Bluepad | Bluepad
Bluepad
अचानक भेटलेला उत्साहाचा झरा
नेहा घरत
नेहा घरत
17th Jun, 2020

Share


त्या सून धन्यवाद दिले.त्या दिवशी ट्रेनला फार गर्दी होती, त्यामुळे अर्थातच मला बसायला जागा मिळाली नाही. मग मी एका मुलीची दादर सीट सांगितली, तेव्हा त्या आजी म्हणाल्या, " अगं पोरी, दादर ला सगळी ट्रेन रिकामी होईल." त्या क्षणी पहिल्यांदा माझी आणि त्या आजीची दृष्टीभेट झाली, तीची पटकन संवाद साधण्याची कला मला फार आवडली. इतक्यात एका बाईने मला तीची भांडूप सीट देण्याचे कबूल केले. माझ्या जीवात जीव आला, कारण दादर सीट सांगितली तरी तेवढा वेळ उभे राहून प्रवास करावा लागणार हा विचार काही मनाला आनंद देणारा नव्हता.खासकरून मी खूप थकलेली असताना. त्यामुळे भांडूप सीट मिळाल्यावर मी‌ त्या बाईला अगदी मनापासून धन्यवाद दिले.

पुढच्या स्टेशनला त्या आजीच्या ओळखीची एक साऊथ इंडियन स्त्री ट्रेनमधे चढली आणि त्या दोघींच्या गप्पा सुरू झाल्या. त्या‌ स्त्रीने आजीच्या कपाळावरील कुंकवाचा मळवट पाहून तीला सहज विचारले, " पूजा , आरती किया ? दिया लगाया ? " आणि आजीने चटकन उत्तर दिले, " हां, मेरेको सब करने को लगताए, नहीं किया तो नहीं जमता, जब तक जमता है तब तक करेगा, बाद में ऊपरवाला देखेगा "

का कोण जाणे , पण आजीच्या दृष्टीने त्या ऊपरवाल्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे असे मला वाटले , आणि जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत त्याची जमेल तितकी भक्तिभावाने सेवा करावी ही तीची मानसिकता पाहून मला आनंद झाला. त्या स्त्रीने आजीच्या कपाळावरील मळवटाकडे निर्देश करत म्हटलं , " आपके माथे पे वो देखा , इसलीये मैंने पूछा " त्यावर पुन्हा आजीचे उत्तर तयार, " ये मैं पंढरपूर से लेके आई, हर साल जाती है मैं और पाव किलो, आधा किलो ऐसा लेके आती है. अभी आषाढ महिने में फिर से जाएगी, बहुत भीड रेहेता है वहां, विठ्ठल ही मेरा सबकुछ है ". त्या आजीचे अस्खलित हिंदी ऐकून मला खूप गंमत वाटली.

]

त्यांचा संवाद खुंटला असला तरी माझे विचारचक्र सुरूच होते. साधारणपणे सत्तरीच्या असलेल्या त्या आजींनी मला अचानक खूप कमकुवत सिद्ध केले होते.

नऊवारी साडी, केसांचा अंबाडा, बारीक शरीरयष्टी, सुंदर डोळे, त्यावर सोनेरी काड्यांचा चष्मा,‌ कपाळावर मोठा‌ कुंकवाचा मळवट आणि त्याखाली बारीकसा अबीर लावलेला,‌ हातापायावर सुरकुत्या, तोंडाचं बोळकं झालेलं असं काहीसं त्या आजींचं वर्णन करता येईल. पण एक गोष्ट जी मी विसरू शकत नाही ती म्हणजे त्यांच्या डोळ्यातील अपार तेज , एक वेगळीच चमक होती त्या डोळ्यांमधे. जीवन रसरसून जगण्याची इच्छा त्या डोळ्यांत‌ ओतप्रोत भरलेली होती. आपल्याला धरून ठेवता येत नाहीत , पण त्या क्षणाचा आनंद आपण नक्कीच घेऊ शकतो. अचानक भेटलेल्या त्या आजींनी मला जीवनाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन दिला.

- नेहा घरत

16 

Share


नेहा घरत
Written by
नेहा घरत

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad