Bluepad | Bluepad
Bluepad
आई श्री तुळजभवानी शारदीय नवरात्र महोत्सव तुळजापूर
Rohit  Vhatkar
Rohit Vhatkar
24th Sep, 2022

Share

*🙏सोमवार दिनांक २६ सप्टेंबर २०२२ पासून घट स्थापना नवरात्र सुरू होतील_____🙏*
*देवीच्या नऊ रूपाची पूजा केली जाते.*
*पण आपण जर आजूबाजूला शोधले तर ही देवीची नऊ रूपे आपल्या घरातच सापडतील ते असे*
*'रूप पाहता लोचनी'*
*आपण बालपणापासून देवीची विविध रूपे पदोपदी पाहत आलोय.*
*पहिली माळ - *'मातृदेवतेची'.*
*जी आपल्यासाठी कष्ट उपसताना दिवस-रात्र, आजारपण, थकवा, तहान-भूक कशाचीही पर्वा करत नाही.*
*आपल्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करणे सोडत नाही.*
*मातृदेवते, तुला शतशः प्रणाम !*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*दुसरी माळ - 'आजी 'नामक 'मायेच्या सागराला'.*
*जिच्याजवळ आपल्या दुधावरच्या सायीसाठी प्रेम, माया, ममता, आशीर्वाद यांचा जादूचा खजिनाच दडलेला असतो.*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*तिसरी माळ - 'माय मरो, मावशी जगो' या उक्तीला जी जागते त्या 'मावशीची'.*
*आईच्या बरोबरीने आपल्यावर मायेची पाखरण घालणारे कोणीतरी या जगात आहे याची जाण देणारी.*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आई श्री तुळजभवानी शारदीय नवरात्र महोत्सव तुळजापूर
*चौथी माळ - लहानपणी आपल्याला कडेवर घेऊन फिरवते त्या 'आत्याची'.*
*वडील रागावल्यावर पाठीशी घालून पदराने डोळे पुसणारी...*
*..प्रेमळ, लाघवी आत्या.*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*पाचवी माळ - मायेच्या 'बहिणीची'.*
*लहान असो वा मोठी,*
*आपली सुख-दुःखं वाटून घेणारी,*
*गुपिते पोटात लपविणारी.*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*सहावी माळ - लग्नानंतर मिळालेल्या मैत्रिणीची... 'नणंदेची'.*
*आपल्याला आलेल्या छोट्या-मोठ्या अडचणींचे निवारण करणारी.*
*लग्नानंतर नवीन घरात नवखेपणा जाणवू न देता,*
*अलगद बहिणीची माया देणारी.*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*सातवी माळ - 'अहों'च्या मातृदेवतेची... 'सासुबाईंची'.*
*सासरच्या पद्धती, रिती-रिवाज, आवडी-निवडी शिकविणारी.*
*ते सारं अंगवळणी पडेपर्य॔त सांभाळून घेणारी.*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*आठवी माळ - जीवाला जीव देणाऱ्या जिवलग *'सखीची'.*
*आपले रुसवे-फुगवे सहन करणारी.*
*आपल्या यशात स्वतःचे यश मानणारी.*
*चांगल्या-वाईट सवयींकडे दुर्लक्ष करून खरी मैत्री जोपासणारी.*
*गोड गुपिते सांभाळणारी,*
*सडेतोडपणे खरे सल्ले देऊन सावरून घेणारी.*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*नववी माळ - आपल्या लाडक्या 'लेकीची'.*
*जिच्या जन्मामुळे झालेल्या आपल्या मातृत्वाच्या सार्थकतेची.*
*आपल्यावर रागावणारी, रुसणारी...*
*पण वेळप्रसंगी,*
*कधी आपली आई,*
*तर कधी मैत्रीण होऊन*
*आपल्याला समजून घेणारी.*
*जगातल्या कोणत्याही गोष्टींपेक्षा प्राणप्रिय असणारी...*
*'आपला अमूल्य ठेवा, आपला श्वास, आपलीच छोटी बाहुली'*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*शेवटचा 'दसरा'* -
*'जो कामवाल्या बाईबरोबर होतो हसरा'.*
*आपला उजवा हातच जणू.*
*जिच्या न येण्याने वेळापत्रक कोलमडतं.*
*वेळप्रसंगी 'ताई तुम्ही थकलात, मी करते, बसा तुम्ही',*
*असं म्हणून आपला क्षीण घालविणारी.*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*- रोजच्या जीवनातील देवींची ही वेगवेगळी रूपे.*
*- त्यांना 'शतशः नमन' !*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

184 

Share


Rohit  Vhatkar
Written by
Rohit Vhatkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad