Bluepad | Bluepad
Bluepad
प्रेरणादायी स्फूर्तीदायी व्यक्तिमत्व :प्राचार्य डॉ. संजय चाकणे सर
डॉ प्रकाश पांढरमिसे
17th Jun, 2020

Share

मला भावलेलं स्फूर्तीदायी व्यक्तिमत्व :- प्राचार्य डॉ. संजय चाकणे सर....
सर...,तुम्ही कला विज्ञान आणि वाणिज्य कॉलेज इंदापूरला प्राचार्य म्हणून रुजू झाला आणि इंदापूर कॉलेजचा कायापालट घडवून संपूर्ण कॉलेजचा चेहरा मोहरा बदलून टाकला. सर तुम्ही दूरदृष्टीने आणि वैचारिक कल्पकतेने कॉलेजचं "आय "कॉलेज असं नामकरण केलं.आज सर्वत्र कला, वाणिज्य विज्ञान या नावापेक्षा "आय" कॉलेज असाच कॉलेजचा बोलबाला आहे. हा बोलबाला फक्त इंदापूर तालुका या शहरापुरता मर्यादित राहिलेला नाही. तर तो सावित्रीबाई फुले पुणे विध्यापीठासह महाराष्ट्र राज्यांतील अनेक विद्यापीठांसह राज्याबाहेरही गेला आहे. याचे सारे श्रेय हे सर तुमच्या कल्पकता आणि नाविण्यमय उपक्रमाला व दूरदृष्टीला दिले जाते. महाविद्यालयात सातत्याने राबवित असलेल्या अनेक उपक्रमां पैकी एक म्हणजे "करके तो देखो...." या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने विध्यार्थी आणि प्राध्याक हे हिरिरीने सहभाग नोंदवून एक आगळावेगळा उच्चांक नोंदवून अनेकांचे लक्ष कॉलेजकडे वधवून घेतले आहे. याचे कौतुक अनेक दिग्गज मान्यवरांनी केले आहे. हे खरोखरच आपल्या कल्पकतेचे कौतुक आहे. याचा सार्थ अभिमान हा जसा कॉलेजच्या विध्यार्थी प्राध्यापकांना आहे तसाच आम्हाला देखील आहे.
सर...., तुम्ही एखादं काम हाती घेता ते तडीस नेह्ल्याशिवाय थांबत नाही. ही काम तडीस नेहण्याची हातोटी खरंच वाखाणण्याजोगी आहे. सर मी तुम्हाला पुणे विद्यापीठात 2003 साली एम. ए. ला असल्यापासून तुम्हाला पाहतो आहे.ओळखतो आहे. कमवा व शिकामध्ये असताना प्रा. तेज निवळीकर सरांच्या विनंतीवरून तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आम्हा 300 विद्यार्थ्यांचा "माझा ऑस्ट्रेलियाचा प्रवास " या विषयावरती अतिशय छान असे व्याख्यान दिले होते. ही तशी तुमची आणि माझी झालेली पाहिली भेट होती. त्यानंतर सर तुमच्याशी तसा जवळून संपर्क तात्पुरता यापूर्वी आला होता. तो म्हणजे आमच्या बावडा येथील श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयाच्या कार्यक्रमामध्ये आल्यावर, सर तुम्ही 5 महाविद्यालयाचे एकत्रित राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर मौजे बीजवडी येथे घ्यायचं ठरलं त्यावेळी , त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विविध मिटिंगमध्ये,गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड साठी घेण्यात आलेल्या मिटिंगमध्ये आणि या गिनीज वर्ल्डच्या उपक्रमामध्येही संपर्क आला होता. पण.. सर..., खऱ्या अर्थाने अगदी जवळून तुमच्याशी संपर्क आला तो म्हणजे आमच्या श्री शिवाजी एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री मा. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी बावडा कॉलेज नॅक करायचा निर्णय घेतला त्यावेळी आला. आमच्या कॉलेजचे नॅक करण्यासाठी घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या मुख्य मिटिंग मध्ये आपले प्रमुख मार्गदर्शन वेळोवेळी मिळत गेले.आणि सर तुमच्या या मुख्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून अनेक छोटछोट्या गोष्टींपासून ते मोठमोठ्या गोष्टींविषयीची माहिती सहज आणि सुलभतेने आम्हाला मिळत गेली. काम कसं केलं पाहिजे याची दिशा मिळत गेली. आपल्या कॉलेजकडे अनेक गोष्टींची वानवा आहे हे पुढच्याला सांगून चालणार नाही ना...जोपर्यंत त्यामध्ये तुम्ही जोपर्यंत सकारात्मक दृष्टीने बदल करण्याचे मनावर घेत नाही.कोणत्याही गोष्टीतून मार्ग काढायचा असेल तर त्याकडे सकारत्मक दृष्टीने बघायाला शिकलं पाहिजे.हा आशावाद घेऊन जर काम केले तर नाकारत्मकता सकारत्मक व्हायला वेळ लागणार नाही. सर, हीच आपली सकारात्मक दृष्टी आणि सकारात्मक विचार, सकारात्मक कल्पकता खूप कमालीची सकारत्मक प्रेरणादायी ऊर्जा देऊन गेली.आणि आम्ही सर्व प्राध्यापकांनी मन लावून झोकून काम केलं आणि 30 दिवसाच्या आत नॅकचा SSR भरला. यापाठीमागे सर तुमची प्रेरणा आणि वेळोवेळी मिळत गेलेले अचूक आणि दिशादर्शक मार्गदर्शन होते. हे नमूद करावेच लागते.
सर... तुमच्याकडून वेळोवेळी मिळणाऱ्या मार्गदर्शनातून खूप काही शिकायला मिळते. कधी कधी माझ्यासारख्या अनेकांना प्रश्न पडतो की, सर तुम्ही पदार्थ विज्ञानाचे प्राध्यापक पण सर्वच विषयांमधील असणारी बारीक सारीक माहिती अचंबित करणारी आहे. उदाहरण द्यायचेच झाले तर तुमची "माझी गाडगिरी" पर्यटन भटकंती ज्या ज्या गडकिल्यांला भेटी दिल्या त्या गडकिल्ल्यांविषयीचा इतिहास तेथील पर्यावरण, संस्कृती याविषयीअसलेली माहिती, केले गेलेले वर्णन वाचकांना प्रत्यक्ष गडकिल्ला पाहतो आहे. याचा भास निर्माण करते. हे आपल्या निरीक्षण व लेखन शैलीचे वैशिष्ट्ये. खरंच वाखाणण्याजोगे आहे.
सर आपण अतिशय सुंदर विविध प्रकारच्या भाज्या आणि पदार्थ बनवता. हे आपल्या व्यक्तिमत्वाचे आणखी एक वैशिष्टये.. असं आपलं सर अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि प्रत्येक क्षेत्रातील असणारी जान आणि भान, अनुभव शिदोरी प्रत्येकाला पावलोपावली मार्गदर्शन देणारीआहे याचं अनेकजण कौतुक करतात.
सर... आपण एक उत्तम प्राध्यापक, प्राचार्य, प्रशासक आणि मार्गदर्शक आहात.आपण सातत्याने नाविण्यमय उपक्रमाचा अवलंब करण्याची धोरणं आखता आणि ती पूर्णत्वास नेहता हे आम्ही जवळून पाहिलं आहे. सर तुम्ही नाविण्यमय कल्पक दृष्टीतून ज्ञानाच्या क्षेत्रात आजवर महाविद्यालया पासून ते विध्यापीठापर्यंत जो आमुलाग्र परिवर्तन आणि बदल घडवून आणलाआहे याचे सर्वत्र कौतुक होताना पाहयला मिळत आहे. त्याचाच एक प्रत्येय म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जून 2019 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कडुनिंब वृक्षवाटप गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड. आणि हे रेकॉर्ड करून दाखविलं. हे आपल्या उत्कृष्ट प्रशासकचे उत्कृष्ट प्रशासन वैशिष्ट्ये आहे. या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं सर्वत्र कौतुक झालं. पण त्यातील प्रमुख व्यक्तींमध्ये सर तुम्ही होता.याचा माझ्यासारख्या अनेकांना सार्थ अभिमान वाटतो आहे आणि यापुढेही वाटतच राहील.
इंदापूरचं असणारं "आय " कॉलेज हे प्राचार्य डॉ संजय चाकणे सरांचं कॉलेज ही ओळख सावित्रीबाई फुले पुणे विध्यापिठालाच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांना परिचित झालेली आहे. याचे सारे श्रेय एक प्राध्यापक, प्राचार्य आणि उत्तम प्रशासक म्हणून सर तुम्हाला जातं.
सर, तुमचे वेळोवेळी आम्हाला मिळणारं मार्गदर्शन कमालीची ऊर्जादायी, प्रेरणादायी प्रेरणा देऊन जाते. प्रत्येक वेळी काही ना काही नवीन काही तरी करण्याची ऊर्जा देऊन जाते. खूप काही शिकायला मिळते.सहज वाटलं की,सर आपल्या मला व्यक्तिमत्वाविषयी जे भावलं ते शब्दबद्ध करण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी खूप काही सविस्तरपणे लिहण्यासारखे आहे. शेवटी जाता जाता आपल्यविषयी इतकंच म्हणावंसं वाटतं की, " मोठ्या लोकांच्या शेजारी उभं राहिलं म्हणजे मोठं होतं कि नाही ते माहित नाही....पण आपल्या सारख्या चांगल्या लोकांच्या सोबतीत राहून नक्कीच मोठं होता येतं. प्रत्येक वेळी नवीन काही शिकता येतं" असंच काहीसं मला भावलेलं आपलं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. 🙏 प्रकाशधारा.... ✍️
डॉ. प्रकाश पांढरमिसे
रासेयो. विभाग समन्वयक, इंदापूर
इतिहास विभाग प्रमुख,
श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय, बावडा

12 

Share


Written by
डॉ प्रकाश पांढरमिसे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad