Bluepad | Bluepad
Bluepad
देव आणि नास्तिक मनुष्य
Anil Ghotkar
Anil Ghotkar
23rd Sep, 2022

Share

मित्रांनो खर तर देव आणि नास्तिक मनुष्य म्हणजे काय या पेक्षा अस्तिकता काय असते हे प्रथम समजून घायला हवं.अस्तिकता म्हणजे तरी काय दैवी शक्ती वर विश्वास असणे,श्रद्धा असणे,त्याचे आपण भक्त असणे ई होय.नास्तिकता याच्या उलट असते ज्यात व्यक्ती देवावर विश्वास ठेऊन कार्य करत नसतो तो प्रत्येक गोष्टीत कार्यकारणभाव, कशावरही विश्वास ठेवतांना शक्यता-अशक्यता पडताळून पाहणारा असतो,डोळेझाक पणे कोणालाही पटकन शरण जाताना बुद्धी आणि मन गहाण ठेवणारा नसतो.आता पर्यंत याच बुद्धी मान पध्दतीने जगणाऱ्या माणसांनी आदी मानव अवस्थेपासून आजच्या प्रगत अवस्थेत आपल्याला आणले आहे.या उलट अंधपणे धार्मिक पुस्तके,कर्मकांड, देवाच्या नावावर अनाकलनीय, निराधार काल्पनिक जग,स्वर्ग-नरक या काल्पनिक जगाचे स्वप्न दाखवून धार्मिक लोकांनी सर्वांना मानसिक,बौद्धिक स्तरावर मुर्खच बनवले आहे.खर पाहिले तर मित्रानो हे तथाकथित सर्वच धर्मीय हिंदू,ख्रिस्ती, मुस्लिम,बौद्ध,ई जे काही मानवी धर्म धर्म आहेत ज्यात काही धर्मानी ईश्वरा बद्दल ठाम मत व्यक्त केलं फक्त बुद्ध धर्माने ईश्वर नाकारला तरीही त्यात पुस्तके, कर्मकांड येऊन शेवटी त्यालाही ईश्वर स्वरूप पुजले जाऊ लागले. असो मुद्दा असा आहे की ईश्वर ज्या ज्या धर्मानी त्यांच्या पुस्तकात वर्णित केला त्या वेळी आधुनिक विज्ञान नव्हते.डोळ्यांनी दिसणारे चंद्र, सूर्य,तारे आणि पृथ्वी इतकेच काय वर्णन हे धर्म आपल्या पुस्तकात करू शकत होते.आकाशात स्वर्ग आणि पृथ्वी खाली पाताळ, नरक असे सर्व धर्मीय पुस्तकात वर्णन आहे.जसे गॅलिलिओ, कोपर्निकस सारखे बुद्धी मान लोकांनी पृथ्वी अंडाकृती गोलाकार आहे हे दुर्बिणीतून पोप ला सांगितले तेव्हा बायबल मध्ये पृथ्वी चपटी आहे या मता विरुद्ध तो बोलला म्हणून त्याना ठार मारण्यात आले,तसेच हिंदू धर्मीय सुद्धा शेष नागाच्या डोक्यावर ही पृथ्वी आहे असे मानीत,इस्लाम धर्मात याहून वेगळ्या कल्पना नव्हत्या. थोडक्यात सर्व धर्मीय लोकांच्या धार्मिक पुस्तकात ईश्वर हा पृथ्वी आणि त्यावरील माणसांपुरताच मर्यादित होता. त्या वेळी सौर मालिका,ब्रम्हांड, अगणित अंतराळ,आकाश गंगा ई खगोलीय ज्ञान मनुष्याला नव्हते म्हणून याचा उल्लेख कधी धर्म ग्रंथात आला नाही.उलट जे नास्तिक म्हणा किंवा बुद्धिमान लोक म्हणा त्यांनी जसे जसे जगाचे संशोधन केले,समाजासाठी विज्ञानाचा वापर करून अनेक सुख वस्तू निर्माण केल्या उलट त्यांचे च ज्ञान आणि संशोधन च उपभोग या धार्मिक गुरूंनी नंतर घेऊन त्याचे ही श्रेय स्वतः कडे घेतले. आणि ईश्वर च याचा निर्माण कर्ता आहे म्हटले.हरकत नाही एवढ्या मोठ्या ब्रम्हांड च कोणीतरी ईश्वर असायलाच हवा.पण आता पर्यंत या लोकांनी स्वर्ग नरक पाप पुण्य च्या नावावर काही लोकांना पापी,गुलाम ठरवले, स्त्रियांना दासी,उपभोग वस्तू समजले,देव आणि राक्षस अश्या कल्पना रचल्या. ही मोठी फसवणूक शोषण यांनी ईश्वर च्या नावावर केल आणि आजही करत आहे.माझ्या मते जो कोणी निर्माता परमेश्वर असेल तो मनुष्य निर्मित पुसकात वर्णन करण्या सारखा मर्यादित, सोपा नसावा.कारण मनुष्य बुद्धी ही त्याला वर्णित करण्यास समर्थ नाही. ती अशी शक्ती आहे जिला एखाद्या पुस्तकात बंद करून त्याच्या नावावर लोकांना स्वर्ग नरक हे काल्पनिक जीवन दाखवणे हा मूर्खपणा च आहे.केवळ माणुस माणसं सारखा जरी राहिला नैसर्गिक पद्धतीने तरीही काही लोक चांगले काही वाईट असाच भेद राहील.मात्र आज प्रत्येक व्यक्ती शिक्षित असो व अशिक्षित आमचा धर्म श्रेष्ठ आहे आमच्या मध्ये या आमच्या यायला तुम्हाला असा नियम पाळावा लागेल,ख्रिस्ती म्हणता बाप्तिस्मा घेऊनच आमच्या लोकांत सेवा करता येईल,मुस्लिम,हिंदू पण

0 

Share


Anil Ghotkar
Written by
Anil Ghotkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad