Bluepad | Bluepad
Bluepad
भुरळ
Anjali Wadurkar
Anjali Wadurkar
20th Nov, 2022

Share

नात्यातील गोडवा प्रत्येक क्षणी भुरळ घालणारा आणि त्यात मी शोधते नवा प्रवास आणि हा प्रवास ना फार आनंददायी आणि दुःखदयी म्हणजे ना जेव्हा कोणीतरी आपल्याबरोबर असतं आपली माणसं आणि जेव्हा साथ आपल्याला हव्या अशा व्यक्तीचे असते ना तेव्हा चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो. तो गगनात सुद्धा मावत नाही. सुखाच्या छायेत सतत चेहऱ्यावर एक स्मितहास्य मनाला वेड करत. तुला आठवतं आपलं पहिलं भांडण किती गोड होतं रे ते पण नात्याचा या भांडणात तू शेवट फार छान केलास मला फार आवडल हा तर पहिलं भांडण आणि त्या भांडणात मला भांडण कमी राग कमी पण दोघांविषयी प्रेम फार दिसू लागले. कधी कधी मी न बोलणाऱ्या गोष्टी शब्द तुझ्यासोबत बोलणं बंद करते ना तेव्हा तुला जाणीव होते. आणि तेव्हा तू बोलून देतोस निदान हे तरी म्हणायचं ना जेव्हा तू असलं काही बोलतो. तेव्हा मला फार वेगळं वाटतं आणि हा वेगळेपणा हवासा वाटतो. नाती गुंतवून त्यात प्रेम असेल ना तो प्रवासच सुखकर कधी कधी नाती प्रेम आपुलकी या विषयावर लिहिताना तुझे ते बोल मला आठवतात. माझ्या भावांना माझं प्रेम माझी इच्छा फक्त तुझ्यापर्यंत सीमीत मी काय त्याला दीर्घकाळ ठेव असं म्हणत नाही. पण माझं मन फार बोलकं आहे आणि मी ते मनात न ठेवता तुला सगळं सांगते. आता तुला काय सांगते असं तुझा प्रश्न असेल ना माणूस प्रत्येकांबरोबर प्रत्येक गोष्ट सांगणं मनातला भावना त्या व्यक्तीपुढे व्यक्त करणे हे थोडे वेगळे पण आपल्यातलं वेगळं तू बोलतोस ना की का स्वतःला त्रास करून घेते जेव्हा माणूस एखाद्याला आपला म्हणतो ना तेव्हा त्या व्यक्तीचे सुखदुःख त्याला होणारा त्रास त्याला काय हवंय काय नकोय या गोष्टीचा माणसाला कधीच त्रास होत नाही हे तू लक्षात घे माझी बोलण्याची पद्धत ना फार वेगळी आहे तुला वाटतं की मी तुला सर्वस्व मानलं आहे हा तुझा गैरसमज आहे आत्तापर्यंत तुला आयुष्यात भरपूर मुली भेटल्यास असतील त्यांचा सहवास वेगळा असेल पण मी फार वेगळी आहे खरंच फार वेगळी आहे मला कधीच कुठल्या व्यक्तीला नात्यात बांधून ठेवायला आवडत नाही मी ते केलं सुद्धा नाही आणि मला ते जमणारही नाही माणसाला स्वतंत्र हवय मला फक्त साथ आपुलकी हवी आहे दोन शब्द प्रेमाचे तुझ्यावर कधी कधी प्रेमाचा एवढा वर्षाव करायचा वाटतो ना खूप जास्त पण मी अनभिज्ञ असते ना तुझ्या वागण्यातून तुझ्या बोलण्यातून तू माझ्यासोबत बोलताना फार सीमित बोलतो पण मी मोकळेपणाने बोलते नात्यात नेहमी चांगुलपणाच दिसायला हवा हे थोडं चुकीचं आहे नात्यात आपुलकीची भावना फार महत्त्वाची तू फार हळवा आहेस रे आणि तो मला जाणवतो तुझे बोलण्यात ना पण तुझ्या मनातले भाव माझ्यापर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागतो पण मी तुला ओळखण्यात कुठे कमी नाही पडले हा
तेरी चाहतो से मेरा होना
मुझमे एक नया ख्वाब राह देख रहा है तेरी
अंजली वडुरकर

176 

Share


Anjali Wadurkar
Written by
Anjali Wadurkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad