Bluepad | Bluepad
Bluepad
काय सुचेना काय करू?
नाम नहीं बताऊंगा
नाम नहीं बताऊंगा
20th Nov, 2022

Share

20 नोव्हेंबर 2022
यार आज ना खूप टेन्शन आल्यासारखं झालंय.
झालंय असं कि तुम्हाला वाघमारे विषयी तर माहीतच आहे. तो खूपच अडचणीत आहे राव. कायम त्याच्या तोंडात टेन्शन हाच शब्द आहे. आणि मला ते बघवत नाही. पण मी तरी काय करणार मी कुठे कामाला नाही कि काही नाही.
मला पैशांची खूप गरज आहे. त्यामुळे सारखं असं वाटतंय कि हे सगळं कॉलेज वगैरे सोडून लांब कुठंतरी कामाला जावं. भरपूर पैसे कमवावे आणि वाघमारे ला द्यावे.
मी फोन केला तरी माझ्याशी नीट बोलत नाही आणि का बोलेल उगाच फालतुगिरी. काय करू जाऊ का कुठंतरी. तसा मी अभ्यासात खूप हुशार आहे. पण आता माझा mindset बदलला आहे.
पण असा करावं तर पुढे नक्कीच चांगल होईल का मी कुठे वाया जाईल याची भीती वाटते. मला लोकांमध्ये काम करायची भीती वाटते.
Business करावा वाटतोय मेंहनतीला ला घाबरतोय.
पण काहीही झालं तरी भरपूर पैसे कमवायचे बस एवढाच निर्णय घेणार.पण एक आहे स्वतःचा एक treck सोडणार नाही. कुठे ही गेलो तरी चांगल्या मार्गानेच पैसे कमवणार. स्वतः ला better बनवणार.
बघू काय होतय आता परीक्षा पण जवळ आली आहे. असं वाटतंय भरलेली fee परत घ्यावी आणि सोडून द्यावं कॉलेज.
पण पुढे काय करायच यावर काही विचार माझ्या मनात येतायेत ते पुढील प्रमाणे.
पहिलं म्हणजे थोडे फार पैसे job करून म्हणजे 3 ते 4 महिने कमवायचे आणि मग काय छोटासा धंदा चालू करायचंय आणि त्याच बरोबर share market शिकायचं. पण खूप smart पणे करायच सगळं बस वाया जायच नाही.

167 

Share


नाम नहीं बताऊंगा
Written by
नाम नहीं बताऊंगा

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad