Bluepad | Bluepad
Bluepad
एक विचार
Piraji Kamble
Piraji Kamble
23rd Sep, 2022

Share

लोक काय म्हणतील,मित्र काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील,आपण जेथे काम करतो त्या ठिकाणाचे सहकारी काय म्हणतील या विचाराने आपण जेंव्हा आपलं आयुष्य जगत असतो तेंव्हा आपण एक गोष्ट मात्र नक्की करत असतो जाणून बुजून आपलं स्वतःचं मन मारुन जगत असतो.
मनाच्या खोल कप्प्यात जतन करुन ठेवलेली आपली स्वतःची ओळख पुसण्याचा ती जगासमोर उघड न करण्याच्या सुचना आपण मनाला देतो. पण कधी कधी मन स्वतःच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी पराकाष्ठा करावी लागते. मन त्याचं गोष्टी लक्षात ठेवत ज्या आपण विसरण्याचा प्रयत्न करत असतो.
तुम्ही वरवर पाहता जगाच्या वहीवाटी प्रमाणेच जगता पण तुमचं अंतर्मन मात्र तुम्हाला जाणीव करून देत की तुझ्या मनात काय आहे तुझं स्वतःच स्वतःसाठी जगायला आनंद देणारं आपलेपणाने सांभाळून ठेवलेलं काय आहे.
तुम्ही कितीही व्यवहारी दृष्टिकोन ठेवून जगण्याचा प्रयत्न करत रहा तुमचं मन मात्र भावनेच्या हिंदोळ्यावर झोके घेत पाझरत पण तुम्ही कोणाबरोबर बोलू शकत नाहीत. कारण तुम्ही ठरवलं आहे की भावनेच्या भरात नाही तर व्यवहाराच्या दृष्टीने अत्यंत काळजीपूर्वक जगायचं आहे.
तुम्ही कितीही व्यवहारी व्हा पण तुमचं मन मात्र आठवणीने व्याकुळ होऊन जाते.
या जगात सर्व गोष्टींचा लिलाव होतो मनातील भावनांचा नाही.
व्यवहार जगाशी करा पण आत्मीयता ही आपल्या मनात जपलेल्या आठवणी सोबत असु द्या.
आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण व्यवहार विसरतो पण भावना नाही.
आयुष्य म्हणजे फक्त व्यवहार नाही तर आयुष्य म्हणजे प्रेम स्नेह आत्मियता व आपलेपणा...
व्यवहारासाठी जग आहे पण आयुष्य जगत असतांना आपली माणसं हवीत...!

184 

Share


Piraji Kamble
Written by
Piraji Kamble

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad