Bluepad | Bluepad
Bluepad
भगत्स्वरुपाचे मनन म्हणजे मौन .
Shrikrishna Savargaonkar
Shrikrishna Savargaonkar
23rd Sep, 2022

Share

🙏🚩॥अमृतवाणी॥🚩🙏
सिद्ध भक्ताकडून सहज व स्वाभाविक पणाने भगवत्स्वरुपाचे सतत मनन होत रहाते . या भगवत्स्वरुपाचे मननालाच मौन म्हणतात . तर अशा प्रकारच्या मौनाचे पालन करणार्‍यास मौनी म्हणतात .
वाणीचे मौन ठेवणा-यास मौन म्हणता येत नाही , फारतर अबोला धरला असे म्हणता येईल .
आपल्या वाणीने खर्‍या स्वरुपाने भगवंत व भक्तिचा प्रचार करणारे भक्त बोलून सुद्धा मौन पाळत असतात .
जर वाणी चे मौन वा अबोला धरुन जर भक्त होणे सोप असते तर असंख्य भक्त झाले असते . दंभ वा असुरी वा अज्ञानी सुद्धा अबोला (वाणीचे मौन ) धरुन समाजात मोठेपण मिरवतात पण ते काही खरे नाही . जागे व्हा ! भोंदू पासून सावध रहा ! सदगुण सदाचार यांचा अंगीकार करा .
श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये ॥
श्रीकृष्ण सावरगांवकर
२३/०९/२०२२
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
भगत्स्वरुपाचे मनन म्हणजे मौन .

183 

Share


Shrikrishna Savargaonkar
Written by
Shrikrishna Savargaonkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad