Bluepad | Bluepad
Bluepad
महात्मा फुलेंचा 'सत्यशोधक समाज' नेमका काय आहे?
शंतनु जाधव.
शंतनु जाधव.
23rd Sep, 2022

Share

सामाजिक समता व समताप्रधान समाजनिर्मितीसाठी महाराष्ट्रात स्थापन झालेला एक कांतिकारक पंथ. समाजाच्या आमूलाग मौलिक परिवर्तनाकरिता हिंदू समाजरचनेतील माणसांना उच्चनीच मानणारा जातिभेद, कर्मकांड, मूर्तिपूजा, स्त्रीदास्य, अंधश्रद्धा यांचे निर्मूलन करून वैचारिक क्रांती घडविण्याकरिता महात्मा जोतीराव फुले यांनी समाजातील काही समविचारी मंडळींच्या सहकार्याने २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याच्या निर्मितीमागील पार्श्वभूमी, तात्त्विक बैठक, कार्य व उपक्रम यांसंबंधी माहिती म. फुले व त्यांच्या अनुयायांनी लिहिलेल्या प्रासंगिक निबंध व छोटीखानी पुस्तिकेतून (सार्वजनिक सत्यधर्म) मिळते.एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास पाश्चात्त्य सुधारणेचे स्वागत करणाऱ्या प्रवृत्तीचे तीन प्रवाह महाराष्ट्रात स्वतंत्र रीत्या प्रभावीपणे वाहताना दिसतात. १) पहिला प्रवाह, धार्मिक सुधारकांचा असून तो मुख्यत्वे बाह्मो समाज (स्थापना १८२८) व प्रार्थनासमाज (स्थापना १८६४) यांत व्यक्त झाला आहे. २) दुसरा प्रवाह, बुद्धीवादी ब्राह्मण सुधारकांचा होता. आगरकरांसारखे जडवादी किंवा अज्ञेयवादी त्यात अगेसर होते. ३) तिसरा मोठा प्रवाह, ब्राह्मणी संस्कृतीच्या विरूद्ध बंड करणाऱ्या बाह्मणेतरांच्या – बहुजनसमाजाच्या – चळवळीचा होता. ह्याचे आदयजनक महात्मा जोतीराव फुले होते.
या तिन्ही सुधारणा प्रवाहांची सर्वसंमत वैशिष्टये अशी : (१) पाश्र्चात्त्य विज्ञान पूर्णतः स्वागतार्ह आहे. (२) धर्माशी प्रत्यक्ष सोयरिक नसलेले आधुनिक शिक्षण हाच खरा सुधारणेचा पाया आहे. (३) चातुर्वण्याचे तत्त्वज्ञान किंवा जातिभेद ही संस्था व्यक्तिविकासाला मारक व एकात्म समाजाच्या घडणीतील अडसर असल्यामुळे तिचे समूळ उच्चटन व्हावे कारण व्यक्तिस्वातंत्र्याच्या पायावर लोकसत्ताक राज्यव्यवस्था भारतात निर्माण होण्याची गरज आहे मात्र तत्पूर्वी सामाजिक परिवर्तनाची नितांत आवश्यकता आहे.
महात्मा फुले यांच्या या उच्छेदक प्रवृत्तीला अनेक कारणे आहेत. त्यांतील अत्यंत महत्त्वाचे म्हणजे पेशवाईच्या उत्तरार्धामधील ब्राह्मणी वर्चस्वाचा काळ. या काळात, ब्राह्मणी राज्यात जातिभेदाची तीव्र अंमलबजावणी, बाह्मणेतर जातींना दडपण्याची राज्यकर्त्यांची प्रवृत्ती, शूद्राति-शूद्रांची बेफाट पिळवणूक, कायद्याच्या अंमलबजावणीतील ढळढळीत पक्षपात, बेसुमार भ्रष्टाचार व लाचलूचपत अशी बेबंदशाही व अनागोंदी होती. साहजिकच त्या काळी महाराष्ट्रातील ग्रामीण व नागरी सामाजिक जीवनात बाह्मणांचे धार्मिक व प्रशासकीय क्षेत्रांत पूर्ण वर्चस्व होते. परंपरागत हिंदू धर्माच्या चौकटीच्या पकडीत सर्व समाज गुरफटला होता. त्याचा प्रवर्तक व समर्थक वर्ग विशेषेकरून ब्राह्मण वर्ग होता. ह्या चौकटीविरूद्ध बंड करणारी प्रवृत्ती, सत्यशोधक समाजाच्या रूपाने जागृत झाली आणि मानसिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी म. जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या रूपाने धगधगणाऱ्या बंडाचे निशाण हाती घेतले.
महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म या गंथात सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांची मांडणी केली आहे. धर्मभेद आणि राष्ट्रभेद यांच्याविरूद्ध महान सत्य कोणते, असा प्रश्न उपस्थित करून म. फुल्यांनी म्हटले आहे, ‘‘ स्वातंत्र्य, समता व बंधुत्व यांच्या पायावर अवघ्या मनुष्यजातीचे एक कुटुंब निर्माण करणे, हेच मनुष्यतत्त्वाचे सर्वोच्च ध्येय होय. सर्व मानव, स्त्री किंवा पुरूष यांचे हक्क सारखे आहेत. मानव किंवा कोणताही मानवसमुदाय यांना दुसऱ्या मानवावर वा समुदायावर स्वामित्व गाजविण्याचा, जबरदस्ती करण्याचा सर्वाधिकार नाही. राजकीय व धार्मिक मतांमुळे कोणतीही व्यक्ती उच्च वा नीच मानून तिचा छळ करणे, म्हणजे सत्याचा द्रोह करणे होय.
. फुले यांनी विशद केलेले हे सत्य म्हणजे हजारो वर्षांच्या परिश्रमाने संपादन केलेल्या संस्कृतीचे आणि ज्ञानाचे सार आहे. त्यांनी सत्यज्ञानाचे साधन किंवा प्रमाण कोणते, यासंबंधी समग चर्चा केली आहे. ‘‘ शुद्ध सत्य हे धर्मगंथात किंवा ऋषी, गुरू, अवतार व ईश्वर, प्रेषित या कुणांमध्येही नाही ते मनुष्याच्या सदसद्विवेकबुद्धीत वास करते.
मोजता येणार नाहीत अशा अनंत छोट्या-मोठया निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सत्यशोधक चळवळ नेटाने पुढे नेली/आजही प्रयत्न चालू आहेत. परिणामी, संपूर्ण समाजक्रांतीचे युग अवघ्या महाराष्ट्रात सळसळून उभे राहिले. मधे काही काळ, विशेषतः म. फुले यांच्या मृत्यूनंतर (१८९०) तसेच भारताला स्वातंत्र्याची प्राप्ती झाल्यानंतर (१९४७) सत्यशोधक चळवळ खूपच मंदावली, उपेक्षित राहिली मात्र सत्यशोधक निष्ठावंतांनी सत्यशोधक चळवळ पुनर्जीवित केली, गतिमान केली आणि खेड्यापाड्यांतल्या, तळागळातल्या माणसांपर्यंत नेऊन पोहोचविण्याचा आणि रूजविण्याचा प्रयत्न केला. राजर्षी शाहू महाराजांनी ती उभ्या महाराष्ट्रात वाढविण्याचा प्रयत्न केला.भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रचंड रणसंग्रामात, सर्वांगीण सामाजिक क्रांतीऐवजी देशाच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाला अग्रक्रम राहिला. त्यामुळे सत्यशोधक चळवळ विस्कळीत झाली तशीच स्वातंत्र्योत्तर काळात, ‘ आता स्वातंत्र्य प्राप्त झालं, उद्दिष्ट साध्य झालं म्हणजे दुसऱ्या कुठल्या उद्दिष्टाची निकड उरली नाही’, अशी बव्हंशी बहुजन समाजाने समजूत करून घेतली. समोरची उद्दिष्टेही वेगवेगळी झाली. शिवाय मोठया प्रमाणात बाह्मणेतर समाज विविध राजकीय पक्षांत विभागला गेला. अशा काही महत्त्वाच्या कारणांमुळे सत्यशोधक चळवळ नुसती मंदावली असेच नव्हे, तर थंडावलीही अशी इतिहासाची नोंद आहे. मात्र इतिहासाकडे पाठ करून ती पुन्हा उसळी मारून फोफावू लागली, ती धारदार विचारांनी दृढ असलेल्या, कडेलोट झाला तरी मागे हटणार नाही या जिद्दीने पेटलेल्या, त्या त्या काल-परिस्थितीमधील नव्या-जुन्या, छोट्या-मोठया कार्यकर्त्यांच्या-नेतृत्वाच्या अभंग निष्ठांवर ! सांप्रत जाणवणारे तिचे अस्तित्वही याच ज्वलजहाल आधारावर उभे आहे.
तमाम सत्यशोधकांना "सत्यशोधक दिनाच्या" खूप खूप शुभेच्छा..!
-@ Shantanu Nilkanth Jadhav .

178 

Share


शंतनु जाधव.
Written by
शंतनु जाधव.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad