Bluepad | Bluepad
Bluepad
स्वार्थी माणूस आणि प्राणी आणि पक्षी.
Swaranjali  REWALE
Swaranjali REWALE
23rd Sep, 2022

Share

माणसं आणि पक्षी, प्राणी यांच्यातील भेदभाव.
स्वार्थी माणूस आणि प्राणी आणि पक्षी.
घुबड -. घुबडाला बघितलं तर काही लोक बोलतात की अशुभ असतात. तर काही लोक बोलतात की शुभ असतात.
घुबड हा देवीचं वाहन, मग ते अशुभ कसा असेल.
खरं म्हणायला गेलं तर प्रत्येक माणूस आपल्या फायदायचं किंवा सोईस्कर बघतो त्याला.
स्वार्थी माणूस आणि प्राणी आणि पक्षी.
तसंच माणसाचं आहे तो आपल्या फायद्याच बगतो.
जोपर्यंत समोरचा त्याला उपयोगी असतो तोपर्यंत तो चांगला असतो.. त्याने मदत करणं किंवा चांगल बोलणं बंद केलं की तो वाईट.
सरडा - सरडा हा प्राणी जसा चालतो तसा रंग बदलतो. सर्व रंग बदलून झाले की नंतर तो मुळच्या रूपात येतो.
तसंच माणसाचं आहे तो स्वतःच कामं झालं की स्वतःचा खरा रंग (स्वभाव ) दाखवतो.
स्वार्थी माणूस आणि प्राणी आणि पक्षी.
म्हणूच माणसाला सरड्याची उपमा दिली.
पाल - भिंतीवर दिसणारी किंवा घरात दिसणारी.
काही लोक बोलतात की पाळीला मारु नये. मारली तर पाप लागतं आणि पुढच्या जन्मी पाणी मिळत नाही.
काही वेळा माणूस बोलतं असताना चिप,चिप असा आवाज केला तर अशुभ असतं. तर काही लोक चांगलं बोलतं असताना चिप,चिप आवाज आला तर शुभ बोलतात.
तर काहींना तिची घाण वाटते.
इथे पण माणूस आपण चांगल बोल तरी अशुभ वाटत.
आणि वाईट असेल तर चांगल बोल्यावर शुभ असतं. असे माणसांचे विचार.
कुत्रा - हा प्राणी इमानदार प्राणी म्हणून ओळखला जातो. काही लोक त्याला आपली आवड म्हणून पाळतात. तर काही लोक आपल्या कामासाठी वापरतात.
स्वार्थी माणूस आणि प्राणी आणि पक्षी.
स्वार्थी माणूस आणि प्राणी आणि पक्षी.
काही लोक त्याचे हाल करतात. खायला घालु शकतं नाही पण त्याना रस्त्यावर मारायला धावतात.
तसंच काही माणसं असतात जी प्रामाणिक असतात.पण काही लोक त्या प्रामाणिक लोकांचा फायदा घेतात. त्यांना खूप त्रास देतात, नको नको ते बोलतात. त्यांचा वापर करून घेतात, कामं झालं की घालुपाडून बोलतात..
त्याना चांगल तर बोलतं नाही पण नेहमी त्रास देत राहतात. त्यांचं जिवन एक गरीब कुत्र्या सारखं बनवतात. म्हणजे रस्त्यावर जे कुत्रे असतात तशी गत असते चांगल्या माणसांची.
गाय - गाय हा प्राणी मायाळू आणि शांत स्वभावाचा आहे. गायला माणसं तिला हवं तस वापरतात. म्हणजे कोण बोलले पांढऱ्या / काळ्या गाईला हे दिलं की असं घडेल. म्हणून तिला खायला देतात.
तर काही लोक तिला बांधून स्वतःचा व्यवसाय करतात.
तिच्या पुढे चारा असून तिच्या पोटात पूर्ण जातं नाही. समोर चारा ठेवून तिला खाता येत नाही.
जेव्हा कोणाला दया येईल तेव्हा तो १०/१५ रुपये देऊन तिच्या मालकाला चारा देयाला सांगेल.
स्वार्थी माणूस आणि प्राणी आणि पक्षी.
बिचारी उपाशी किंवा अर्ध पोटी राहत असेल.
तिला वासरू असेल तर त्याला सुद्धा अर्ध पोट ठेवतात.
काही वेळा गाई रडत असतात आणि त्यांचे अश्रू येऊन सुखलेले दिसतात. माणूस किती मोठं पाप करतो हे कमवायच्या नादात विसरून जातो किंवा मुदाम करतो.
म्हणजे माणूस किती स्वार्थी आहे. स्वतःच पोट भरण्यासाठी किंवा पैसा साठी मुक्या प्राणांचे हाल करतो.
तसंच माणूस समोरच्याला सर्व काही करत असेल किंवा देत असेल तोपर्यंत चांगला. नंतर त्याला जाणीव पण होतं नसते की आपण किती घ्यावं दुसऱ्याचं!
समोरचा देणं बंद केलं मग त्याला देणाऱयाच दुःख किंवा अडचणी पण नाही दिसत.
कावळा- कावळा मुळात काळा असल्यामुळे त्याला कमी लेखलं जातं.
जर समोर येऊन ओरडत असेल तर माणूस हाकलतो.
तोच जर झाडावर ओरडत असेल तर माणूस बोलेल कोणी येतय.
नेहमी खिडकीत आला तर हाकलतात आणि त्याचं कावळ्या ला वाडी देण्यासाठी काऊ काऊ ये, ये बोलवतात.
तर काही माणसं तो शिटला तर शुभ मानतात, तर काही घाण म्हणून शिव्या घालतात.
म्हणजेच माणूस आपल्या सोईस्कर प्रमाणे वापर करतो.
तसंच कावळा प्रमाणे माणसाला पण अशीच वागणूक मिळते.
मांजर.. मांजर ही खूप जणांच्या घरात बघायला मिळते.
काही माणसं तिला रात्यातून आडवी गेली तर अशुभ बोलताततर काही माणसं मांजर रडली तरी अशुभ मानतात.
काही माणसं तिला पायने हाकलतात तर काही माणसं तिला खूप मारतात.
स्वार्थी माणूस आणि प्राणी आणि पक्षी.
काही माणसं तिला घरात जेव्हा समजत की तिला पिल्लं होणार आहे तेव्हा तिची खूप काळजी घेतात. तर त्यात अशी पण. माणसं आहेत तिची काळजी मतलब म्हणून काळजी घेतात. बोलतात की ती जेव्हा पिल्लाना जन्माला घालते तेव्हा जे तिच्या शरीरातून नाळ पाडते ती लगेच खाऊन टाकते.
आणि काही माणसच म्हणणं आहे की ती नाळ जपून ठेवली तर आपण श्रीमंत होऊ.
कासव -. कासव हा प्राणी खूप शांत आणि निरागस प्राणी आहे.
त्याने सागर मंथ च्या वेळी त्याचा खूप महत्वाचा वाटा आहे.म्हणून देवाच्या दर्शनाला जातात माणसं तेव्हा त्याला आधी नमस्कार करून नंतर पुढे जातात.
कासव चालताना मागेपुढे बघून नंतर पुढचे पाहुल टाकतो.
आपला मार्गात कधी हार मानत नाही किंवा थांबत नाही हळु हळु चालतं राहतो.
काही माणसं त्याला दिसल्यावर अशुभ मानतात. तर काही लोक त्याला शुभ म्हणून घरात पाळतात. असं बोलतात की त्याला घरी आणलं तर पैसे येतात. म्हणजे इकडे पण आपला फायदा बघतो.माणूस काही प्रणांना पाळत असेल तर हेतू ठेवून पाळतो
.
स्वार्थी माणूस आणि प्राणी आणि पक्षी.
हे गुण काहीं माणसं आपल्या माणसाबरोबर पण घडतात. माणूस आपल्या फायद्यासाठी सर्वांचा वापर करतो.
सांगायचा मुदा हा की माणूस खूप मतलबी आणि इतका स्वार्थी आहे की तो प्राणांचा, पक्ष्याचा सुद्धा वापर करतो.

236 

Share


Swaranjali  REWALE
Written by
Swaranjali REWALE

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad