Bluepad | Bluepad
Bluepad
प्रश्न?
Varshaqueen
Varshaqueen
17th Jun, 2020

Share

काय बोलावं आणि कशी सुरुवात करावी कळत नाही...
विचार करायचा नाही असं ठरवलं तरी डोक्यातून जात नाही...
असं काय घडलं असेल त्याच्या आयुष्यात की त्याने स्वतःला संपवलं...
असं वाटतंय आत्ता त्याच्याकडे जावं आणि विचारावं त्याला का केलंस तू असं? कारण तरी सांग बाबा म्हणजे डोक्यातले प्रश्न तरी सुटतील. असा काही न सांगता गेलास म्हणजे सुटलास का तू? घरच्यांची काय अवस्था झालीय बघतोस ना..
आणि तू गेलास म्हणून कोणाला काही फरक पडणार नाही. तुझ्यासोबत झालं ते उद्या आणखी कोणासोबत होईल...अजून एक सुशांत तयार होणार...आणि असे किती दिवस चालणार..
तुला काय वाटल फक्त तुझ्या क्षेत्रात अशी वागणूक मिळते. सगळीकडे असेच आहे रे बाबा..
फरक इतकाच की काही सहन करू शकतात तर काही कमजोर पडतात.
तू लढायला हवं होत...तू जिंकायला पाहिजे होतं..
मांडलेला खेळ अर्धवट सोडून का गेलास रे तू..
सांग ना खरंच आत्महत्या करण्याइतक मोठं कारण होत का?

प्रश्न?


16 

Share


Varshaqueen
Written by
Varshaqueen

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad