Bluepad | Bluepad
Bluepad
गुरु
सुधीर  पिंपळे
सुधीर पिंपळे
23rd Sep, 2022

Share

गुरु परंपरा ही फार आदी कलापासुन चालत आलेली परंपरा आहे.
याचा उल्लेख रामायण महाभारत व अलीकडील काही वैदीक काळापासुन ते आजही बऱ्याच प्रमाणात गुरु शिष्या परंपरा जोपासल्या जाते.
अपण जन्माला आलो, त्या वेळेस आपला पहीला गुरु आई व नंतर बाबा व पुढे जाऊन जीवन जगत असतांना, आपल्या गुरुजनापासुन ते बऱ्याच गोष्टी पुढेही जीवनात आपण शीकतच असतो.
व हे सारे शीकवणारे आपले गुरु असतात. पण हे सारे आपल्या मान्यावरच आहे. कारण कोण कधी काय आपल्याला शीकवुन जाईल, व त्याचा फायदा आपणाला केव्हा व कसा होईल.
हे सांगणे फारच कठीन आहे.
पण गुरुकडुन मीळालेल्या ज्ञानाचा फायदा आपल्याला जरुर होतो.ते केव्हा व कसा घ्यावा हे फक्त आपल्याला माहित पहीजे.
जीवन जगत असतांना मला एक असाच आलेला अनुभव....
मी ही तुमच्या सारखाच आईबाबा व आपले गुरुजन ते आपल्या वाडवडीला पासुन सर्वच काही शीकत गेलो.
आज जे काही मी लीहतो कथा, कविता, लेख, नाटक आणी बरच काही, यामागे माझ्या जवळच्याच नातेसंबंधात असलेल्या गुरुचा आशीर्वाद आहे.
आम्ही आजपासुन 40 वर्षा पुर्वी" तांदळा" ह्या आमच्या मुळ गावी राहात आसतांना
आमचे कही सवोगडी मीळुन नाटक करायचे ठरले.
पण आमच्याकडे नाटकाचे पुस्तक नव्हते व ते पोस्टाने बोलवायचे म्हटले तर पोस्टाची सुविधा नव्हती व ते जाऊन आनयचे म्हणजे 20 कीलोमीटर चालत जाऊन सकाळची बस पकडायची व तीथुन 50 ते 60 कीलोमीटर तालुक्याला
जायाचे व तीथे पुस्तक मीळेल याचाही काही भरोसा नव्हता .
शिवाय आर्थिक बाबीचा विचार केला तर तेंव्हा ते शक्यही नव्हते.
म्हणुन मी व आमचे काही मीत्र व माझा मामा आम्ही चर्चा अंती असे ठरवले की, नाटक आपण स्वताहा लीहायचे व
तोंडी कहाणी उतमामा सांगणार व त्या कहाणीच्या आधारे नाटक लीहण्याची जबाबदारी माझ्यावर ठेवली.
पण... मला त्याचे क म्हणता फ महीत नव्हते फक्त 8 वी ते 9वीत आसतांना 3 अंकी नाटक एक दोन वेळा पहीले तेवढेच....
मी नकार दीला. परत सर्वांनी जोर दीला नतंर मी हो म्हटले..
नंतर उतमामाने मला कहाणी सांगीतली. एका बहीनीवर झालेल्या अत्याचाराची कहाणी. नंतर तीचा भाऊ कसा बदला घेतो व आपली शपथ पुर्ण करतो... हे कहाणी मामांनी सांगीतली व शीर्षक " तुझी शपथ" दीले. व नाटक 4 अंकी असेल व ते आपल्याला दीवाळी "भाऊबीज" च्या दीवसी करायचे आहे. तेंव्हा तु हे नाटक 15 दीवसात लीहुण काढ नंतर आपण 7 दीवसात स्क्रीपट लीहु व 7दीवस तालीम घेऊन नाटक पार पाडु....
बाकीचे काम मी प्रतेकाला देतो असे म्हणत मामा जाऊ लागला.. मी मामाला थांबवले व म्हटले "मामा मला जमणार नाही रे"
हे आयकुन मामा जवळ आला व मला म्हणाला, सुरवात तर कर, बाकी मी आहेच..
असे म्हणुन मामा नीघुन गेला.
आता लीहण्याची सर्व जबाबदारी माझ्यावर होती. मी दुसऱ्या दीवसा पासुन नाटक लीहायला सुरवात केली. कहाणी व पात्र मामांनी सांगीतले होते. मी त्यांना फक्त शब्द
रुपी आकार दीला. व लीहीत गेलो....
व एक चमत्कार झला. मी ते 4 अंकी नाटक "तुझी शपथ" शीर्षक, असलेले 12 दीवसात लीहुन पुर्ण केले.
व थेट मामाकडे जाऊन त्याला ते वाचण्यास दीले. मामाने ते सलग 5तास बारकाईने वाचन पुर्ण केले.
मामा माझ्याकडे आला तो जाम खुष होता. "नाटक चांगले लीहले असे म्हणत, त्याने माझी पाठ थोपटली.
बाकी आम्ही 4 ते 5 दीवसात सर्व पात्राच्या स्किपस्ट लीहुण
नाटकात पात्र करण्यासाठी नीवडले ल्या कलाकाराला
दील्या व आमची तलीम चालु झाली....
तलीम करतांना कही कलाकार फेरबदल करावे लागले व शेवटचे 3 दीवस रंगीत तालीम घेऊन... एकंदरीत सर्वच व्यवस्था करुन
तो दीवाळी भाऊबिजेचा दीवस उजाडला, नाटक करण्याची वेळ आम्ही रात्री 8 वाजता ठेवली. सकाळपासूनच आमची मुले स्टेज करपासुन छोटे मोठे काम करायला लागली. लाईट इफेक्ट फतन मामा, तर संगीत कीसन माळकर आलाऊसींग ऊतम मामा असी नटक उपयोगी लागणारी मदत सर्वांनीच केली.
व आम्ही कीमान सर्व तयारी झाल्यावर आमचे कलाकार घेऊन स्टेजवर 7-30 वाजता पोहोचलो.
पहीली आरती व नंतर पात्र परीचय होऊन बरोबर 7 वाजता आमचे नटक "तुझी शपथ" चालु झाले.
प्रतेक कलाकाराने अभीनय खुपच छान केला.
नाटक जाम चांगले झाले. नविन कलाकाराने अभीनय एवढा चांगला केला की ते शब्दात सांगणे कठीन आहे.
आस्या प्रकारे मी एका रात्रीत माझ्या मामाच्या म्हणजे, मझ्या
"गुरु च्या" मदतीने लेखक झालो. त्या नंतरही मी बरीच नाटके लीहली.
मी तिथेच न थांबता माझे लीखाण चालुच ठेवले..
कथ, कविता, लेख आ चारोळी हींदी, मराठी शायरी माझ्या
बऱ्याच लीखानाला खुप सारे पुरस्कार मीळाले.
पण हे सारे श्रेय मझ्या उतममामाला जाते. त्याने मला लीहण्याची चालणार दीली. व त्या नाटकात काम करणाऱ्या
नविन कलाकाराला जाते. जे सर्वच कलाकार आमच्या
तांदळा गावचे होते त्या माझा लाहान भाउपण होता.
या साऱ्यांनीच माझ्यावर भरोसा करुन नाटक मला लली आयला लावले..... या साऱ्यांनीच मला कहीना काही शीकवले
ते सारेच माझे गुरु ठरले.
मी हा लेख त्या सर्वानाच समर्पित करतो ज्यांनी आपला आमुल्या असा वेळ माला देऊन मला प्रकाशमान केले.
पुढेही या किंवा इतरही आम्ही केलेली नाटके कलापथक, तसेच टिपरी डान्स, पासुन ते म्युझिकल नाईट शो पर्यंत,
बरेच काही..
त्याच्या आठवणी एका भागात लीहणे शक्य नही म्हणुन
पुढेही जमेल तसे....यवर लीहीत राहु त्याचे भाग 1, 2,3,....
आसे..🙏🙏
= = = = = = == = = =
लेखक- सुधीर बी. पिंपळे 🤞 🤞 💐💐

184 

Share


सुधीर  पिंपळे
Written by
सुधीर पिंपळे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad