Bluepadचूक झाली आमची...
Bluepad

चूक झाली आमची...

P
Prashant Pagare
30th Nov, 2021

Share

चूक झाली आमची
हे निसर्गा
करशील का माफ आम्हाला?
खरचं चूक झाली आमची...
माणूस काहीही करू शकतो,
माणसामध्ये जग बदलण्याची ताकद आहे,
माणूस जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे,
हा गोड गैरसमज क्षणात दूर केलास, न वाट पाहता लांबची पण आता करशील का रे माफ?
खरचं चूक झाली आमची...
Automation च्या मागे लागलो होतो,
तुला challenge करायला निघालो होतो,
पण या Attitude च्या नादात
आपल्यामुळे निसर्ग नाही,
तर निसर्गामुळे आपण आहोत
हेच विसरलो होतो
शेवटी तू आठवण करून दिलीस वास्तवाची
बरं आता करशील का रे माफ?
खरचं चूक झाली आमची...
स्वतःला अतिशहाण समजत होतो,
सृष्टीचे खरे सौंदर्य विसरून,
पशुपक्षांना पिंजर्‍यात कैद करून,
"So called" मालक बनून मिरवत होतो
शेवटी आम्हाला जागा दाखवून दिलीस आमची
परंतु तू दिलेल्या शिक्षेमुळे
आम्हाला चूक मात्र कळाली आमची...
आता तरी करशील ना रे माफ?
हे निसर्गा
आता तरी करशील ना माफ?


1 

Share


P
Written by
Prashant Pagare

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad