Bluepad | Bluepad
Bluepad
बखर एका अहल्येची
धनश्री अजित जोशी
23rd Sep, 2022

Share

बखर एका अहिल्येची (49)
दादां ची तब्येत बरीच खालावली होती.शरीरावर अमानुष माराच्या जखमा , खुणा होत्या. रोज त्या स्वच्छ करून त्याला मलम लावावे लागे.वहिनी अत्यंत मनापासून सगळं करत असत. त्यांची ताकद भरून यायला बरेच दिवस लागले.
दोन महिन्यांनतर ते जेमतेम अंथरुणावरून उठून थोडे चालायला लागले. वहिनींची कमाल .त्यांनी न कंटाळता त्यांची सगळी सेवा केली.
आजारपणात दादा मनाने खचले. विनायक सावरकर अंदमानात मरण यातना सहन करत आहेत . आपले साथीदार निडरपणे अन्यायाविरूध्द लढत आहेत,आपण त्यांच्या बरोबर नाही राहू शकलो.कमजोर ठरलो .हारलो .अशी भावना त्यांच्या मनात .त्यामुळे साथीदारांच्या आठवणीने , आपण लढा अर्धवट ठेवला या भावनेने ते स्वतःला अपराधी समजत.
मामंजी , हे सतत त्यांच्याशी बोलत त्यांना एकटं वाटू नये म्हणून प्रयत्न करत . हळूहळू त्यांची तब्येत सुधारू लागली.
त्या दिवशी ते पंगतीत सर्वांबरोबर जेवायला बसले .सगळ्यांनाच कोण आनंद झाला होता म्हणून सांगू. त्या दिवशी मोठ्या आईंनी खास उकडीचे मोदक केले होते.
खूप दिवसांनी हासत खेळत पंगत झाली. तो दिवसच खूप आनंदाचा होता.
दुपारी दादा वहिनी अचानक दादां ची तब्येत बघायला म्हणून आले . चांगले चार दिवस राहिले. वहिनीशी गप्पा करता आल्या.
" श्रीरंगचा मामा आलेला आहे .उत्तम मुहूर्त बघ . त्याचे ऊष्टावण आणि जावळ करून घेऊ यात." मोठ्या आई मामंजींना म्हणाल्या .
" उत्तम , लगेचच बघतो." मामंजी उत्साहाने म्हणाले .
"उद्याचा दिवस शुभेच्छा आहे .उत्तम.उद्याच करूया ."
कार्यक्रम ठरला तशी सगळ्यांनाच उत्साह संचारला.
राघव भावोजीं नी गावातल्या ताशेवाल्याला बोलावले. घराच्या दाराला केळीचे खांब लावले .
मोठ्या आई काकू उत्साहाने स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या .खूप दिवसांनी घरात उत्साह दिसत होता.
" श्रीरंगा ,तझं बारसं घाईघाईने घरातल्या घरात करावे लागले . आता जावळ ऊष्टावण जोरदार करूया .काय?
" असे मोठ्या आईंनी म्हणताच लब्बाड गोड हासला. त्याच्या गालावरची खळी खुलून दिसत होती .
मामाच्या मांडीवर बसून जावळ झाले,उष्टावण झाले . खूप दिवसांनी घरात मंगल कार्यक्रम होत होता. आनंद भरून राहिला होता.
दादां वहिनी आले आणि घरात आनंद भरून गेले . घरंच मायेचं माणूस भेटलं ,चार दिवस कसे छान गेले.
दिवस कसे भराभर जात होते. आता मोठ्या आई थकल्या होत्या .नातवंडांना खेळवण्यात , गोष्टी सांगण्यात आपलं मन रमवीत असत. दादांनी हळूहळू शेती वाडीत लक्ष घालायला सुरवात केली त्यामुळे ह्यांची जबाबदारी हलकी झाली.
धाकटे दोन्ही दीर शिक्षणासाठी पुण्यात गेले . दोन्ही वन्संची लग्न झाली. मनुताईंना मुलगी झाली . एकेक जबाबदारी हलकी होत होती .मलाही श्रीरंगच्या पाठीवर दोन मुली झाल्या ..मुक्ता आणि मंगल .घराचं गोकुळ झालं होते.
सावरकर आणि साथीदारांना अटक केली तशी अभिनव भारतचे काम थंडावले.
राघव भावोजींच्या घरी शनिवारी सगळे जमत असत.गावातले काही तरूणही त्यांना सामील झाले. पुस्तक वाचन चर्चा होत असे. बरेच दिवस काही तरी खलबतं चालू होती. बरीच पुस्तके घेऊन राघव भावोजी पुण्याला देऊन सुखरूप आले.
दादां विशेष खुश होते.एक काम पार पडले होते.नंतर कळले त्या पुस्तकात म्हणे बाॅम्ब कसा तयार करायचा..हे लिहिलेलं होते.
गावातल्या तरुणांच्या मदतीने म्हणे पडक्या घरात मागे बाॅम्ब तयार केला होता..गुपचूप . मागून आपलं काहीतरी कानावर येत असे.
गावातले तरूण हातात झेंडे घेऊन देशभक्तीपर गाणी म्हणत प्रभातफेरी काढत.त्यात ह्यांनी म्हणे बरीच गाणी रचली होती.दादाही आघाडीवर असायचे. पोलीस पाटलांचीच तरूणांना फुस होती . गावात स्वातंत्र्याची चळवळ उभी रहात होती.
सावरकरांची सुटका झाली .ते रत्नागिरी जवळ राहिला आले . त्यामुळे परत उत्साह संचारला . त्यांनी भेदाभेदाला विरोध करायला सुरूवात केली .
हे आणि दादा नियमित सावरकरांना भेटायला जात असतं.मामंजीं सुध्दा जाऊन भेटले.
त्यांनी रत्नागिरीस पतित पावन मंदिर बांधलं.एक दिवस आम्ही सर्वजण दर्शनाला गेलो होतो.
तेव्हा सावरकरांना पाहिले. खूप गर्दी होती.
गावात मंगू महाराकडे सत्यनारायणाची पूजा होती . सावरकर आले होते प्रसादाला त्यांच्याबरोबर हे आणि दादा पण गेले .गावात केवढा गहजब झालानी.
अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे.सगळी माणसं सारखीच .हा सावरकरांचा विचार सगळ्यांना एकदम पटण्या सारखा नव्हता .
मामंजी प्रवचनांतून लोकांना हा विचार पटवून द्यायचा प्रयत्न करत दादांही छान कीर्तन प्रवचन करत.
एकनाथ , तुकाराम ज्ञानेश्वरांच्या गोष्टी सांगत. हळूहळू गावातील लोकांचा विरोध कमी होऊ लागला .
मला आठवतंय गणपती उत्सवात समारज्ञाच्या. दिवशी गावातील काही लोकांना पाने वाढून देत असत.ती येऊन घेऊन जायची.त्यावर्षी दादांनी नी ह्यांनी सर्वांना जेवायला बोलावलंन . त्यावेळी तात्यारावही आले होते. सगळ्यांना एकत्र बसवून पंगत वाढलीन. तात्यारावांनी कौतुक केले.
तेव्हापासून आमच्या घरी कधी भेदाभेद नाही पाळला गेला.
गावातल्या धर्ममार्तंडांनी विरोध केलान् पण तात्यारावांचा आशीर्वाद असल्यावर असल्या विरोधाची पर्वा कोण करणार ?.
अन् थोरला म्हणेल तसं ही घराची शिस्त. त्यात त्यांना मामंजींची संमती.
मनुताईंला संसार छान मार्गी लागलेला पाहून एक दिवस दादांनीच विषय काढलान.
" मला वाटते उमाताईंच्या लग्नाचा विचार करायला हरकत नाही."
" कोण करणार रे लग्न तिच्याशी? तुझ्या नजरेसमोर कोणी आहे का? " मोठ्या आईंनी विचारले.
"रत्नागिरी ला माझा एक मित्र आहे मध्या . माधव म्हणून त्याची बायको बाळंतपणात गेली आहे.त्याला विचारून बघावे म्हणतो."
" हरकत नाही बघ विचारून " मामंजींनी होकार दर्शवला तशी दादांनी शब्द टाकला .
उमाताईंना विचारलन त्या काय बिच्चार्या खाली मान घालून बसल्या होत्या .
" उमाताई तुम्हाला विचारतात."वहिनी म्हणाल्या.
" तुम्ही माझे भलंच कराल .मी आपल्या शब्दाबाहेर नाही. "
उमेची अनुकुलता दिसली तशी
एक दिवस. दादा घेऊनच आले माधव भावोजींना.त्यांनी उमेला पसंत केले.
फारसा गाजावाजा न करता रत्नागिरीला उमाताईंचा विवाह तात्यारावांच्या आशीर्वादाने पार पडला.
"पोरगी संसाराला लागली." मोठ्या आई समाधानाने म्हणाल्या .
गावांत एकंदरीत सुधारकी घर म्हणून आमच्या घराला ओळखू लागले.
एकदोनदा काही निमित्ताने तात्याराव घरी येऊन गेले . त्यांचे आशीर्वाद मिळाले तसे सगळं भरून पावले.
क्रमशः
सौ.धनश्री अजित जोशी पुणे.
बखर एका अहल्येची
# बखर एका अहिल्येची.

175 

Share


Written by
धनश्री अजित जोशी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad