Bluepad | Bluepad
Bluepad
सागर किनारी
उर्मिला आपटे
23rd Sep, 2022

Share

अथांग सागर किनारी
लाटा उसळती उंचीवरी
खवळला किती जरी
मर्यादा सदोदित धरी
पाहुनी चंद्राला अधीर
लाटांवर होऊन स्वार
करी मुसफिरी फार
जणू प्रेमाला येई बहर
प्रितीबिंबित करून गगनाला
नाते जोडून अथांगला
विस्तीर्ण एकरूप होऊन
नभ भूमी सागर मिळून
त्रिवेणी संगम छान
जोडीले नाते मधुर
ऐकाकाचे ऐकावे गान
महती अपूर्व अपार
उर्मिला आपटे, सातारा.

226 

Share


Written by
उर्मिला आपटे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad