Bluepad | Bluepad
Bluepad
बिग बॉस
वसुधा जावकर
वसुधा जावकर
20th Nov, 2022

Share

सध्या मराठी बिग बॉस सुरू आहे . खेळ , टास्क , भांडणं , मैत्री , दुश्मनी सारे चालू असते . आज सहज माझ्या मनात आले की आपले जीवन ही बिग बॉस च्या घरासारखे आहे .शनिवारी रविवारी जसे मांजरेकर येऊन सगळ्यांचे कान पिळत असतात .खेळ सुधारावा म्हणून सल्ले देत असतात तसेच आपल्याला ही संधी मिळत असते . बिग बॉस च्या घरातून एक एक सदस्य जात असतो , तसाच आपल्यातून ही आपले सहचारी आपल्याला सोडून जात असतात . जेव्हा मांजरेकर म्हणतात जा बॅग भरा आणि इथे या आणि बाजूला बसवून त्याला एवी दाखवतात की बघ तुम्ही घरात जाण्यापासून ते बाहेर येईपर्यंत कसे वागलात . आपणही वर जाऊ तेव्हा आपल्याला ही देव असेच दाखवेल का की बघा तुम्ही पृथ्वी वर गेलात आता बघा तुम्ही काय काय केलत ते ! खरेच , असेच होत असेल का , आपण ही जीवन जगत असताना टास्क ला सामोरे जातोच रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असतोच की ! आपणही काही लढाया जिंकतो , काही हरतो , आपल्या हातूनही चुका होतात . बिग बॉस च्या घरातून बाहेर आलेला सदस्य फक्त बांधलेल्या घरातून बाहेर येतो , पण आपण जेव्हा देवाने बांधलेल्या घरातून बाहेर पडू तेव्हा आपल्याला सुधारायची संधी नसणार , हो ना ? म्हणून बिग बॉस मधून एवढं नक्कीच शिकण्यासारखे आहे की टास्क येतील , खेळायचे , जिंकण्याचा प्रयत्न करायचा , ते करत असताना माणुसकी सोडायची नाही , आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्यांशी शक्यतो चांगले वागायचे , बघाना एकदा का ते किंवा आपण सोडून गेलो की पुन्हा तसे ते एकत्र येतील का जसे बिग बॉस च्या घरात एकत्र असतात तेच मेंबर पुन्हा त्याच घरात कधी एकत्र येतील का , तर नाही , मग आपले हि तसेच होईल ना आपल्याला भेटलेली माणसे पुन्हा ह्याच आयुष्यात भेटतील का ? आपण जर कोणाशी वाईट वागलो असलो तर नंतर कितीही वाटले तरी त्याचं व्यक्तीशी आपण नव्याने चांगले वागू शकणार नाही . बिग बॉस बघत असताना नेहमी माझ्या मनात येते की आधी घर माणसांनी भरलेले असते , पण नंतर हळूहळू ते रिकामे होत जाते . जे उरलेले सदस्य आहेत त्यांना किती उदास वाटत असेल आधीचे भरलेले घर आठवत असेल . आपल्याला असेच वाटते ना , मग आज पासून ठरवूयातका की आपण वरच्या बिग बॉस च्या घरात आहोत . कधी कोण बाहेर जाईल कोण जाणे , चांगले वागू , रोजच्या टास्क ला चांगल्या जोमाने सामोरे जाऊ वरच्या मांजरेकरांना वाटले पाहीजे की चांगला खेळला !

180 

Share


वसुधा जावकर
Written by
वसुधा जावकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad