Bluepadधास्ती
Bluepad

धास्ती

राजेंद्र पारे
राजेंद्र पारे
18th Jun, 2020

Share

मला धास्ती आहे

जीवन जगताना
जगत होतो---
हसत
रडत
चालत
पळत
कधीकधी दमतही होतो

जिंकताना नाही मिरलो
पराजयास नाहीच भ्यालो

जन्मा आल्याआल्या चिटकला होताच
कधी येईल त्याक्षणी , निश्चित नव्हताच

मला मुळीच डर नाही
पण---

खांद्यावरच तिरडी जायला हवी
अन्--

सतीगतीचा यात्रोत्सव घडायला हवा
शोकसभेला जमाव जमला पाहिजे
आयुष्यातील घडामोडींचा उहापोह,
त्यावेळी माझ्यादेखत झाला पाहिजे

स्वर्ग नरकाच्या कल्पनेत रमत नाही
पाप-पुण्य ,धम्म-सद्धम्म जाणतो मी

माझ्याही काही अपेक्षा आहेत
त्यासाठी उपेक्षित होणार नाही,
सध्या मला धास्ती आहे
म्हणूनच मृत्यूला टाळतो आहे.
राजेंद्र काशीनाथ पारे
राजगृह, बोरोले नगर -३
चोपडा जिल्हा जळगाव
मो नं.9850300245

12 

Share


राजेंद्र पारे
Written by
राजेंद्र पारे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad