Bluepad | Bluepad
Bluepad
!! अवस्थां माणसाच्या !!
धर्मराज रत्तू पवार
23rd Sep, 2022

Share

बालपणी आनंद आहे
तरूणपणी धूंद आहे
व्रूध्दपणी मंद आहे ---- माणूस
बालपणी खेळणी खेळ
तारूण्य रतिचा मेळ
व्रूध्दपणी सुटला झोळी ------ माणसाला
बालपणी असते वळवळ
तरूणपणी चालते चळवळ
व्रूध्दपणी सर्वच अवमेळ ------- माणसाचा
बालपणी असते पळापळ
तरूणपणी करतो धावपळ
व्रूध्दपणी सर्वच टाळाटाळ ------- माणसाची
बालपणी खाऊची चंगळ
तरूणपणी रती -- मदनाची रवंदळ
व्रूध्दपणी सर्वच अघळपघळ ------- माणसाची
बालपण जाते हसतखेळत
तरूणपण जाते दळत दळत
व्रूध्दपण येते गळत गळत ------- माणसाला
बालपण असते सदा निरागस
तरूणपण सदा भरून राग रंग रस
व्रूध्दपण पडत झडत पडीक ओस ------- माणसाचे
बालपणी तारूण्याची ओढ
तारूण्यी तारूण्याचीच आवड
व्रूध्दपण सर्व दोषांचे वाळले वठले खोड ---- माणसाचे
बाळपणी आधार मातापिता
तरूणपणी जोडिला कांता भर्ता
व्रूध्दपणी एकच एक काळ ताता ----- माणसाला
- - - - - धर्मराज रत्तू पवार

238 

Share


Written by
धर्मराज रत्तू पवार

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad