Bluepadप्रेम
Bluepad

प्रेम

A
Akshay M Chavhan
23rd Apr, 2020

Share

नयनी भासे प्रेम नवे
रूप पाहता तुझे
व्यर्थ बाकी सारे
फक्त तुझे सानिध्य हवे

मोती हिरे आदी रत्ने
फिके आहेत तुझ्यापुढे
तुझ्या सारखाच /आश्रू समान
अलौकिक हिरा आहे मजकडे

स्पर्श होता तुझा
देहभान हरपले माझे
थरथरते हातही
तेही तू जाण रे

अशा रम्य समयी
सरू नये ही वेळ
अशीच थांबावी धरती
पाहुनिया हा खेळ

देव पहिला मी
फक्त तुझ्या रूपात
पूजा फक्त त्याची
होईल माझ्या मनात

नयनी भासे प्रेम नवे
रूप पाहता तुझे
व्यर्थ बाकी सारे
फक्त तुझे सानिध्य हवे

चेहरा पाहता तुझा
भास झाला मला चंद्राचा
आज तोही लाजला
सखे तुझ्याकडे पाहताना

गोड हसत होतीस तू
माझ्याकडं चोरून पाहून
तुझं लाजनही लपला नाही
माझ्या या नायनांसमोरून

तुला माझ्या डोळ्यात
साठवुशी वाटत होतं खूप
तुझं ते सौंदर्यही
खुलून दिसत होतं त्या
त्या चंद्राकडे पाहून

नयनी भासे प्रेम नवे
रूप पाहता तुझे
व्यर्थ बाकी सारे
फक्त तुझे सानिध्य हवे


akshay m chavhan


0 

Share


A
Written by
Akshay M Chavhan

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad