Bluepad | Bluepad
Bluepad
त्या दिवशी काय घडलं - भाग 2
Tushar Vandhekar
Tushar Vandhekar
23rd Sep, 2022

Share

त्या दिवशी काय घडलं - भाग 2
पोलिसांनी रामला कस्टडीमध्ये "सच बोल प्यारेलाल"चा हिसका दाखविला. त्याचा मोबाईल, गाडी, लॅपटॉप ताब्यात घेतले. कॉल हिस्ट्री तपासून पाहिली. थर्ड डिग्रीचाही वापर केला. पण पोलिसांना कुठलाही ठोस पुरावा मिळाला नाही. पण राम आता चक्रावून चालला होता. डोळ्यातून अश्रू वाहत होते. डोक्यात विचारांचे थैमान सुरू होतो. माझा आणि वैशालीची मोठा प्रशस्त बंगला होता. आमची राजा राणीची जोडी होती. आता ह्याच खोलीत खायचं आणि त्याच खोलीत धोयचं. अशी अवस्था चालू होती.
जर भाजी नाही आवडली, तर वैशाली काय भाजी केली. असे ओरडून सांगत होतो. आता इथे अळणी, तिखट खरपलेले कसेही असो गप गुमान खावे लागतं. राम स्वतःशीच फुटफुटत होता.
आपली समाजामध्ये काय प्रतिमा होती. जवळपास चाळीस पन्नास लाखांचा मालक मी आहे. आज माझी काय अवस्था झाली आहे. माझ्याकडे खूनी म्हणून बघितलं जातं आहे. राम एकटाच बडबडत होता. नातेवाईकांनी रामला भेटायला नकार दिला. बायको व आई- वडील, वकिलांच्या घरी, दारी वारंवार चकरा मारत होते.
आता रामला कोर्टात हजर केलं. सरकारी वकील आणि रामच्या वकिलांमध्ये युक्तिवाद सुरू झाला. डेड बॉडीवर रामाच्या बोटाचे ठसे, गाडीच्या टायरचे निशाण सापडले आहेत. रामने खून केला हे स्पष्ट आहे. सरकारी वकिलांनी त्यांचे म्हणणे मांडले.
खून झाल्यानंतर दोन दिवसांनी बॉडी मिळाली. तेव्हा राम तिथे नव्हता, तो हॉस्पिटलमध्ये होता. हे त्या हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीचे फुटेज व मोबाईलचे लोकेशन. रामच्या वकिलांनी त्यांचे म्हणने मांडले.
रामने खून करून बॉडी गाडीच्या डीक्कीत ठेवली आणि त्याच दिवशी जंगलात जाऊन बॉडी फेकून दिली. असा सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला.
त्यानंतर सरकारी वकिलाने टोलनाक्यावर काम करत असलेल्या एका कर्मचाऱ्याला साक्षीदार म्हणून कोर्टात हजर केले. राम दारू पिऊन गाडी सुसाट चालवत होता. असे त्या साक्षीदाराने कोर्टात सांगितले. रागाच्या नशेत रामने हे कृत्य केले आहे. असे सरकारी वकिलांनी म्हणणे मांडले.
रामच्या वकिलांनी स्कॉर्पिओ गाडी देखील त्या ठिकाणाहून गेली होती, मात्र पोलिसांनी तिचा शोध घेतला नाही. असे कोर्टाला सांगितले. कोर्टाने पोलिसांनी फटकारले. त्या गाडीचा शोध घेऊन पुरावे सादर करा. पुढील सुनावणी १ महिन्यांनी होईल. असे सांगून कोर्टाचे कामकाज थांबले.
आता कोर्टात तरखावर तारखा पडत होत्या. ह्या घटनेला आता २ वर्ष झाले होते. रामला अध्याप जामीन मिळाला नव्हता. समाज, पेपर, न्यूज मीडियावाल्यांनी रामला खूनी म्हणून जाहीरही केलं होतं. अनेक युक्तिवाद झाले. रामने खून केला, असा कोणताही सबळ पुरावा किंवा खून करण्याचा हेतूच मिळाला नसल्यानी कोर्टाने रामची ५ वर्षानंतर निर्दोष मुक्तता केली.
पण ५ वर्ष जेलमध्ये राहिल्यानंतर रामची मानसिकता बिघडून गेली होती. आपण न केलेल्या गुन्ह्याबद्दल स्वतःच्या आयुष्यातील ५ वर्ष असे वाया गेल्यानंतर आपण जगून फायदाच नाही, असे त्याला वाटत होते. आपल्याला जेव्हा खुनाच्या गुन्ह्यात अटक केली. तेव्हा टीव्ही, पेपरवाल्यांनी मोठे मोठे आर्टिकल छापले. खून कसा केला असेल याचे तर्क, वितर्क लावण्यात आले. म्हणजे मी खून कसा केला, हे समाजाला पटवून दिले.
आज माझी ५ वर्षानंतर निर्दोष मुक्तता झाली. तर एकही टीव्ही किंवा पेपरवाल्यांनी माझ्याबद्दल एक ओळही छापली नाही. का..? त्यांना छापावी वाटली नाही. राम वैशालीला रडून रडून सांगत होता. जाऊद्या सर्व सोडून नव्याने संसार सुरू करू असे वैशाली रामला सांगू लागली. पण दुनिया रामकडे अजूनही त्याच नजरेने पहात होती.
किती सोपं आहे ना. कोणावरही खोटं गुन्हा दाखल करायचा, त्याला तुरुंगात टाकायचं, मंग केस कोर्टात गेल्यानंतर काही वर्षे निघून गेल्यानंतर निकाल लागतो. पण तोपर्यंत त्याच सर्व काही थांबलेले असते. त्याची नौकरी, व्यवसाय सगळं काही ठप्प... नंतर निर्दोष सुटून आलाही तर समाजात जगण्याची मानसिकता उरत नाही.
असे अनेक प्रश्नांनी त्याच्या मनात घर केलं होतं. मात्र, राम आता तो खून मी नाही केला, असे वारंवार बडबडत होता. आणि आता त्याला त्या गोष्टीचे वेड लागले. "तो" खून मी नाही केला, म्हणून रस्त्यावर वेडसर सारखा आजही फिरत आहे.....
मंग तो खून केला कोणी...? आजही तो आरोपो मोकाटच आहे. शेवटी ती स्कॉर्पिओ गाडी संशयितच राहिली. पोलिसांनी तिचा शोध घेतलाच नाही...पोलिसांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे केलं असतं, तर आज राम व वैशालीच्या गोकुळामध्ये एखादा कृष्ण खेळत असता...
-तुषार वांढेकर​

176 

Share


Tushar Vandhekar
Written by
Tushar Vandhekar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad