Bluepad | Bluepad
Bluepad
अशी हि पेरणी संस्कारांची(गरज स्वत: नि समाजाची)
saru pawar
saru pawar
23rd Sep, 2022

Share

शिर्षक जरा जास्तत मोठ्ठ ,लांबलचक झालय का ? हो ! झालय खर ,पण मुद्दा वाचकां पर्यंत पोहचवायला किंवा मला काय मांडयचय हे ज्याचा संदर्भ देतेय ते नि त्यातुन साध्य होणार ,या दोन्हीं गोष्टी समाविष्ट करण्या साठी बहुतेक योग्यच ,अस आपल मला वाटत . तर असो--
अशी हि पेरणी संस्कारांची(गरज स्वत: नि समाजाची)
हा गणेश जोशी यांनी दिव्यमराठीच्या मधुरिमात लिहिलेला लेख .भक्तराज गर्जे या प्रयोगशिल शिक्षकाच्या प्रयोगा बद्दल.आत्ताश्या चालु असलेल्या टिईटी घोटाळा ,बोगस शिक्षक भर्ति च्या धर्तिवर ,जिल्हा परिषद शाळेतिल शिक्षक असा काहि विचार करून शाळेत उपक्रम राबवतो नि लोकां कडून तो स्विकारला जातो (हे महत्वाचच कारण ,मुलांनी (मुलींनी नाही) पोरगा ,मुलगा, घरका चिराग वगैरे संबोधन वापरत असलेल्या भावी पुरूषाने भाकरया थापायच्या हे आजही तितक सोप्प नाही लोकां कडून स्विकारण त्यातही खेड्यातल्या. तर Hatsoff असच या ग्रेट शिक्षक नि गावकरयानां पण. शिक्षक या पेशा कडेच मुळात आदराने पाहिल जात.गुरूला आपल्या संस्कृतित उंच स्थान दिल गेलय .याच वंदनिय गुरूं कडून समाज परिवर्तनाचे नव नवे प्रयोग होत आलेले आपण पाहत आलोय.अगदि ज्योतिबां पासुन गूरूदेव रविंद्रनाथ टागोर ,साने गुरूजी या गुरूंचा विद्यार्थ्यांवर विशेष प्रभाव होता आणि त्यांनी जी मुल्ये त्यांच्या विद्यार्थ्यां मधे पेरण्याचा प्रयत्न केला त्यातुन नव विचारांच्या सुजान नागरीकांची निर्मितीच झाली. काल परत्वे समाजाची गरज बघता शिक्षकांचे असे उपक्रम वाखाणन्या जोगेच आहेत , नाही का ? म्हणजे मुलां मुलीं त समानता तर रूजवायची ,कुठलच काम फक्त मुलींच किंवा मुलांच अस न ठेवता घरातली काम जशी मुलींना यायला हवीत तशी ति मुलांनां ही .मुलीं नी नाजुक पणा सोडत बाहेरची काम हि शिकायला हवीत नी करायला हवीत ,गरज तर आहेच पण आत्मविश्वास वाढण्या साठी,जगात वावरतानां गरज पडल्यास दोन हात करायची तयारी हे मुलींनी करायलाच हव .पुस्तकी ज्ञाना बरोबर व्यवहार ज्ञान काळाची गरज. तर मुलांच्या बाबतित स्वावलंबन नि स्रियांच्या कष्टाची जाण हे रूजवण महत्वाचच. अश्याच ऐका उपक्रमशिल शिक्षकाच्या ऐका उपक्रमाची आठवण या निमित्ताने झाली ,अर्थात हे ही मला ऐका वर्तमान पत्राच्या पुरवणीत बहुतेक पुरूषह्रदय बाई किंवा 'ति' च्या साठी तो अशा शिर्षका खाली वाचलय(शिर्षक चुकलेल असण्याची शक्यता आहेच तेव्हा संन्मानिय लेखकांनी माफ करावे हि विनंती) पण या ठिकाणी हा उल्लेख तो बनता है बाँस !!😄 सो-- तर हे दुसरे शिक्षक होते ,"नो गाली " हा उपक्रम चालवणारे.या महान शिक्षकाने मुलांना घरात आया बहिणींना खालच्या पातळीवर जाऊन अतिशय अपमानकारक शिव्या दिल्या जातात ,त्याबाबत जागृती केली.कुठल्याही स्रीला अश्या शिव्या देण किंवा कुणाला हि आयाबहिणीं वरून शिव्या देण म्हणजे सगळ्याच स्रीयांचा अपमान .त्यांना आपण संन्मान दिला पाहिजे.हळू हळू घरातही हे चित्र बघणारया मुलांच्या मनात जाणीवा रूजायला लागल्या. जे घरात सहन करणारी आई बदलु शकली नसती ते या शिक्षकाने साध्य केल. अश्या संस्कांराची पेरणी कच्च्या वयात झाली तर ,हि मुल ऐका नव्या समानतेचे संस्कार रूजलेल्या समाजाची निर्मिती नक्की करतिल आणि त्यात अजुन बरयाच भक्तराज गर्जेंची गरज लागेल हे नक्की.

175 

Share


saru pawar
Written by
saru pawar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad