Bluepad | Bluepad
Bluepad
🙏 विज्ञान आणि 'धर्म व अध्यात्म'🙏
दत्तात्रय केरबा पाटील
दत्तात्रय केरबा पाटील
23rd Sep, 2022

Share

समाजामध्ये बघायला गेलं तर दोन प्रकारची लोकं आढळून येतात.एक म्हणजे जे विज्ञानावरती विश्वास ठेवणारी आणि दुसरे म्हणजे अध्यातमावरती विश्वास ठेवणारी.या सगळ्या पलीकडे जाऊन पाहिलं तर दोन्ही गोष्टींवर श्रद्धा आणि विश्वास असणारी एकच व्यक्ती होती आणि ती म्हणजे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती आणि एक महान वैज्ञानिक आदरणीय दिवंगत ए पी जे अब्दुल कलाम सर.
आदरणीय कलाम सरांचे जीवनचरित्र -
पूर्ण नाव - अविल पकिर जललौद्दिन कलाम.
जन्म - दि.15 ऑक्टो. 1931, रामेश्वरम्.
मृत्यू - 27 जुलै 2015, शिलाँग.
पुरस्कार - भारतरत्न, विर सावरकर पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार इत्यादी.
पदे - राष्ट्रपती ( 2002 -2007), मुख्य वैज्ञानिक सल्लागार भारत सरकार (1999 -2001)
शिक्षण - मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (1955 - 1957)
सेंट जोसेफ कॉलेज, तिरुचिरापल्ली (1951 - 1954)
पुस्तके - अग्निपंख, त्रांस्केंड, इग्निट माईंड, माय जर्नी, इत्यादी.
कलाम यांचं पूर्ण नाव अवल पाकिर कलाम असून त्यांचा जन्म दि.15 ऑक्टो.1931 रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम् या शहरात एका गरीब कुटुंबात झाला होता.त्यांचे वडील होडी चालवण्याचे काम करत होते.रामेश्वरम् ते धनुषकोडी व धनुषकोडी ते रामेश्वरम् अस हिंदू लोकांना सोडण्याचं काम ते करत असत. ते सुद्धा अतिशय कष्टाळू व सर्वसमावेशक होते. इतर धर्माची लोकं त्यांचे चागले मित्र होते, एखादा प्रश्न किंवा अडचण भासली तर ते इतर धर्मांच्या लोकांच्यासोबत विचारविनिमय करून सोडवत असतं. आपल्या धर्माबद्दल जितका त्यांना आदर आणि श्रद्धा असे तितकच ते इतर धर्माबद्दल सुद्धा बाळगत असतं.त्यांच्या या संस्कृतीचा कलाम यांच्यावर फार मोठा प्रभाव झाला.आणि त्या प्रेरणेतून पुढे कलाम घडत गेले.नंतर पंबन ब्रीज झाल्यावर त्यांच्या वडिलांचा होडी व्यवसाय बंद झाला, ज्यामुळे आपले बहीण, भाऊ आणि एवढं मोठ कुटुंब सांभाळायची जबाबदारी कलाम यांनी आपल्या शिरावर्ती घेतली. त्यांनी त्यासाठी प्रसंगी वृत्तपत्रे वाटण्याचे काम केले.
मुळातच हुशार आणि शिक्षणाची आवड असल्यामुळे कसेही करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.त्यांच्या शिक्षणाची उंची ही मोजता न येण्याजोगी होती. जवळपास पाच पी एच डी पदव्या त्यांच्याकडे होत्या. पुढे त्यांनी डॉ.विक्रम साराभाई आणि डॉ.सतीश धवन जे की उत्तम आणि असामान्य वैज्ञानिक होते, यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या वैज्ञानिक करिअर ची सुरुवात केली. ते ISRO या भारतातील प्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्थेत एक महान वैज्ञानिक म्हणून नावाजले गेले.
विज्ञानाप्रमाने धर्म व अध्यात्मावरती सुद्धा कलाम यांची अपार श्रद्धा होती याच उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. पेरेरा . डॉ.परेरा हे एक मोठे ख्रीशन धर्मीय धर्मगुरू(फादर) व सर्व फादरांचे ते मुख्य व धर्माची महान शिकवण देऊन लोकंच्यामध्ये जागृती करणारे महान व्यक्ती होते.कलाम यांच्यामध्ये त्यांच्या या विचारांचा (विज्ञान आणि धर्म व अध्यात्म यावर श्रद्धा) अमुलाग्र प्रभाव पडला. जसं धर्माची शिकवण मानवी कल्याणासाठी आहे तसच विज्ञानाची सर्व उत्पत्ती सुद्धा मानवी कल्याणासाठी व उपयोगाची आहे असे ते मानत आणि यामुळेच विज्ञानाचे ते आभार मानत.आज माणसाचे आयुष्य कसे जलद आणि सर्व सुखसुविधायुक्त संपन्न आहे, उदाहरणार्थ टिव्ही, फ्रिज,वॉशिंग मशीन,मोबाईल,कॉम्पुटर, लाईट अशी कितीतरी साधने आज माणसाच्या आयुष्याला प्रगतीचे कारण बनले आहे, हे सगळं शक्य झालं आहे ते फक्त या विज्ञानाच्या तंत्रज्ञानामुळे.
ज्यावेळी तुंबा या भागामध्ये डॉ.विक्रम साराभाई यांना आपल्या अंतराळ संशोधनाचा प्रोजेक्ट उभा करायचा होता.ती जागा न संकोच करता आपल्या सहकाऱ्यांबरोबर एकमताने देण्याचे परेरा यांनी कबूल केले.ही एक मोठी दानत होती कारण तिथं एक चर्च, शाळा , परेरा यांचं घर व अनेक मछीमाऱ्यांची घरे होती.या निर्णयाच्यावेली कलाम हे साराभाईंच्या सोबत तिथं याचा पुरावा होते. इतका नाजूक आणि जटिल प्रश्न परेरा यांनी अतिशय कौशल्यपुर्वक हाताळला,कारण त्यांना जशी धर्माबद्दल आपुलकी होती तशीच विज्ञानाबद्दल सुद्धा होती.आणि लोकांनी पण त्यांच्या या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला कारण ते परेरा याना खूप मानत होते.
कलाम यांचं एक प्रामाणिक मत होत की प्रत्येक माणूस नकळत स्वार्थी भावनेने मला या समाजाकडून किंवा निसर्गाकडून काय मिळेल ह्याचाच विचार करतो. यामुळेच भ्रष्टाचार माजण्यास खत पाणी मिळते. या उलट प्रत्येकाने मी या समाजाला किंवा निसर्गाला काय देऊ शकतो ? ह्या विचाराप्रमाणे चालले पाहिजे म्हणजे संपूर्ण मानव जातीचे कल्याण होईल व जीवन समृध्द होईल. त्यांच्या या शिकवणुकीचा फार मोठा परिणाम डॉ. श्रिजन पाल यांच्यावर झाला. ते एक इंजिनिअर होते जे अब्दुल कलाम यांच्या सोबत एक वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करत होते.पुढे त्यांनी मी समाजाला किंवा या निसर्गाला काय देऊ शकतो? ही मोहीम सुरू केली. व भ्रष्टाचार कमी करण्यास व जनजागृती करण्यास सुरुवात केली.
डॉ.कलाम यांनी आयुष्यभर एक महान वैज्ञानिक म्हणून सर्वांच्या मनात आदर निर्माण केला.शाळेच्या ,कॉलेजच्या मुला मुलींना ते वारंवार मार्गदर्शन करायचे."Dreams are not that, what we see in sleep but that does not let's us sleep" म्हणजे "स्वप्ने ती नसतात जी आपण झोपेत बघतो तर ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत." असा मोलाचा सुविचार व संदेश ते मुलांना द्यायचे."अग्निपंख" हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे.त्यांच्या आयुष्यभराच्या कार्याची दखल घेऊन सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या "भारतरत्न" या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. आज आपल्यामध्ये ते नाहीत पण त्यांच्या आठवणी आम्हा भारतीयांच्या मनात कायम स्मरणात राहतील. त्यांच्या महान आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना.....धन्यवाद..🙏🙏🙏
लेखन : श्री. दत्तात्रय के पाटील, गलगले
M - 7058098139🙏
🙏 विज्ञान आणि 'धर्म व अध्यात्म'🙏

189 

Share


दत्तात्रय केरबा पाटील
Written by
दत्तात्रय केरबा पाटील

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad