Bluepad | Bluepad
Bluepad
स्वच्छता
वैष्णवी बर्गे
वैष्णवी बर्गे
20th Nov, 2022

Share

*स्वच्छता पाळा, रोगराई टाळा*.
उमटले ज्याचे दारी
स्वच्छतेचे पाऊल,
न लागे त्याच्या घरी
रोगराईला चाहूल.
जे आयुष्याशी जोडले जाते आणि चांगल्या जगण्याची दिशा देते तेच खरे शिक्षण त्यामुळे शालेय स्तरापासूनच श्रमसंस्कार हवा वैयक्तिक स्वच्छतेचा जीवन संस्कार तरी बालपणापासूनच रुजायला हवा .उत्तम आरोग्य हीच संपत्ती आहे .हे आरोग्य मिळविण्यासाठी, टिकविण्यासाठी काही चांगल्या सवयी यांचा संस्कार असावा लागतो. या सवयी अनुकरणातून, निरीक्षणातून, कृतीतून ,अंगी बांधले जातात . चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छतेची सवय एक महत्त्वपूर्ण बाब आहे.
आरोग्याचे पोषण करणारी किंवा आजारांना प्रतिबंध करणारी परिस्थिती स्वच्छतेने निर्माण होते .स्वच्छता दोन प्रकारची असते एक वैयक्तिक स्वच्छता दूसरी सार्वजनिक स्वच्छता.
स्वच्छता हा सौंदर्याचा आत्मा आहे .अस्वच्छता केलीच नाही तर स्वच्छतेची वेळ येणार नाही .आजार झाल्यानंतर उपचार करीत बसण्यापेक्षा आजार होऊच नये म्हणून उपाय योजने केव्हाही महत्त्वाचे असते .कचरापेटीत कचरा गेला पाहिजे. स्वच्छतागृहात पाणी ओतले पाहिजे .खोकताना खिशातून रुमाल निघालाच पाहिजे.
ज्याला स्वच्छतेचा तितका रा ,
त्याला रोगराईचा फटका रा स्वच्छता ही जबरदस्ती नाही स्वच्छता हा संस्कार आहे तो मुळापासून रुजवायला हवा .प्रत्येकात भिनायला हवा.
कचरा ही आजची मोठी समस्या आहे कचरा निर्मूलन केले पाहिजे.
स्वच्छता ठेवली गेली तर आपण आजारी पडणार नाही रोगराई पसरणार नाही.
स्वच्छ मंगलमय प्रकाश प्रत्येक झोपडीपर्यंत पोहोचू शकेल त्यासाठी हीच योग्य वेळ आहे स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे टाकण्याची.
स्वच्छता

181 

Share


वैष्णवी बर्गे
Written by
वैष्णवी बर्गे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad