त्याचा विचार करतो का? बऱ्याचदा आपण आपल्याला कसे बरे वाटेल याचा जास्तीत जास्त विचार करतो ह्याला खरोखरच प्रेम म्हणावे का?विचार करण्याची गोष्ट आहे. अंजली भालशंकर पाऊस वेचताना.काव्यसंग्रह माध्यान्ह आत्मचरित्र नदीच्या काठावरून ललितलेखन गुगलवरून संकलन. 👆

182 

Share


anjali bhalshankar
Written by
anjali bhalshankar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad