Bluepad | Bluepad
Bluepad
घाटकोपर to ठाणे🚈 मुंबई डियारीज पार्ट 1
Dipapooja Chavhan❤️
Dipapooja Chavhan❤️
23rd Sep, 2022

Share

नेहमी मी माझा प्रवास सुरुवातीपासून मांडते पण ह्या वेळेला जरा वेगळं करू या..... हा प्रवास माझ्यासाठी जरा खास आहे म्हणून हा प्रवास आपण शेवट पासून सुरुवाती पर्यंत जगूया...!!
मी जेव्हा मुंबई वरून परत येण्यासाठी निघणार होते त्या दिवशी घाई घाई सुरू होती. टिफीन बनवून झाला होता... तेवढ्यात मला वाटलं की कवीताई ला भेटून यावं आणि मी पायऱ्या चढत वर गेले.... तिला आवाज दिला तस आता तिची सवय झाल्याने मला जड जात होत... पण तरी मोठ्या धाडसाने हसत तिला बाय केलं... आणि खाली आली ... तो पर्यंत मामा मामी बाहेर आले होते... बाकीच्यांना भेटून निघत होते....मामांचा मुलगा मला पण यायचं म्हणून रडत होता .. मामी सुद्धा रडतीये हे जरा उशिरा च कळले.. त्या आधी च मॅडम मला मोठ्या प्रेमाने बाय बोलून गेल्या होत्या. आता पायात चप्पल घालून निघणार तेव्हा कविताई खाली आली.... मी काही बोलणार इतक्यात तीनी मिठी मारली आणि रडायला लागली.... !!
स्वतःला कसं तरी सावरलं... पण तिला सावराव तेवढ्यात ती निघून गेली....कारण मला बाय करण तिला जमणार च कुठे होत...... तिथून स्टेशन वर गेलो आणि ठाणे च्या तिकीट घेऊन लोकल साठी वाट बघत होतो लोकल आली... आज माझ्याकडे बॅग थोडी जड होती... लोकलच्या गर्दीत मी हरवले होते इतकी गर्दी मी तीन महिन्यात अनुभवली नव्हती..... ऑफिस टाइम असतो म्हणून गर्दी असते म्हणे त्या टाइम वर गर्दीत कुणीतरी मला बोलून च गेलं काय पहिल्यांदा प्रवास केल्यासारख वागतीये ही... आता त्यांना कुणी सांगावं की ते खर होत इतक्या गर्दीत मी या आधी सापडले नव्हते....कसं बसं ठाणे गाठल.... गावाकडे येणारी गाडी यायची होती. थोडा वेळ होता म्हणून फोन करून कविताई आणि मामी ला फोन करून बोलून घेतल.... थोडा वेळ स्टेशन वर थांबले होते त्यावेळी धो धो पाऊस कोसळत होता कधी ही n लागणारी लोकल ची दारे लावत प्रवास लोक करत होती... तेवढ्यात रेल्वे प्रशासनाचा भोंगा वाजला माझी गाडी रुळावर आली होती आणि मी भानावर.. तोपर्यंत मी परत जाऊ का हाच विचार मनात घोळत होता.... कारण त्या दिवसाची रडकी चेहरे माझ्या डोळ्यासमोर येरझारा घालत होते.. पण गाडी मध्ये इच्छा नसताना सुद्धा बसणे भाग होते..... गाडी न. 12111 प्लॅटफॉर्म नंबर 4 पर आ चुकी है | सारखं सारखं का ओरडत असेल ती माहित आहे ना जायचं आहे च.....
शेवटी आठवणीची पेटी घेऊन मी गावाकडे परतले.. तो दीपिका पादुकोण चा फेमस डायलॉग डोक्यात घोंगत होता... तकलीफ हुई लेकीन यादो का पिटारा .....
घाटकोपर to ठाणे🚈 मुंबई डियारीज पार्ट 1

176 

Share


Dipapooja Chavhan❤️
Written by
Dipapooja Chavhan❤️

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad