Bluepadपुरस्कार
Bluepad

पुरस्कार

Ketki kamatkar
Ketki kamatkar
17th Jun, 2020

Share

किती मोठा आणि विलक्षण शब्द आहे नाही,,, पुरस्कार...........!!!! म्हणजे अगदी सामान्यातल सामान्य माणसाला एक उंची देणारं नाव म्हणजे पुरस्कार.... माणसाच्या कामाची पावती म्हणजे पुरस्कार. खरय ना.. कष्टाची पावती तर हवीच. पण माझा मुळ मुद्दा आहे पुरस्काराच्या व्याख्येच्या., म्हणजे कुणातरी मोठ्या व्यक्ति कडून दिला गेला तरच तो पुरस्कार??? तसं नाही खर तर ,, खुप साध्या साध्या गोष्टीतली साधी साधी शाबासकी म्हणजे सुध्दा पुरस्कार. मग तो कोणत्याही वयाचा, कोणत्याही नात्याचा व्यक्ति असो. एखादी मोठी किंमत, सन्मानचिन्ह, हेच नकोय एखादी कौतुकाची दहा रूपयांची नोट पण चालेल, किंवा एखाद चॉकलेट पण आवडेल. अगदी एखाद्या गोड 🍭 बाळाची जादुकी झप्पी पण आवडेल. या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात रोजच घडत असतात. पण आपण फार लक्ष देऊन नाही बघत त्याकडे...,,, मग असे पुरस्कार प्रत्येकाला रोजच मिळत असतील ना.... म्हणजे प्रत्येकाकडे आजपर्यंत लाखो पुरस्कार पोहोचले असतिल नाही...🙂. मग आपण खरच किती मोठे आहोत आणि कितीतरी पुरस्काराचे विजेते🏆🎉🏆 देखील आहोत हो ना.... मला खूप आवडत असे पुरस्कार मिळवायला.... तुम्हाला आवडेल का???? बघा प्रयत्न करुन खूप गंमत येते..... 🙂🙂🙂🙂

2 

Share


Ketki kamatkar
Written by
Ketki kamatkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad