Bluepad | Bluepad
Bluepad
विचार
Vaishnavi Shingare
Vaishnavi Shingare
23rd Sep, 2022

Share

आज शांत मन माझं झालं आणि स्वतःकडे बघ जरा असच जणू म्हणू लागलं. गेली कित्येक दिवस मी माझ्या मनाचा विचार केला नाही आणि मनाला हवा तेवढा वेळ काही मला देता आला नाही. आज विचार केला की मनाच थोडं ऐकावं आज मनाला हवं ते कराव. मग काय मन लागलं ना बोलू, चल आधी काय तरी आपण खाऊ, आणि चेहरा माझा हसला मनाने माझ्या डायरेक्ट तो फोटो मेमरी मधेच स्टोर जणू केला. हा क्षण जाऊच नये असं वाटल त्याला, उड्या मारत मारत गावभर फिरू असं बोलू लागला मला.वर्ष आणि वर्ष गेली सगळ्यांसोबत वेळ तुला घालवून, पण माझ्यासोबत वेळ का घालवला नाहीस असं बोलू लागलं मला ते आतून. त्याने माझ्या आठवणींना उजाळा दिला,आणि आज कित्येक दिवसांनी पहिल्यांदा मी माझ्या मनाचा विचार केला. ते मला बोल कधीतरी माझ्यावर पण काय तरी लिहीत जा, तुझ्या या मनाच्या भावना तुझ्या शब्दात मांडत जा. मला तरी कळू दे तु तुझ्या मनाला किती ओळखतेस, आणि वेळ त्याला द्याला किती वाट बघायला लावतेस कस असत ना जे जवळ असतात त्यांच्यासाठी टाइम् नसतो आणि बाकीच्यांसाठी मात्र तुमचा टाइम् 24 तास available असतो, का असं होत की तुला वाटत तुला कोणी वेळ दिला नाही की तुझ्या मनाला वाईट वाटत तुला काय माहित तुझ्या मनाला सर्वात जास्त दुःख तुझ्यामुळेच असत. ते माझं मन आज मनमोकळेपणाने बोल माझ्याच मनाच्या शब्दांनी आज माझ्या डोळ्यात पाणी आणलं. बोलता बोलता ते हे ही बोल कस असत ना लहान असता तुम्ही तेव्हा आमचे असता, स्वार्थी या जगात तुम्ही स्वतःलाच गमवून बसता, त्याच आज सगळं मला पटत होत, आणि आज माझ्या मनसोबत मला अजून छान जगू वाटत होत. बोल ते हेही तु स्वतःकडे बघ आणि या स्पर्धेच्या युगात मनाला मात्र जप, हलक नाही तुझं मन हे तुला माहीत असुदे कितीही कठीण प्रसंग आले तरी तुझ्या डोळ्यात अश्रू न येता चेहऱ्यावर छोटंसं हसू असुदे. त्याचे ते शब्द मला भावले आणि हसायचं कधी हे एका क्षणात जणू सांगून गेले. हसायचं महत्व त्या मनानी सांगितलं, आणि आनंदी कस जगायचं हे सांगून या भेटीत गेलं. पण वेळ गेला आणि दिवस, माझं मन बोल घेतो मी तुझा आता निरोप गरज असेल तेव्हा परत येईल आणि तुला प्रत्येक वेळी चांगलाच सल्ला देईल. अस बोलून त्याने माझा निरोप घेतला, आणि माझ्या मनाच्या रूपात मला माझा नवीन मित्र भेटला 🥰

173 

Share


Vaishnavi Shingare
Written by
Vaishnavi Shingare

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad