प्रिय सुशांत,
प्रिय सुशांत, प्रिय सुशांत,
तुला रूपेरी पडद्यावर आणखी पाहणं
आमचं सुंदर स्वप्न होतं.
पण तुझ्या मनात मात्र
वेगळंच काही सुरू होतं.
तुझ्या रूपाने आम्ही
एक छान कलाकार पाहीला.
त्याला आणखी पाहायचा होता,
पण तो तेवढाच मनात राहीला.
तुझे हसू, नृत्य आणि अदा
कायम आमच्या स्मरणात राहील.
तुझे असे अचानक जाणे सोडले
तर सर्व काही फक्त आनंदच देईल.
मनातील वादळाशी एकटाच
झुंज देत राहीलास तू.
त्या क्षणी मित्रा, जिवलगांच्या
सोबत असायला हवा होतास तू.
छान धुंदीत जगावं इतकं
तुझं जीवन मस्त नसेलही.
पण सहज फुंकून द्यावं
इतकं ते स्वस्तही नाही.
जीवनाचा प्रवास चटकन संपवून
मोकळा झालास तू.
पण सर्वांच्या मनाला बोचरी
चुटपुट लावून गेलास तू.
जिथे कुठे असशील मित्रा
मनमोकळं हसून घे.
तू किती हवाहवासा होतास
फक्त शेवटचं समजून घे.
- नेहा घरत