Bluepad | Bluepad
Bluepad
अपेक्षांचे ओझे
मृण्मयी" मनवा"
मृण्मयी" मनवा"
23rd Sep, 2022

Share

किती वेळा मन मारावे लागले असेन माहित नाही तिला.
लग्न झाल्यावर मित्र असणारा एकदम नवऱ्याच्या भूमिकेत जातो. मनधरणी करणारा मित्र,नवरेशाही गाजवायला लागतो
रडत असताना ती नाटकी आहे म्हणून दाखवता,
प्रेमाने जवळ जावे बोलावे तर लाडात येऊ नको म्हणता,कमी बोल म्हणता.
थोडे रुसावे म्हटले तर आनंदाने वेडे होता,
कॉल केला तर शंकेखोर म्हणता नाही केला तर तुला काळजीच नाही माझी असेही म्हणता.
निटनेटके राहिले तर नखरेल म्हणता साधी राहिले तर  काकू बाई म्हणता.
सीतेसारखी हो म्हणता रामासारखे मी होतो असे म्हणतच नाही.
तुमच्या डोक्यावर केस नसतील इतक्या मैत्रिणी आहेत तुम्हाला, तुमची बायको तुम्हाला मैत्रीण म्हणून चालू नये.
मैत्रिणीसाठी वेळ अन बायकोसाठी वेळ नाही आणि प्रेमळ शब्द सुद्धा नाहीत
म्हणे तू अशी हवी मला तशी हवी मला.
तुम्ही कसे हवे आहात विचारता का तुमच्या बायकोला,
कायम गृहितच धरता तिला.
असे हे लग्नाअगोदरचे प्रेमी लग्नानंतरचे नाटकी अन जाणीवपूर्वक विसरभोळे नवरे होतात
!!©मनवा!!

168 

Share


मृण्मयी" मनवा"
Written by
मृण्मयी" मनवा"

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad